ETV Bharat / state

Gas Agency Owner Arrested : बोगस गॅस एजन्सीचा भांडाफोड; घरगुती गॅस व्यावसायिक कामासाठी वापरणाऱ्याला अटक - Gas Agency Owner

मुंबईच्या मालाड पश्चिमेकडील मालवणी पोलीस ठाणे (Malvani and Charkop police) हद्दीतील बोगस गॅस एजन्सीचा भांडाफोड करण्यात मालवणी आणि चारकोप पोलिसांना यश आले (Gas Agency Owner Arrested) आहे.

household gas for commercial work
घरगुती वापराचा गॅस व्यावसायिक कारणासाठी वापरणाऱ्या एजन्सी चालकास अटक
author img

By

Published : Oct 22, 2022, 9:39 AM IST

मुंबई : मुंबईच्या मालाड पश्चिमेकडील मालवणी पोलीस ठाणे (Malvani and Charkop police) हद्दीतील बोगस गॅस एजन्सीचा भांडाफोड करण्यात मालवणी आणि चारकोप पोलिसांना यश आले (Gas Agency Owner Arrested) आहे. महिनाभरापूर्वी पोलिसांनी या बोगस एजन्सीवर छापा टाकून शेकडो गॅस सिलेंडर आणि वापरलेले जाणारे सामान जप्त केले होते. तीन आरोपींना ताब्यात देखील घेण्यात आले होते. मात्र या आरोपींची सखोल चौकशी केली असता, त्यांना घरगुती गॅस पुरवणाऱ्या बोगस एजन्सीच्या चालकास पोलिसांनी अटक केली आहे.

गोडाऊनवर छापा : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारणपणे एक महिन्यापूर्वी मालाड पश्चिमेकडील मालवणी परिसरात एका गोडाऊनमध्ये घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर टाकीमधून गॅस अल्टी-पलटी करून तो लहान लहान व्यवसायिक सिलेंडरमध्ये भरला जात, असल्याविषयीची माहिती मालवणी पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून (owner using household gas for commercial work) मिळाली. यानंतर प्रत्यक्षात गोडाऊनवर छापा टाकून शेकडो घरगुती सिलेंडर आणि लहान लहान व्यवसायिक सिलेंडरच्या टाक्यांशिवाय अल्टी-पलटी करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य व तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी केली असता त्यांना घरगुती गॅस पुरवणाऱ्या अजून दोन आरोपींची माहिती समजली. यानुसार नदीम आणि चंदू नावाच्या दोन व्यक्तींचा खुलासा झाला. पोलिसांनी नदीम याची देखील सखोल चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर (Malvani and Charkop police arrested agency owner) आली.

प्रतिक्रिया देताना डीसीपी विशाल ठाकुर

आरोपीला पोलीस कस्टडी : एचपीसीएल कंपनीद्वारा संचलित कांदिवली पश्चिमेकडे गॅस एजन्सी चालवणाऱ्या केतकी देसाई, यांचा या बोगस गॅस एजन्सीशी संबंध असल्याचे आढळून आले. संबंधित महिलेची चारकोप पोलिसांनी सखोल चौकशी केली असता या बोगस गॅस एजन्सीला घरगुती गॅस सिलेंडर पुरवण्याचे काम करत असल्याचे तिने कबूल केले. यानंतर तिला अटक देखील करण्यात आली आहे. चारकोप पोलिसांनी संबंधित गॅस एजन्सीची मालकीण केतकी देसाई हिला अटक केल्यानंतर शुक्रवारी मुंबईच्या बोरिवली न्यायालयात हजर केले. घटनेचे गांभीर्य पाहून न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे. 24 ऑक्टोबरपर्यंत आरोपी देसाई (Gas Agency Owner) हिला पोलीस कस्टडीत राहावे लागणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.