ETV Bharat / state

मनसुख हिरेन-वाझे प्रकरण : राज्याच्या गृह खात्याने जबाबदारीने काम केलं - शरद पवार

mahavikas-aghadi-meeting-regarding-sachin-waze-case
सचिन वाझे प्रकरण : डॅमेज कंट्रोलसाठी महाविकास आघाडीत बैठका
author img

By

Published : Mar 16, 2021, 10:19 AM IST

Updated : Mar 16, 2021, 7:39 PM IST

19:28 March 16

मुख्यमंत्र्यांशी राज्यातील नेहमीप्रमाणे भेटीगाठी होत असतात. सरकारी यंत्रणेला सहकार्य करणे कार्य गरजेचे - शरद पवार 

19:28 March 16

राज्याच्या गृहमंत्रालयाने जबाबदारीने काम केलं. - शरद पवार

19:28 March 16

एका पोलीस अधिकाऱ्यामुळे सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतील, यावर माझा विश्वास नाही. - शरद पवार 

19:27 March 16

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात चांगले कार्य सुरू - शरद पवार 

18:26 March 16

सीसीटीव्ही फुटेज.

काय आहे मर्सिडिज कारची थेअरी?

या प्रकरणात NIA संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात सीएसएमटी स्थानकाबाहेर मनसुख हिरेन कोणाची तरी वाट पाहत असल्याचा फुटेज एनआयएच्या हाती लागला. या सीसीटीव्ही एक मर्सडिज कार येते आणि मनसुख हिरेन त्या कारमध्ये बसुन जातात. एनआयएला असा संशय आहे की, मनसुख हिरेन हे त्यानंतर बेपत्ता झाले. याच प्रकरणी ही मर्सडिज कार तपासाचा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे.

18:25 March 16

स्फोटक प्रकरणी एनआयएने तिसरी गाडी ताब्यात घेतली. आता या प्रकरणात मर्सिडिज कार नवा खुलासा होण्याची शक्यता आहे.

16:46 March 16

मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि गृहमंत्री अनिल देशमुख हे त्यांच्या पदावर असेपर्यंत सचिन वाझे प्रकरणाची योग्य चौकशी होणार नाही. त्यामुळे पोलीस आयुक्त आणि गृहमंत्री यांनी तत्काळ राजीनामा द्यायला हवा. - चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष.

15:33 March 16

सचिन वाझे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांचं तोंड काळं झालं आहे, त्यामुळे त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे - प्रसाद लाड, भाजप प्रदेश उपाध्यक्ष 

15:31 March 16

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांची गाडी सापडण्याच्या प्रकरणातील धागेदोरे हे थेट 'मातोश्री'कडे वळताना दिसत आहेत, असे खळबळजनक वक्तव्य खासदार नवणीत राणा यांनी केले आहे. उद्धव ठाकरे यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे. 

15:30 March 16

सचिन वझे प्रकरणामध्ये कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, जो कोणी यात दोषी असेल त्या अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. चौकशी करण्याआधी मात्र कोणालाही दोषी ठरवले जाऊ नये - अजित पवार

15:06 March 16

किरीट सोमैय्यांनी घेतली तिसऱ्यांदा हिरेन कुटुंबीयांची भेट

13:11 March 16

सचिन वाझे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांचे तोंड काळे झाले - प्रसाद लाड

रत्नगिरी - सचिन वाझे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांचे तोंड काळे झाले असून त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे.

12:08 March 16

सचिन वाझे प्रकरण हे गृह खात्याचे, गृहमंत्री त्यांच्या स्तरावर निर्णय घेतील - जयंत पाटील

प्रतिक्रिया

मुंबई - आज सकाळी वर्षा बंगल्यावर महाविकास आघाडीची बैठक पार पडली. यावेळी राज्यातील विविध मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली. तसेच मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदली संदर्भात कोणतीच चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले. सचिन वाझे प्रकरण हे गृह खात्याचे असून गृहमंत्री आणि मुख्यमंत्री त्यांच्या स्तरावर निर्णय घेतील. तो त्यांचा अधिकार आहे. मात्र, या आधी ज्याप्रमाणे बातम्या समोर आल्या त्यात काहीच तथ्य नसल्याचे ते म्हणाले.

10:58 March 16

  • वर्षा बंगल्यावर सुरू असेलली महाविकास आघडीची बैठक पार पडली
  • दोन तास चालली बैठक
  • पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती

10:42 March 16

परमवीर सिंग यांची आयुक्त पदावरून उचलबांगडी होण्याची शक्यता

मुंबई- उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ॲन्टीलिया इमारतीच्या काही अंतरावर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रान्च अधिकारी सचिन वाझें यांना अटक केल्यानंतर या संदर्भात मुंबई पोलीस खात्यामध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या महाविकास आघाडी मधील काही नेत्यांची यासंदर्भात बैठक पार पडत असून मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची आयुक्त पदावरून उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

10:00 March 16

वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित बैठक सुरू

मुंबई  - सचिन वाझे प्रकरणानंतर महाविकास आघाडीत खलबत सुरू आहेत. तसेच यासंदर्भातील बैठकांचा जोरदेखील वाढला आहे. आज सकाळी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, अनिल परब, बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटील आदी नेते उपस्थित आहे. या बैठकीत मुंबई पोलीस आयुक्त बद्दलण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. 

Last Updated : Mar 16, 2021, 7:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.