मुंबई : आजपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने आज मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी 'ऑरेंज' अलर्ट जारी केला आहे, तसेच रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि बुलढाणा या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसह, अत्यंत मुसळधार पावसाचे संकेत दिले आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र, रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, पालघर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. कोकण किनापट्टीत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
मराठवाड्यातील सात जिल्ह्यांतील 14 प्रशासकीय मंडळांमध्ये 24 तासांत 65 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. सोमवारी लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोरोळ सर्कलमध्ये सर्वाधिक 132.50 मिमी, तर परभणी मंडळात (113.75 मिमी) पावसाची नोंद झाली आहे. औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांतील चौदा (प्रशासकीय) मंडळांमध्ये सोमवारी जास्त पाऊस झाला, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राजयगड जिल्ह्यात सरासरीच्या 70 टक्के पावसाची नोंद- रायगड जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला असून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात जूनच्या सरासरीच्या 70 टक्के पावसाची नोंद 459 मिमी इतकी झाली आहे. जिल्ह्यात जुलैमध्ये आतापर्यंत सरासरी वार्षिक पावसाच्या 22.5 टक्के (3,148 मिमी) पावसाची नोंद झाली आहे. रायगड जिल्ह्यात जून महिन्यात सरासरी 655 मिमी पाऊस पडला. यंदा जिल्ह्यात सरासरीच्या 70 टक्के पावसाची नोंद 459 मिमी एवढी झाली. जुलैच्या पहिल्या चार दिवसांत 188 मिमी पावसाची नोंद झाली," अधिकाऱ्यांनी सांगितले
- Maharashtra Weather: पुढील सात दिवस पावसासह गारा पडण्याची शक्यता; विदर्भात तीन दिवस ऑरेंज अलर्ट
- Maharashtra Weather Update: रायगड, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांतील नागरिकांना समाधानकारक पावसाची प्रतिक्षा
- Heavy Rain in Mumbai at Night : मुंबईत रात्री मुसळधार पाऊस; मुंबईत पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी