मुंबई: राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदाचा शरद पवारांनी राजीनामा देऊन वापस घेतल्यानंतरही राजकारणात पडसाद उमटत आहेत. आजच्या सामनाच्या अग्रलेखा मधून शरद पवार यांना आपला राजकीय वारसदार निर्माण करण्यात अपयश आल्याच म्हटले आहे. येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध संजय राऊत यांच्यात शाब्दिक संघर्ष शिगेला पोहोचण्याचे संकेत मिळत आहे.
लाखो लोक पवारांचे वारसदार: आजच्या सामन्यातील संपादकीय मध्ये शरद पवार यांना राजकीय वारसदार निर्माण करण्यास अपयश आल्याचे म्हटले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस मधून अनेक प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. सामनातील मतांशी आम्ही कोणी सहमत नसल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटले. 1999 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्मिती झाली. आमच्या पक्षाचे तात्कालीन सरकार मधील मंत्र्यांच्या वयाचा विचार केला तर 40 ते 42 वर्षाचे सर्वच होते. ते सर्व शरद पवारांचे विचाराचे वारस होते. या पक्षात दलित, मागासवर्ग, अल्पसंख्यांक, ओबीसी या सर्व जाती धर्माच्या लोकांना पक्षाच्या अंतर्गत नेतृत्वाची संधी मिळाली, ती फक्त शरद पवारांच्या विचारांमुळे मुळेच म्हणून हे सर्व जाती-धर्मातील लोक शरद पवारांचे वारस आहे.
महेश तपासे यांची प्रतिक्रिया: राज्यातील प्रत्येक वाडी, वस्ती आणि तांड्यावर लाखो कुटुंब आहे. ते त्यांच्यासाठी दिवाणी असून त्यांचा आदर आणि निष्ठा ठेवणारे देखील पवारांचे वारस आहेत. तर अग्रलेखातील विधान चुकीचे आहे. सामनाच्या संपादकांनी राज्यातील प्रत्येक गावातील वाड्या वस्त्यावर जाऊन सर्वे केला असता तर, पवार साहेबांचे विचारांचे वारस एक, दोन, चार नाहीतर लाखोंच्या संख्येने त्यांच्या विचारांचे वारस निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सामान्य कार्यकर्ता ते नेता हा शरद पवार यांचा विचारांचा वारस आहे, अशा प्रकारची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे.
पवार आणि ठाकरे भविष्यात एकत्र: संजय राऊत काहीही बोलो पण ठाकरेंना गरज आहे. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत काही म्हणत शरद पवार आणि उद्धव ठाकरे आज एकत्र आहे आणि भविष्यात देखील एकत्र राहतील. एकत्र राहणेही उद्धव ठाकरेंची सध्याची गरज आहे. शरद पवारांना नाही तर उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांची गरज असल्याचे विश्लेषक विवेक भावसार यांनी सांगितले.