ETV Bharat / state

Mahavikas Aghadi Mahamorcha : महाविकास आघाडीचे 17 डिसेंबरला महामोर्चाचे आयोजन

महापुरुषांच्या वक्तव्याप्रकरणी माहाविकास आघाडीने ( Mahavikas Aghadi ) माहामोर्चाचे Mahavikas Aghadi Mahamorcha ) आयोजन केले आहे. याबाबत आज विधानभवनात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार ( Opposition leader Ajit Pawar ) यांच्यासोबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली.

author img

By

Published : Dec 14, 2022, 4:06 PM IST

Ajit Pawar
अजित पवार
महाविकास आघाडीचा महामोर्चा

मुंबई - महापुरुषांच्या बाबत सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या सत्ताधारी नेत्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने ( Mahavikas Aghadi ) 17 डिसेंबरला महामोर्चाच आयोजन केलं ( Mahavikas Aghadi Mahamorcha ) आहे. याबाबत आज विधानभवनात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार ( Opposition leader Ajit Pawar ) यांच्यासोबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. हा मोर्चा केवळ राजकीय पक्षांचा नसून महाराष्ट्र द्रोहिंन विरोधात हा विराट मोर्चा काढला जाणार आहे. राज्यात शिंदे फडणवीस सरकार ( Shinde Fadnavis Govt ) आल्यानंतर सातत्याने महापुरुषांच्या विरोधात मंत्री नेते सत्ताधारी पक्षाचे आमदार वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. इतिहासाची तोडमोड करणारी अशी ही वक्तव्य असल्याने मराठी माणसांच्या मनामध्ये याबाबत संताप उसळला आहे. यासाठीच 17 तारखेचा मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून केवळ राजकीय पक्षाचा मोर्चा नसून सर्वांसाठी हा मोर्चा काढला जात असल्याचे अजित पवारांनी विधान भवनात पत्रकार परिषद घेऊन सांगितले.

बैठकीत मोर्चाच्या जबाबदारी बाबत चर्चा - 17 डिसेंबरला महाविकास आघाडीकडून महामोर्चाचा आयोजन करण्यात आला आहे. या मोर्चासाठी तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जबाबदारी कशाप्रकारे देण्यात यावी याबाबतची चर्चा आजच्या बैठकीत झाली असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी सांगितले. 17 डिसेंबरला किती संख्यांनी लोक राज्यभरातून मुंबईत येतील त्यासाठीची कशा प्रकारची आयोजन केले गेले पाहिजे. या मोर्चासाठी कायदेशीर परवानगी या सर्व बाबत चर्चा या बैठकीत झाली. अद्याप पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिलेली नाही. मात्र, या मोर्चाच्या परवानगीसाठी महाविकास आघाडी कडून पाठपुरावा केला जात असल्याचेही सचिन अहिर यांनी यावेळी सांगितले.

पुणे नाशिक नगर रेल्वे मार्गाला केंद्राकडून अनुमती नाही - पुणे नाशिक नगर रेल्वे मार्ग व्हावा यासाठी तात्कालीन महाविकास आघाडी सरकारने सर्व प्रयत्न केले होते. हा रेल्वे प्रकल्प लवकरात लवकर भावा यासाठी तात्कालीन राज्य सरकारने महारेल कंपनीची स्थापना देखील करण्यात आली होती. या कंपनीच्या माध्यमातून जमीन अधिग्रहणासाठी साडेचारशे कोटींचा वाटपही करण्यात आलं. सर्व प्रकारच्या परवानग्या या प्रकल्पासाठी घेण्यात आल्या असून केवळ केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी मिळणे आवश्यक आहे. मात्र अद्याप या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची अनुमती न मिळाल्यामुळे हा प्रकल्प रखडला असल्यास विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विधान भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेतून सांगितला आहे.

सर्वसामान्य नागरिकांचा विकास - ज्याप्रकारे समृद्धी महामार्गामुळे विकास होणार आहे. त्याचप्रमाणे या प्रकल्पामुळे नाशिक अहमदनगर पुणे जिल्ह्यातील शेतकरी सर्वसामान्य नागरिकांचा विकास होईल. मात्र केवळ केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अद्याप मिळाली नसल्याने हा प्रकल्प पूर्ण होऊ शकत नाही असा ठपका अजित पवारांनी केंद्र सरकारवर ठेवला आहे. या प्रकल्पाला लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी भाजपचे खासदार सुजय विखे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्यासह अनेक खासदारांनी पत्र लिहिलेले आहेत मात्र अद्याप यावर निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत अमित शहा यांची भेट घेत आहेत. या भेटीतून या प्रकल्प बाबतही त्यांनी यावेळी चर्चा करावी असे मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.