मुंबई - राज्यात ३० मार्चला ६९४, १ एप्रिलला ६६९, ४ एप्रिलला ७११ रुग्णांची नोंद झाली होती. त्यात गुरुवारी आणखी वाढ होऊन रुग्णसंख्या ८०० च्या पुढे गेली आहे. गुरुवारी ८०३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारी कोरोनामुळे ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी ६८७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत गुरुवारी २२१ रुग्णांची नोंद झाली आहे तसेच १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
राज्यात ३ मृत्यू - आज ८०३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा ८१ लाख ४७ हजार ६७३ वर पोहचला आहे. आज ३ मृत्यूची नोंद झाल्याने मृत्यूचा आकडा १ लाख ४८ हजार ४५४ वर पोहचला आहे. आज ६८७ रुग्ण बरे झाल्याने बरे झालेल्या रुग्णांचा आकडा ७९ लाख ९५ हजार २३२ वर पोहचला आहे. राज्यात ३९८७ ॲक्टिव्ह रुग्ण असून मुंबईत १२६८, पुण्यात ७३८, ठाण्यात ६९७, रायगड मध्ये २३४ तर नागपूर येथे १९५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. नंदुरबार, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात एकही ॲक्टिव्ह रुग्ण नाहीत.
मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी मृत्यू - मुंबईत काल एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. आज पुन्हा एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी मृत्यूची नोंद झाली आहे. काल २२१ रुग्णांची नोंद झाली होती आज २१६ रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे एकूण रुग्णांचा आकडा ११ लाख ५८ हजार १८४ वर पोहचला आहे. आज १ मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १९ हजार ७४९ वर पोहचला आहे. १९१ रुग्ण बरे झाल्याने बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा ११ लाख ३७ हजार १६७ वर पोहचला आहे. मुंबईतील विविध रुग्णालयात १०० रुग्ण दाखल असून २० रुग्ण ऑक्सीजनवर आहेत.
भीती बाळगू नका - मुंबईमध्ये गेल्या महिन्यापासून रुग्णसंख्या वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. त्यामुळे मुंबईमध्ये कोणतीही भीतीदायक परिस्थिती निर्माण झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी भीती न बाळगता गर्दीच्या ठिकाणी मास्क घाला, हात स्वच्छ धुवा, गर्दीत जाण्याचे टाळा या कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
हेही वाचा - Mumbai Corona Warrior Demand : आम्हाला भीक नको, आमचा अधिकार द्या : मुंबईतील कोरोना योद्ध्यांची मागणी