ETV Bharat / state

Maharashtra Rain Update: कोकण आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रातील घाट भागात अति मुसळधार पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट - IMD alert for Maharashtra

पुढील २४ तासांत कोकण आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रातील घाट भागात अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पावसामुळे अनेक जिल्ह्यांत आज शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

Maharashtra Rain Update
मुसळधार पावसाची शक्यता
author img

By

Published : Jul 20, 2023, 7:57 AM IST

Updated : Jul 20, 2023, 8:25 AM IST

मुंबईत मुसळधार पाऊस

मुंबई : ऑरेंज अलर्ट दरम्यान बुधवारी मुंबईच्या काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली, ज्यामुळे लगतच्या ठाणे जिल्ह्यात कल्याणच्या पलीकडे लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाली होती. काही एक्सप्रेस गाड्या वळवण्यात आल्या. मुंबई-पुणे दरम्यानच्या काही सेवा झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावा केला की, मुंबईत 110 सखल भाग असूनही शहरात पाणी साचले नाही. वाहतूक सुरळीत राहिली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना गुरुवारी मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) अतिवृष्टीचा इशारा देत सुट्टी जाहीर केली. राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली. अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले.

  • Heavy to very heavy rainfall expected over parts Konkan and adjoining ghat areas of Madhya Maharashtra during next 24 hours. येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा. तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf9chD…… भेट द्यI pic.twitter.com/cjjgae0Ztp

    — Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रेल्वे सेवा बंद : संततधार पावसामुळे वशिष्ठी नदीने धोक्याचे चिन्ह ओलांडल्याने बुधवारी दुपारी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक तासभर थांबवण्यात आली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एल. के. वर्मा यांनी माध्यमांना सांगितले की, वशिष्ठी नदीच्या पुलावर पाणी धोक्याच्या चिन्हापेक्षा जास्त होते. त्यामुळे दुपारी 3 च्या सुमारास खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. तासाभरानंतर रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मोफत बसची व्यवस्था : मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बुधवारी रात्री प्रवाशांच्या सोयीसाठी प्रमुख रेल्वे स्थानकांवरून मोफत बस चालविण्या आले. एमएसआरटीसीने सांगितले की, मुंबई आणि ठाणे विभागांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कुर्ला, ठाणे, कल्याण आणि इतर प्रमुख स्थानकांपासून विविध निवासी भागांपर्यंत 100 हून अधिक बस विनामूल्य चालवण्याची योजना आखली आहे. कार्यालयात जाणाऱ्यांना लवकर घरी पोहोचता यावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य परिवहन महामंडळाला मोफत बसची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.

नदीत व्यक्ती वाहून गेली : मुसळधार पावसाच्या दरम्यान, बुधवारी संध्याकाळी उपनगरातील मालाडमधील पोयसर नदीत एक 25 वर्षीय व्यक्ती वाहून गेली. मुंबई अग्निशमन दलाने पोलीस आणि स्थानिक रहिवाशांच्या मदतीने त्या व्यक्तीचा शोध मोहीम सुरू केली. परंतु अजूनही बेपत्ता आहे. मुसळधार पाऊस, अंधार आणि नदीतील पाण्याचा जोरदार प्रवाह यामुळे रात्री 8.15 च्या सुमारास शोध मोहीम मागे घेण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा :

  1. Maharashtra Rain Update : मुंबईसह कोकणात मुसळधार; यंत्रणांना सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
  2. Kolhapur Rain Update : पंचगंगा नदीचे पाणी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर; रांगणा किल्ल्यावर पर्यटक अडकले तर राऊतवाडी धबधब्याने दाखवले रौद्ररूप
  3. Two Youths Drowned : नांदेड शहराजवळ असलेल्या असना नदी पात्रात दोन युवकांचा बुडून मृत्यू

Last Updated : Jul 20, 2023, 8:25 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.