ETV Bharat / state

....या कारणासाठी त्याने जमवल्या दोन महिन्यांच्या सुट्ट्या - mumbai

शिवडी येथील साहील गावडे (२१) हा मुंबई विमानतळावर एअरक्राफ्ट मेंटेनंन्स इंजिनिअर म्हणून कामाला आहे. त्याने लहानपणी स्वत:ची गणपती मूर्ती शाळा असावी असे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न त्याने नोकरीला दोन महिने सुट्टी टाकून पूर्ण केले आहे. त्याने काही पैसे जमा करत यावर्षी गणपती मूर्ती शाळा सुरू केली व राहिलेले स्वप्न पूर्ण करता येतात हे दाखवून दिले.

साहील गावडे
author img

By

Published : Aug 28, 2019, 11:37 PM IST

मुबई- गणपती दर्शनासाठी आपल्याला सुट्ट्या मिळाव्या अशी अनेकांची इच्छा असते. काहीही झाले तरी देवाच्या दर्शनासाठी गावी जायचेच, असा अनेकांचा अट्टाहास असतो. मात्र शिवडा येथील साहील गावडे याने आपल्या नोकरी दरम्यान वर्षभर एकही सुट्टी घेतली नाही. याद्वारे त्याने तब्बल दोन महिन्यांच्या सुट्ट्या साठवल्या होत्या. या सुट्ट्यांचा वापर त्याने गणपती मूर्ती शाळा चालविण्यासाठी केले आहे.

साहील गावडे याच्याशी संवाद साधताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

शिवडी येथील साहील गावडे (२१) हा मुंबई विमानतळावर एअरक्राफ्ट मेंटेनंन्स इंजिनिअर म्हणून कामाला आहे. त्याने लहानपणी स्वताची गणपती मूर्ती शाळा असावी असे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न त्याने नोकरीला दोन महिने सुट्टी टाकून पूर्ण केले आहे. मुंबई एअरपोर्ट येथे कामाला असताना साहीलने काही पैसे जमा करत यावर्षी गणपती मुर्ती शाळा सुरू केली व राहिलेले स्वप्न पूर्ण करता येतात हे त्याने दाखवून दिले आहे. दिवस-रात्र काम करत त्याने सुट्ट्या जमा केल्या होत्या. या सुट्ट्यांचा वापर त्याने मूर्ती शाळा सुरू करण्यासाठी केले. आपण लहानपणी बघितलेल्या स्वप्नांचा खून न करता साहीलने जिद्दीने त्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.

मला लहानपणापासूनच गणपती मूर्तीबद्दल आकर्षण होते. मनाशी ठरवले होते की मोठा झाल्यावर माझी स्वतःची मुर्ती शाळा असेल. मी पुढे शिकत गेलो, इंजिनिअर झालो. मात्र माझे स्वप्न अपूर्ण राहीले. शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबई विमानतळावर मेंटेनेस इंजिनिअर म्हणून कामाला लागलो. मात्र एका दिवशी ठरवले की आपण काही पैसे जमा करून आपले राहिलेले स्वप्न पूर्ण करावे. त्यानुसार, यावर्षी मी मूर्ती शाळेची स्थापना केली असल्याचे साहीलने सांगितले.

Intro:मुंबई । गणपतीला सुट्टी मिळावी म्हणून अनेकांची नोकरी सोडण्याची तयारी असते. काहीही झाले देवाच्या दर्शनासाठी गावी जायचेच असा अनेकांचा अट्टाहास असतो. असे असलेतरी गणपती मूर्ती कार्यशाळेसाठी नोकरीत वर्षभर एकही सुट्टी न घेता तबल दोन महिन्यांच्या सुट्ट्या एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअर असणाऱ्या साहिल गावडे याने साठवल्या आहेत...
Body:शिवडी येथील 21 साहिल गावडे या एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरने लहानपणी पाहिलेले गणपती मूर्ती शाळेचे स्वप्न नोकरीला दोन महिने सुट्टी टाकून पूर्ण केले आहे.
मुंबई एअरपोर्ट येथे कामाला असताना काही पैसे जमा करत त्याने यावर्षी गणपती मुर्ती शाळा सुरू केली आणि आपले राहिलेले स्वप्न पूर्ण करून दाखवून दिले की किती शिकलो तरी आपले स्वप्न हे पूर्ण केलेच पाहिजे.
दिवस-रात्र काम करत साहिलने सुट्ट्या जमा केल्या. या सुट्ट्यांचा वापर त्यांनी मूर्ती शाळा सुरू करण्यासाठी केला. आपल्या लहानपणी बघितलेल्या स्वप्नांचा खून न करता साहिलने जिद्दीने त्याचे स्वप्न पूर्ण केले आहे

मला लहानपणापासूनच गणपती मूर्ती बद्दल आकर्षण होते मनाशी ठरवले होते की मोठा झाल्यावर ती स्वतःची मुर्ती शाळा असेल. शिकत गेलो इंजिनिअर झालो व माझे स्वप्न अपूर्ण राहील. शिक्षण पूर्ण झाल्याव मुंबई येथे एअरपोर्ट येथे मेंटेनेस इंजिनिअर म्हणून कामाला लागलो
एका दिवशी ठरवले की आपण काही पैसे जमा करून आपले राहिलेले स्वप्न पूर्ण केले. यावर्षी मूर्ती शाळेची स्थापना केली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.