ETV Bharat / state

Balasaheb Thackeray Birth anniversary : बाळासाहेब स्मृतीस्थळावर जयंतीनिमित्त अभिवादन; महाविकास आघाडीच्या नेत्यांचे शिंदे गटावर टीकास्त्र - बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यात येत आहे. यानिमित्त महाविकास आघाडीतील नेत्यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिंदे देखील शिंदे गटावर टीका करत सूचक वक्तव्य केले आहे. गद्दारांना माफी नाही, योग्य वेळी चित्र स्पष्ट होईल, असा सूचक इशारा त्यांनी दिला आहे.

Balasaheb Thackeray Birth anniversary
बाळासाहेब ठाकरे
author img

By

Published : Jan 23, 2023, 9:35 PM IST

माजी खासदार चंद्रकांत खैरे माध्यमांसोबत संवाद साधताना

मुंबई : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ही पहिलीच जयंती. या निमित्ताने राज्यभरातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर दाखल होत आहेत. तसेच महाविकास आघाडीतील नेत्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केले आहे. तसेच शिवसेनेतून बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.

गद्दारांना माफी नाही : माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, दोन गट ही जयंती साजरी करतात. मात्र, हे दुसरे गट कोणते? असा सवाल केला. सकाळपासून एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. यामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांनी सुद्धा सांगितलय की गद्दारांना माफी नाही आणि आनंद दिघे यांच्या धर्मवीर चित्रपटात सुद्धा सांगितले की गद्दारांना माफी करू नका. त्यामुळे या गद्दारांना माफी नाही.

उद्धव ठाकरेच पक्षप्रमुख : ते पुढे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा वाईट वाटत असेल. ज्या प्रकारे ज्या शिवसेनेला त्यांनी तयार केले त्या शिवसेनेत अशा प्रकारची फूट पाडली. भाजपने या शिवसेनेत फूट पाडली आहे. पैसे देऊन ही फूट पाडली, असा आरोप खैरे यांनी केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच राहतील, असा विश्वास देखील चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला.

तळागाळातील शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबतच : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख हे बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी प्रतिष्ठावर आले होते. यावेळी प्रसार माध्यमांशी अनिल देशमुख यांनी संवाद साधला. यावेळी माध्यमांशी बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच स्मृतिस्थळ हे ऊर्जास्रोत आहे. सध्या राज्यात कोणत्या पातळीच राजकारण सुरू आहे हे पण पाहत आहोत. आता शिवसेनेतून फुटून काही आमदार खासदार गेले पण अजूनही तळागाळातील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत.

युतीवर काय म्हणाले देशमुख : आजच झालेल्या शिवसेना वंचित युतीबाबत बोलताना देशमुख म्हणाले की, काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांची युती आहे. आता आंबेडकर यांची शिवसेनेसोबत युती झाली आहे. त्यांच आम्ही अवश्य स्वागत करू. आता ते सुद्धा आमच्या महाविकास आघाडीचे घटक आहेत. बाळासाहेब आंबेडकर यांची ही ताकद महाराष्ट्रात आहे त्याचा नक्कीच फायदा होईल.

मुस्लिम कार्यकर्त्याने वेधले लक्ष : कार्यकर्त्यांकडून बाळासाहेबांना अभिवादन केले जात आहे. या अभिवादानानिमित्त शिवसैनिकांमध्ये लक्ष वेधून घेतले ते एक मुस्लिम शिवसैनिकाने. याचे कारण म्हणजे या शिवसैनिकाने त्याच्या रक्ताने एका बॅनरवर लिहिले आहे. या बॅनरवर या कार्यकर्त्याने लिहिले की, आखरी सांस तर्क उद्धव ठाकरे जी का का साथ दूंगा, असा संदेश लिहीत उद्धव ठाकरे यांच्या प्रति निष्ठा व्यक्त केली आहे. या मुस्लिम कार्यकर्त्याचे नाव अजिज मोमीन असून हा कार्यकर्ता संगमनेर जिल्ह्यातून आला आहे.

हेही वाचा :Bal Thackeray Jayanti 2023: वारशाच्या लढाईत साजरी होत आहे बाळासाहेबांची ९७वी जयंती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.