मुंबई/पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2019 च्या पोलीस उपनिरीक्षकच्या मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला आहे. ( MPSC Result 2022 ) तब्बल 3 वर्षानंतर हा निकाल जाहीर झाला असून निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला आहे.
निलेश बर्वे हा प्रथम -
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2019 च्या पोलीस उपनिरीक्षकच्या मुख्य परीक्षेत राज्यात प्रथम निलेश बर्वे हा आला आहे तर दुसरा गणेश यलमार हा राज्यात दुसरा आला आहे. निकाल जाहीर होताच यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा केला आहे. गुलाल उधळत विद्यार्थ्यांनी उत्साह साजरा केला आहे. राज्यातील एक छोट्याश्या गावातून येऊन पुण्यात अभ्यास करून परीक्षा दिली आहे.मोठ्या प्रमाणात आनंद होत आहे की राज्यात दुसरा आलो आहे.
खूप मेहनत घेतली होती. आज जो काही निकाल लागला आहे त्याचा समाधान आहे, या शब्दात राज्यात दुसरा आलेल्या गणेश यलमार याने ईटीव्ही भारतसोबत बोलताना व्यक्त केल्या.