ETV Bharat / state

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणांचे शिवसैनिकांकडून मुंडन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीला मारहाण करून त्याचे शिवसैनिकांनी मुंडन केल्याची घटना रविवार (दि. 22 डिसें) वडाळा येथे घडली आहे.

मुंडण करताना शिवसैनिक
मुंडण करताना शिवसैनिक
author img

By

Published : Dec 23, 2019, 8:22 PM IST

Updated : Dec 23, 2019, 11:55 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीला मारहाण करून त्याचे शिवसैनिकांनी मुंडन केल्याची घटना रविवार (दि. 22 डिसें) वडाळा येथे घडली आहे. वडाळ्यात राहणाऱ्या एका व्यक्तीने फेसबूकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती. यामुळे त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी त्याला मारहाण केली. तसेच शाखाप्रमुख समाधान जुगदर शाखाप्रमुख प्रकाश हसबे व इतर शिवसैनिकांनी मारहाण करत त्याचे टक्कल केले आहे.

आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणांचे शिवसैनिकांकडून मुंडन

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी जामियाच्या घटनेची तुलना जालियावाला बागशी केली होती. याबाबत फेसबूकवर त्या वक्तीने विरोध केला होता. या प्रकारणी वडाळा टी टी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोन्ही पक्षाला 149 ची नोटीस दिली आहे.

हेही वाचा - अमृता फडणवीसांना शिवसेनेच्या महिला आघाडीचा इशारा

जामियाच्या घटनेची तुलना जालियावाला बाग हत्याकांडाशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. याबाबत मी 19 डिसेंबरला पोस्ट लिहली होती. यानंतर मला अनेक धमक्या येऊ लागल्या. मग मी पोस्ट डिलीट केली. मात्र, काल काही शिवसैनिक माझ्या घराजवळ आले. मला मारहाण केली. माझे केस कापत टक्कल केले. जर त्यांना माझ्याबाबत काही आक्षेप होता तर त्यांनी पोलीस तक्रार केली पाहिजे होती, असे हिरामण तिवारी याने सांगितले.

हेही वाचा - 'झारखंडमध्ये भाजपच्या जनविरोधी धोरणांचा पराभव'

Intro:मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या हिरामण तिवारींना मारहाण करून त्याचे शिवसैनिकांनी टक्कल केल्याची घटना काल वडाळा येथे घडली आहे. Body:वडाळ्यात राहणाऱ्या हीरामण तिवारीने फेसबूकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट लिहीली होती. याबाबत शाखाप्रमुख समाधान जुगदर
शाखाप्रमुख प्रकाश हसबे व इतर शिवसैनिकांनी मारहाण करत त्याचे टक्कल केले आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी जामियाच्या घटनेची तुलना जालियावाला बागशी केली होती. याबाबत फेसबूकवर हिरामण याने विरोध केला होता.
या प्रकारांबाबत वडाळा टी टी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोन्ही पक्षाला 149 ची नोटिस दिली आहे.

जामियाच्या घटनेची तुलना जालियावाला बाग हत्याकांडाशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. याबाबत मी 19 डिसेंबरला पोस्ट लिहली होती. यानंतर मला अनेक धमक्या येऊ लागल्या. मग मी पोस्ट डिलीट केली. मात्र, काल काही शिवसैनिक माझ्या घराजवळ आले. मला मारहाण केली. माझे केस कापत टक्कल केले. जर त्यांना माझ्याबाबत काही आक्षेप होता तर त्यांनी पोलीस तक्रार केली पाहिजे होती, असे हिरामण तिवारी याने सांगितले.Conclusion:
Last Updated : Dec 23, 2019, 11:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.