ETV Bharat / state

पुलवामा दहशतवादी हल्ला : महाराष्ट्राच्या 'या' दोन सुपुत्रांना आले होते वीरमरण - हुतात्मा नितीन राठोड

गेल्या वर्षी आजच्याच दिवशी झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोन सुपुत्रांना वीरमरण आले होते. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली होती.

pulwama attack
आजच्याच दिवशी महाराष्ट्राच्या 'या' दोन सुपूत्रांना आले होते वीरमरण
author img

By

Published : Feb 14, 2020, 8:54 AM IST

Updated : Feb 14, 2020, 9:30 AM IST

मुंबई - गेल्या वर्षी आजच्या दिवशी १४ फेब्रुवारीला पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने आत्मघाती हल्ला केला होता. यामध्ये ४० जवानांना वीरमरण आले होते. यामध्ये महाराष्ट्राचे दोन सुपूत्र देखील धारातिर्थ पडले होते. बुलडाण्यातील मलकापूर येथील संजय राजपूत आणि चोरपांगरा येथील नितीन राठोड यांना वीरमरण आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली होती.

हुतात्मा संजय राजपूत शाळेमध्ये असतानाच होते एनसीसीचे कॅडेट -

हुतात्मा जवान संजय राजपूत यांचा जन्म ८ मे १९७३ ला झाला होता. ते मूळचे मलकापूरचे रहिवासी होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण मलकापूरच्या नूतन विद्यालयामध्ये झाले. शाळेमध्येच असताना ते एनसीसीचे कॅडेट होते. तेव्हापासूनच देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढण्याची त्यांची इच्छा होती. त्यानंतर ते सीआरपीएफमध्ये सामील झाले. ते सीआरपीएफ बटालियन ११५ मध्ये कार्यरत होते. त्यांना ११ फेब्रुवारीला काश्मीरमध्ये पाठवण्यात आले होते. त्यांच्या २ भाऊ, एक बहिण, पत्नी आणि २ मुले असा परिवार आहे. मात्र, हल्ला झाला त्याच्या काही दिवसांपूर्वीच त्यांचे कुटुंब (पत्नी आणि २ मुले) नागपूरच्या ग्रुप सेंटर ऑफ सीआरपीएफच्या रहिवासी क्षेत्रात राहायला गेले होते. हल्ला झाल्याचे समजताच त्यांचे कुटुंबावर शोककळा पसरली होती.

हुतात्मा नितीन राठोड यांच्या घरची परिस्थिती बेताची, तरीही शिक्षण घेऊन सैन्यात झाले होते सामील -

पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील चोरपांगरा येथील नितीन शिवाजी राठोड (वय३६) या जवानाला वीरमरण आले होते. घरची परिस्थिती अंत्यत बेताची होती. मात्र, नितीन यांना सैन्यात भर्ती व्हायचे होते. त्यानुसार त्यांनी गरीब परिस्थितीतून शिक्षण घेतले. त्यामुळे त्यांचा संपूर्ण कुटुंबासह गावाला देखील अभिमान होता. पण, १४ फेब्रुवारीला हल्ला झाला आणि गावात त्यांच्या वीरमरणाची बातमी पोहोचताच सर्वांवर शोककळा पसरली होती.

Last Updated : Feb 14, 2020, 9:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.