ETV Bharat / state

Man Impersonates Andhra CM : मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी बोलतोय म्हणत...लावला लाखो रुपयांना चुना

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांची तोतयागिरी करून शहरातील इलेक्ट्रॉनिक रिटेल चेनची १२ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी २८ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

Man Impersonates Andhra CM
जगन मोहन रेड्डी
author img

By

Published : Mar 14, 2023, 8:11 PM IST

मुंबई : तोतयागिरी केल्याची आपण अनेक घटना पाहिल्या असतील पण थेट मुख्यमंत्री म्हणून बोलत असल्याचा तोतयागिरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी बोलत असल्याचा बनाव करत एका व्यक्तीने तोतयागिरी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. इलेक्ट्रॉनिक रिटेल चेनची 12 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका 28 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे.

कोट्यवधींची केली फसवणूक : मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणातील आरोपी नागराजू बुडुमुरू याला नुकतेच दक्षिणेकडील राज्यातील श्रीकाकुलम जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले होते. शहरात तक्रार दाखल केल्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी त्याला ताब्यात घेण्यात आले आहेत. बुडुमुरूने यापूर्वी अशाच पद्धतीने तोतयागिरी करत 60 कंपन्यांची सुमारे 3 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.

जगनमोहन रेड्डी बोलत असल्याचा केला बनाव : गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये इलेक्ट्रॉनिक्स विक्रेत्याच्या व्यवस्थापकीय संचालक कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्र्यांचा स्वीय सहाय्यक असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीचा फोन आला होता. फोन करणार्‍याने सांगितले होते की, मुख्यमंत्र्यांना तुमच्या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाशी बोलायचे आहे, असे सायबर क्राइम विरोधी अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, संशयास्पद नसलेल्या कर्मचाऱ्याने व्यवस्थापकीय संचालकाचा मोबाईल नंबर शेअर केला. त्यानंतर आरोपीने आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी बोलत असल्याचा दावा करत एमडीशी संपर्क साधला. तसेच क्रिकेटरच्या किटचे प्रायोजकत्व देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स रिटेल चेनकडून 12 लाख रुपयांची मागणी केली. आरोपीने आंध्र क्रिकेट असोसिएशनच्या नावाने बनावट कागदपत्रे आणि ईमेल आयडी पाठवून ते क्रिकेटपटूचे असल्याचा दावा केला आणि रक्कम सोडली, असे अधिकाऱ्याने सांगितले आहे.

पोलिसांनी आरोपीचा घेतला शोध : त्यांची फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर, इलेक्ट्रॉनिक्स विक्रेत्याने जानेवारीमध्ये पोलिस तक्रार दाखल केली. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने तपास सुरू केला आणि त्यानंतर ओडिशाच्या सीमेला लागून असलेल्या आंध्रच्या श्रीकाकुलम जिल्ह्यात आरोपींचा शोध घेण्यात आला. या तपासाअंतर्गत पोलिसांना असेही आढळून आले आहे की, आरोपी बुडुमुरूला आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये अशाच प्रकारच्या किमान 30 प्रकरणांचा सामना करावा लागत आहे. तसेच त्यांनी त्याच्या बँक खात्यांमधून 7.6 लाख रुपये वसूल केल्याची माहिती देखील पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा : Thackeray Vs Shinde : ठाकरे-शिंदे सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टात निर्णायक टप्प्यात, बुधवारी अंतिम सुनावणीचे संकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.