मुंबई - मुंबईतील 'ग्रँड हयात' हॉटेल येथे मोदी आणि केंद्र सरकारच्या विरोधात उभ्या राहिलेल्या 'इंडिया' आघाडीची महत्त्वाची बैठक आज (31 ऑगस्ट) आणि उद्या (एक सप्टेंबर) या तारखेला होत आहे. दुसरीकडं राज्यातील सत्ताधारी 'महायुती'ची 31 ऑगस्ट आणि एक सप्टेंबरला मुंबईतील वरळी येथे बैठक होत आहे. (Mahayuti Meeting in Mumbai) (Mahayuti Meeting in Mumbai today) (Mahayuti Meeting Mumbai Date) (INDIA Meeting Mumbai)
घटक पक्ष बैठकीला राहणार उपस्थित - आज संध्याकाळी 8 वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सर्व प्रमुख नेते आणि मंत्री यांच्यासह भोजन कार्यक्रम व चर्चा आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेले भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह आरपीआय (आठवले गट), आरपीआय (जोगेंद्र कवाडे गट), बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर, जन सुराज्य शक्तीचे आमदार विनय कोरे, राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार महादेव जानकर, प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत उपस्थित राहणार आहेत.
मतदारसंघांचा घेणार आढावा - ही बैठक 'इंडिया' आघाडीला शह देण्यासाठी नाही तर ही बैठक पूर्वनियोजित आहे. गेल्या एक महिन्यापासून याबाबत नियोजन सुरू आहे. मात्र, सर्व नेत्यांच्या सोयीची वेळ म्हणून 31 ऑगस्ट आणि एक तारीख निवडल्याचं सुनील तटकरे यांनी सांगितलं. या बैठकीमध्ये राज्यातील लोकसभेच्या 48 मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे.
जागा वाटपाबाबत चर्चा? - या बैठकीमध्ये कुठल्याही पद्धतीनं जागा वाटपाबाबत चर्चा होणार नाही, केवळ आढावा बैठक आहे. या बैठकीला महायुतीच्या घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, इतर मंत्री तसेच अन्य महत्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहतील, असंही तटकरे यांनी सांगितलं.
हेही वाचा -