ETV Bharat / state

Mumbai high Court: लेख लिहून केली बदनामी; 820 कोटी रुपये नुकसान भरपाईचा दावा मुंबई उच्च न्यायालयात दाखल

लेख लिहून बदनामी केल्यामुळे 820 कोटी रुपये नुकसान भरपाईचा दावा मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाला आहे. दक्षिण आशियातील कंपनीच्या संस्थापकाने अंकिता बोसविरूद्ध बदनामीकारक लेख लिहिणाऱ्या महेश मूर्ती यांच्याविरुद्ध दावा केला आहे.

author img

By

Published : Apr 23, 2023, 1:13 PM IST

Mumbai high Court
मुंबई उच्च न्यायालय

मुंबई : पिंस्टोर्म या कंपनीचे संस्थापक मार्केटर महेश मूर्ती यांनी सिंगापूर येथील फॅशन टेक या कंपनीच्या एक सहसंस्थापिका अंकिता बोस यांच्या संदर्भात बदनामीकारक लेख एका मासिकात लिहिला, असा आरोप करीत अंकिता बोस हिने अब्रू नुकसानीचा दावा मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला आहे. त्यामध्ये 820 कोटी रुपये अब्रू नुकसानीपोटी त्यांनी मागितलेले आहे. झिलिंगो फॅशन टेक कंपनीच्या सीईओ पदावरुन अंकिता बोस हिला काढून टाकले जात आहे. तिला निलंबित केले गेले, अशा पद्धतीचा लेख मार्केटर आणि इन्स्टॉल या कंपनीचे प्रमुख महेश मूर्ती यांनी प्रसिद्ध केला होता.

अंकिता बोस हिची मानहानी : त्या लेखांमध्ये त्यांनी सिंगापूरच्या कंपनीच्या सहसंस्थापिका अंकिता बोस यांच्याबाबत काही वक्तव्य प्रसिद्ध केले होते. फॅशन टेक फोर झिलिंगो या कंपनीची अंकिता बोस ही मुख्य कार्यकारी अधिकारी होती. परंतु तिला काही कारणाच्या निमित्ताने कंपनीने निलंबित केलेले आहे. या प्रकारचे विधान महेश मूर्ती यांनी भारतातील एका प्रसिद्ध इंग्रजी मासिकात प्रसारित केले होते. महेश मूर्ती यांनी अंकिता बोसबाबत जे विधाने केलेली आहे. ज्या काही टीका आणि टिप्पण्या देखील केलेल्या आहे. त्यामुळे अंकिता बोस हिची मानहानी झालेली आहे. तसेच बदनामी देखील झालेली आहे. म्हणून या कारणास्तव महेश मूर्ती यांनी अंकिता बोस हिला बदनामी केल्यामुळे 820 कोटी रुपये द्यावे, अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करताना केलेली आहे.

अब्रू नुकसानीपोटी 820 कोटी रुपये द्यावे : अंकिता बोस हिने हे देखील आपल्या याचिकेमध्ये नमूद केलेले आहे की, केवळ हा लेख लिहून महेश मूर्ती शांत बसले नाहीत. तर तो लेख त्यांनी सोशल मीडियावर अर्थात ट्विटर, लिंकडाइन अशा विविध समाज माध्यमांच्या ठिकाणी देखील प्रसिद्ध केलेला आहे. त्यामुळे सार्वजनिकरित्या ही बदनामी केली गेली आहे. म्हणूनच 820 कोटी रुपये अब्रू नुकसानीपोटी द्यावे, अशी मागणी तिने केलेली आहे.

झिलिंगो फॅशन टेक कंपनी : बँकांक आणि जकार्ता या दक्षिण आशियातील छोट्या आणि मध्यम व्यापाऱ्यांसाठी मार्केट व्यवसाय यामध्ये झिलिंगो फॅशन टेक कंपनी मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. विशेषतः फॅशनच्या क्षेत्रामध्ये ई-कॉमर्समध्ये यांचे कार्य आहे. छोट्या व्यापाऱ्यांना विविध प्रकारचा वित्त पुरवठा करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मार्केटमध्ये 2015 पासून झिलिंगो ही कंपनी काम करत आहे. यामध्ये एक सहसंस्थापिका म्हणून अंकिता बोस ही देखील कार्यरत आहे.

हेही वाचा : Action Against Illegal Constructions : बेकायदा बांधकामांवर कारवाई कधी करणार - उच्च न्यायालय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.