मुंबई - गुरुवारी शिवाजी पार्क येथे मुख्यमंत्रीपदाचा सोबत इतर मंत्र्यांचाही शपथविधी होणार आहे. शपथ विधीच्या तयारी संदर्भात महाविकासआघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होत आहे.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल, छगन भुजबळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संजय राऊत, एकनाथ शिंदे, जोगेंद्र कवाडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी हे उपस्थित आहेत. राज्यात नवीन सरकार स्थापन करत असताना मंत्रिमंडळात तिनही पक्षांचा वाटा नेमका किती असावा आणि त्यासाठी कोणाला कोणते मंत्री पद द्यावे यासाठी ही बैठक आहे.
हेही वाचा - गडचिरोली पोलिसांसमोर 6 जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; ५ महिलांचा समावेश
दुपारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची एक बैठक झाली. या बैठकीनंतर आमदारांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले. नंतर याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे पोहोचले. त्यापाठोपाठ शिवसेनेचे एकनाथ शिंदे, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचाही ताफा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पोहोचला. त्यानंतर काही वेळात या ठिकाणी महाआघाडीची बैठक सुरू झाली.