मुंबई - आज राज्यात ३ हजार ८८० नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १८ लाख ८४ हजार ७७३ वर पोहोचला आहे. राज्यात आज ६५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४८ हजार ४९९ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ टक्के एवढा आहे.
राज्यात सध्या ६०,९०५ कोरोना रुग्णांवर उपचार -
आज ४ हजार ३५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्या एकूण रुग्णांचा आकडा १७ लाख ७४ हजार २५५ वर पोहोचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.१ ४ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यात ६०,९०५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत राज्यभरात कोरोना निदानासाठी एकूण १,१९,३३,९५६ तपासण्या करण्यात आल्या आहेत. राज्यात ५,०६,९१४ हजार व्यक्ती क्वारंटाईन आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कोरोना रुग्णांच्या संख्येत घट -
राज्यात जूनदरम्यान दिवसाला ५४०० रुग्ण आढळून येत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही रुग्णसंख्या १० हजार ५०० वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या २० हजार ४०० वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या २४ हजार ८०० वर गेली होती. मात्र ही रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात कमी होत आहे. राज्यात १२ ऑक्टोबरला ७०८९ रुग्ण, १३ ऑक्टोबरला ८५२२ रुग्ण आढळून आले होते. १९ ऑक्टोबरला ५९८४ रुग्ण, २६ ऑक्टोबरला ३६४५, ७ नोव्हेंबरला ३,९५९, १० नोव्हेंबरला ३,७९१, १५ नोव्हेंबरला २,५४४, १६ नोव्हेंबरला २,५३५, १७ नोव्हेंबरला २,८४०, २० नोव्हेंबरला ५,६४०, तर २१ नोव्हेंबरला ५७६० रुग्ण आढळून आले आहेत.