मुंबई - महाविकास आघाडीचे उमेदवार नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी आज (रविवारी) विधासभेत घोषणा केली. भाजपकडून किसन कथोरे हे उमेदवार होते. त्यांनी आपल्या उमेदवारीचा अर्ज मागे घेतल्यामुळे काँग्रेस नेते नाना पटोले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
हेही वाचा - बाळासाहेबांचं नाव घेणारच; भाजपच्या आक्षेपावर एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर
महाविकासआघाडी विरुद्ध भाजप व मित्र पक्षांमध्ये शनिवारी चांगलाच कलगीतुरा रंगला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (30 नोव्हेंबर) विश्वासदर्शक ठराव जिंकला. मात्र, भाजपने विधानसभा सभागृहाचा सभात्याग केला होता. 169-000 असे बहुमत सिद्ध करत ठाकरे यांनी आमदारांचे आभार मानले. आज विशेष अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. आज होणाऱ्या विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून नाना पटोले तर भाजपकडून किसन कथोरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
हेही वाचा - ठाकरे सरकारने १६९ आमदारांच्या पाठिंब्याने विश्वासदर्शक ठराव जिंकला