ETV Bharat / state

Corona virus : राज्यात दिवसभरात २२९ नवे रुग्ण, एकूण संख्या १,३६४ वर - गर्दीमुळे कोरोना प्रसाराची भीती

राज्यात आजपर्यंत तपासणी झालेल्या ३० हजार ७६६ नमुन्यांपैकी २८ हजार ८६५ जणांचे प्रयोगशाळा अहवाल कोरोना निगेटिव्ह तर, १ हजार ३६४ जण पॉझिटिव्ह आलेत. आतापर्यंत १२५ रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. सध्या ३६ हजार ५३३ व्यक्ती घरगुती अलगीकरणात, ४ हजार ७३१ जण संस्थात्मक क्वारन्टाईनमध्ये आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे
आरोग्यमंत्री राजेश टोपे
author img

By

Published : Apr 10, 2020, 9:31 AM IST

मुंबई - राज्यात आज कोरोनाच्या २२९ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या १ हजार ३६४ झाली आहे. कोरोनाबाधित १२५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १ हजार १४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३० हजार ७६६ नमुन्यांपैकी २८ हजार ८६५ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १ हजार ३६४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत १२५ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३६ हजार ५३३ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४ हजार ७३१ जण संस्थात्मक क्वारन्टाईन मध्ये आहेत.

दरम्यान, आज राज्यात २५ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैंकी पुण्यातील १४, मुंबईतील ९ तर मालेगाव आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी १ मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी १५ पुरुष तर १० महिला आहेत. आज झालेल्या २५ मृत्यूपैकी १२ जण हे ६० वर्षांवरील आहेत. तर, मुंबईत निधन झालेल्या एका महिलेचे वय १०१ वर्षे आहे. ११ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत तर दोघेजण ४० वर्षांपेक्षा लहान आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या २१ रुग्णांमध्ये (८४ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा तपशील -

  • मुंबई - ८७६ रुग्ण (मृत्यू ५४)
  • पुणे मनपा - १८१ रुग्ण ( मृत्यू २४)
  • पुणे (ग्रामीण) - ०६ रुग्ण
  • पिंपरी-चिंचवड मनपा - १९ रुग्ण
  • सांगली - २६ रुग्ण
  • ठाणे मनपा - २६ रुग्ण (मृत्यू ०३)
  • कल्याण-डोंबिवली मनपा - ३२ रुग्ण (मृत्यू ०२)
  • नवी मुंबई मनपा - ३१ रुग्ण (मृत्यू ०२)
  • मीरा भाईंदर - ०४ रुग्ण (मृत्यू ०१)
  • वसई-विरार मनपा - ११ रुग्ण (मृत्यू ०२)
  • पनवेल मनपा - ०६ रुग्ण
  • ठाणे (ग्रामीण), पालघर (ग्रामीण) - रुग्ण प्रत्येकी ०३ (मृत्यू १)
  • नागपूर - १९ रुग्ण (मृत्यू ०१)
  • अहमदनगर मनपा - १६ रुग्ण
  • अहमदनगर (ग्रामीण) - ०९ रुग्ण
  • उस्मानाबाद - ०४ रुग्ण
  • अमरावती मनपा - ०४ रुग्ण (मृत्यू २),
  • यवतमाळ - ०४ रुग्ण
  • रत्नागिरी - ०४ रुग्ण (मृत्यू २)
  • लातूर मनपा - ०८ रुग्ण
  • औरंगाबाद मनपा - १६ रुग्ण ( मृत्यू ०१)
  • बुलडाणा - ११ रुग्ण ( मृत्यू ०१)
  • सातारा - ०६ रुग्ण (मृत्यू ०१)
  • अकोला - ०९ रुग्ण
  • कोल्हापूर मनपा - ०५ रुग्ण
  • मालेगाव - ०५ (मृत्यू ०१)
  • जळगाव ग्रामीण व मनपा - १ रुग्ण (मृत्यू १)
  • उल्हासनगर मनपा, नाशिक मनपा व ग्रामीण, औरंगाबाद ग्रामीण, जालना, हिंगोली, गोंदिया, वाशीम, बीड, सिंधुदुर्ग - प्रत्येकी १ रुग्ण

एकूण - १ हजार ३६७ रुग्ण. त्यापैकी १२५ जणांना घरी सोडले. तर, ९७ जणांचा मृत्यू

राज्यातील ज्या भागांत रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार 'क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना' अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात या प्रकारे एकूण ४ हजार २६१ सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी १६ लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.