ETV Bharat / state

आमचं ठरलंय म्हणत काँग्रेस आमदार असलम शेख शिवसेनेत - मालाड विधानसभा काँग्रेस आमदार

काँग्रेसचे आमदार असलम शेख यांनी आमचं ठरलंय अशा आशयाचे पोस्टर तयार केले आहेत. शेख यांचा शिवसेना पक्षप्रवेश निश्चित झाला आहे. असलम शेख हे काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांच्या जवळचे मानले जात होते. शेख यांच्या शिवसेनेत जाण्यामुळे उत्तर मुंबईतील एकमेव निश्चित विजयाची आमदारकीची जागा देखील काँग्रेसला मुकावी लागणार असल्याची शक्यता आहे.

काँग्रेस आमदार असलम शेख शिवसेनेत
author img

By

Published : Sep 18, 2019, 11:24 PM IST

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली आहे. यातच मालाड विधानसभेचे काँग्रेसचे आमदार असलम शेख यांनी आमचं ठरलंय अशा आशयाचे पोस्टर तयार केले आहेत. त्यामुळे गेले कित्येक दिवस सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. आमदार असलम शेख यांचा शिवसेना पक्षप्रवेश निश्चित झाला आहे. मालाड विधानसभेतून 2009 आणि 2014 असे सलग दोन वेळा असलम शेख आमदार म्हणून निवडून आले आहेत.

हेही वाचा - वंचितच्या जाहीरनाम्यात 'आरे वाचवा'

त्यांचे वडील हे पूर्वी बसपाचे नगरसेवक होते. तर, बहीण कमरजहा सिद्धीकी या मालवणीत काँग्रेसच्या नगरसेवक आहेत. मालाडच्या मालवणीसारख्या बहुसंख्य मुस्लीम असलेल्या भागाचा आमदार असलम शेख यांना पाठींबा आहे. शिवाय ते शिवसेनेत आल्यास मनोरी, मढ, मार्वे या कोळीवाड्यातील नागरिक, सोमवार बाजार सारखा शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला भाग व मालाडचे शिवसेनेचे नगरसेवक तसेच शिवसैनिकांचा देखील त्यांना पाठींबा मिळेल. असलम शेख हे काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांच्या जवळचे मानले जात होते. शेख यांच्या शिवसेनेत जाण्यामुळे उत्तर मुंबईतील एकमेव निश्चित विजयाची आमदारकीची जागा देखील काँग्रेसला मुकावी लागणार असल्याची शक्यता आहे.

Intro:मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली आहे. यातच मालाड विधानसभेचे काँग्रेसचे आमदार असलम शेख यांनी आमचं ठरलंय अशा आशयाचे पोस्टर तयार केलेत. त्यामुळे गेले कित्येक दिवस सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून कट्टर मुस्लिम असलेले आमदार असलम शेख यांचा शिवसेना पक्षप्रवेश निश्चित झाला आहे.Body:मालाड विधानसभेतून 2009 व 2014 असे सलग दोन टर्म असलम शेख आमदार म्हणून निवडून आले. तर त्यांचे वडील हे पूर्वी बसपाचे नगरसेवक होते. तर बहीण कमरजहा सिद्धीकी या मालवणीत काँग्रेसच्या नगरसेवक आहेत.
मालाडच्या मालवणीसारख्या बहुसंख्य मुस्लिम पट्टा असलेल्या भागाचा आमदार असलम शेख यांना पाठींबा आहे. शिवाय ते शिवसेनेत आल्यास मनोरी, मढ, मार्वे या कोळीवाड्यातील नागरिक, सोमवार बाजार सारखा शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला भाग व मालाडचे शिवसेनेचे नगरसेवक व शिवसैनिकांचा देखील त्यांना पाठींबा मिळेल.Conclusion:असलम शेख हे काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांच्या जवळचे मानले जात होते. शेख यांच्या शिवसेनेत जाण्यामुळे उत्तर मुंबईतील एकमेव निश्चित विजयाची आमदारकीची जागा देखील काँग्रेसला मुकावी लागणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.