मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी ( disciple of Mahatma Gandhi ) यांच्या शिष्या मॅडेलीन स्लेड ( Disciple Madeleine Slade ) यांनी लिहिलेल्या साहित्यकृतीच्या स्वामित्त्व हक्काचा वाद उच्च न्यायालयात पोहोचला आहे. स्लेड यांच्या द स्पिरिट्स पिलग्रिमेज ( The Spirits Pilgrimage ) या साहित्यकृतीचा अनुवाद आणि प्रकाशन करण्याच्या परवान्यावर आक्षेप मागवण्यासाठी सार्वजनिक नोटीस काढण्याचे आदेश स्वामित्त्व हक्क रजिस्ट्रारला ( Registrar of Proprietary Rights ) उच्च न्यायालयाने दिले आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी 15 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
'या' याचिकेवर दिले आदेश : मुंबईतील रहिवासी अनिल कारखानीस यांनी स्वामित्त्व हक्क कायद्याच्या कलम 32 अंतर्गत दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने आदेश दिले आहेत. स्लेड या महात्मा गांधींचे शिष्य होत्या. त्यांचे आत्मचरित्र 1960 मध्ये ओरिएंट लाँगमॅन प्रायव्हेट लिमिटेड आणि ग्रेट ब्रिटनमध्ये लाँगमॅन्स ग्रीन अँड कंपनीने प्रकाशित केले होते. स्वामित्त्व हक्क कायद्याच्या कलम 32 हा एखाद्या साहित्यकृतीच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या तारखेनंतर विशिष्ट कलावधी उलटून गेल्यावर संबंधित साहित्यकृती पुनर्प्रकाशित करण्याचा अधिकार प्रदान करतो. असा दावा कारखानीस यांनी याचिकेतून केला होता. त्या याचिकेवर नुकतीच न्या.मनिष पितळे यांच्यासमोर सुनावणी झाली.
एकही प्रकाशक अस्तित्वात नाही : साहित्यकृतीचे लिखाण भारतात प्रकाशित झाले असावे. याचिका दाखल करण्याच्या 7 वर्षआधी साहित्यकृती प्रकाशित होणे आवश्यक आहे. याचिका नियमानुसार दाखल असावी हे स्वामित्त्व हक्क कायद्याच्या कलम 32 अंतर्गत परवाना मिळविण्याचे तीन निकषही पूर्ण केल्याचा दावा कारखानीस त्यांच्यावतीने अँड. अमित जामसंडेकर यांनी केला. कायद्याच्या तरतुदींनुसार अशा स्वामित्व हक्क असलेल्या व्यक्तीला स्वामित्व देण्यास तयार असल्याचेही अँड. जामसंडेकर यांनी सांगितले. या साहित्यकृतीची एक संक्षिप्त आवृत्ती रंगा मराठे यांनी अनुवादित केली होती आणि या प्रकरणातील प्रतिवादी असलेल्या किर्लोस्कर प्रेसने प्रकाशित केली आहे. आजपर्यंत एकही प्रकाशक अस्तित्वात नसल्याची माहितीही जामसंडेकर यांनी न्यायालयाला दिली. परिणामी कारखानीस यांना प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी अनुवादक किंवा प्रकाशक यांपैकी कोणीही अस्तित्वात नसल्यामुळे त्यांनी न्यायालयात दाद मागितली असल्याचे सांगितले.
रजिस्ट्रारला नोटीस काढण्याचे आदेश : त्यांची बाजू ग्राह्य धरत न्यायालयाने स्लेड यांच्या साहित्यकृती अनुवाद आणि प्रकाशन करण्याचा परवान्यावर आक्षेप मागवण्यासाठी सार्वजनिक नोटीस काढण्याचे आदेश स्वामित्त्वहक्क रजिस्ट्रारला दिले. नोटीस प्रकाशित केल्याच्या तारखेपासून 120 दिवसांच्या आत आक्षेप नोंदविण्याऱ्या व्यक्तींकडून हरकती मागवणारी नोटीस प्रकाशित करण्याचे निर्देश दिले. तसेच 11 ऑक्टोबरपासून 2 आठवड्यांच्या आत नोटीस प्रकाशित करण्याचे आदेश देत न्यायालयाने सुनावणी 15 फेब्रुवारी 2023 रोजी निश्चित केले आहे.