ETV Bharat / state

Maharashtra Rain Updates : कोकणात पावसाचा धुमाकूळ, एनडीआरएफडून राज्यात एकूण 12 टीम तैनात - मान्सूनचा पाऊस

राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने बुधवारी मुंबई शहरासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर शेजारील रायगड आणि पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. आज येथील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे.

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
author img

By

Published : Jul 19, 2023, 10:00 AM IST

Updated : Jul 19, 2023, 1:40 PM IST

मुंबई : राज्यातील अनेक भागात वरुणराजाने जोरदार हजेरी लावली. राज्यातील अनेक ठिकाणी झालेल्या मुसळधार पावासामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्यात पुढील 4 अजून मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये आज दिवसभरात मध्यम ते मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

राज्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफने राज्यात एकूण 12 टीम तैनात केल्या आहेत. मुंबईत 5, पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, नागपूर आणि ठाणे जिल्ह्यात प्रत्येकी 1 टीम तैनात करण्यात आली आहे. एनडीआरएफची टीम नैसर्गिक आपत्तीमधून नागरिकांची सुटका करणे व त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्याचे काम करणार आहे. रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे व चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे.

  • 19/7,Latest obs at 8.10 am
    Possibilities of mod to intense spells over parts of Konkan; Raigad Rtn, Sindhudurg & N Vidarbha during next 2,3 hrs
    Parts of west marathwada near ghat areas, parts of N madhya Mah too
    Watch for IMD updates
    Mumbai Thane light to mod rains. pic.twitter.com/b7FOPexeIt

    — K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुसळधार पावसाची शक्यता : राज्यात आज मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर पुणे, सातारा, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, यवतमाळ,चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तळ कोकणात देखील अतिमुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

  • Maharashtra | Raigad District Collector Yogesh Mhase has declared a holiday for all schools and colleges in the district today in view of heavy rains.

    IMD has issued a 'Red' alert for Palghar, and Raigad districts and an 'Orange' alert for Thane, Mumbai and Ratnagiri today.

    — ANI (@ANI) July 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कुठे आहे रेड अलर्ट अन् कुठे ऑरेंज अलर्ट : हवामान विभागाने बुधवारी मुंबई शहरासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर शेजारील रायगड आणि पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. आज येथील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे. ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार, ऑरेंज अलर्ट हा 115.6 मिमी ते 204.4 मिमी पावसासाठी देण्यात आला आहे. म्हणजे जेथे ऑरेंज अलर्ट आहे तेथे 115.6 मिमी च्यापुढे पावसाच्या धारा कोसळतील. तर रेड अलर्ट ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी दिवसभरात 204.4 मिमी पाऊस पडेल असे सांगण्यात आले आहे.

मंगळवारी मुंबईत पावसाची हजेरी- मंगळवारी दिवस जसजसा पुढे सरकत गेला तसतसा पाऊस कमी होत गेला. दरम्यान मुख्य शहरात आणि उपनगरातील बहुतांश भागात अधूनमधून मुसळधार आणि हलका पाऊस झाला. मुंबई शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरांमध्ये सकाळी 8 ते संध्याकाळी 6 दरम्यान अनुक्रमे 17.44 मिमी, 22.55 मिमी आणि 18.87 मिमी पाऊस पडला. सोमवारी रात्री वांद्रे, दहिसर, चेंबूर, फोर्ट, माटुंगा, भायखळा आणि शहराच्या इतर भागात अधूनमधून मुसळधार पावसाने हजेरी लावली होती.

हेही वाचा -

  1. Heavy Rainfall in Kolhapur: धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस, राजाराम बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली
  2. Maharashtra Weather Update : राज्यात 'या' तारखेपर्यंत बरसणार; कमी दाबाचा पट्टा तयार

Last Updated : Jul 19, 2023, 1:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.