मुंबई - मुंबईतील मदनपूरा परिसरात राहणाऱ्या एका गर्दुल्याने भायखळा रेल्वेस्थानकाजवळ ट्रॅकवरील विजेच्या खांबावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा आणणारा व्हिडीओ समोर आला आहे. शाकीर सलिम शेख (30) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
भायखळा रेल्वेस्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवरील विजेच्या खांबावर चढून शाकीर काही काळ त्या खांबाला लटकण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, या प्रयत्नांमध्ये ओव्हर हेड वायरच्या संपर्कात येऊन तो जखमी झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे. शाकीर सलीम शेख हा युवक अमली पदार्थांच्या आहारी गेला असून त्यास जखमी अवस्थेत जे जे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहे.
हेही वाचा - कोव्हिशिल्ड लसीचा दुष्परिणाम नाही, केईएम रुग्णालयात दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू