मुबंई : बारावीचा निकाल लागल्यानंतर दहावीचा निकाल कधी लागेल याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष असते. दहावीनंतर आपल्या शैक्षणिक करिअरला नवी दिशा मिळत असते, यामुळे दहावीच्या परीक्षेचा निकाल आवश्यक असतो. दरम्यान दहावीचा निकाल कधी लागणार याची तारीख आज महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळकडून जाहीर केली जाऊ शकते. महाराष्ट्र बोर्ड 10 वी 2023 चा निकाल विद्यार्थ्यांना mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहे.
कधी झाली होती परीक्षा : यंदा 2 मार्च ते 25 मार्च दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. साधरण 9 विभागात ही परीक्षा घेण्यात आली होती. या 9 विभागात नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण याचा समावेश आहे. संपूर्ण राज्यात 5 हजार 033 मुख्य परीक्षा केंद्र करण्यात आली होती.
या संकेतस्थळावर पाहता येणार निकाल :
- www.mahresult.nic.in
- http://sscresult.mkcl.org
- https://ssc.mahresults.org.in
- https://hscresult.mkcl.org/
- https://hsc.mahresults.org.in
मार्कशीट देखील डाऊनलोड करणे शक्यया वेबासाईटवर विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतील. देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर किंवा आईचे नाव टाकून 10 च्या बोर्डाचा निकाल पाहता येईल. दहावी उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना फक्त 35 टक्कांची गरज असते. जर विद्यार्थी नापास होतील त्यांना निराश होण्याचे कारण नाही. ते पुढील पुरवणी परीक्षेला बसून उत्तीर्ण होऊ शकतात. दरम्यान निकाल पाहण्यासाठी ज्या वेबसाईट देण्यात आल्या आहेत, त्यातून निकालासह विद्यार्थी मार्कशीट देखील डाऊनलोड करू शकतील. या मार्कशीटमध्ये विद्यार्थ्याचे नाव, शाळा क्रमांक, केंद्र क्रमांक, आईचे नाव, प्रत्येक विषयात मिळालेले गुण, एकूण गुण आणि टक्केवारी, पात्रता स्थिती या गोष्टी दिलेल्या असतील.
असा पहा निकाल : दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आधी वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर होमपेजवर दिसणाऱ्या एसएससी निकालाच्या लिंकवर क्लिक करावे.त्यानंतर विचारण्यात आलेली माहिती त्या ठिकाणी भरा.त्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर येईल. तो निकाल डाऊनलोड करा.विद्यार्थी मार्कशीट देखील डाऊनलोड करू शकतील.
हेही वाचा -