ETV Bharat / state

प्रदेश युवक काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस

author img

By

Published : Oct 5, 2019, 6:17 PM IST

प्रदेश युवक काँग्रेसकडून युवकांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला आहे.

पत्रकारांशी बोलताना सत्यजित तांबे

मुंबई - प्रदेश युवक काँग्रेसकडून युवकांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यामध्ये राज्यातील स्थानिक तरुणांना नोकऱ्यांमध्ये ८० टक्के राखीव जागा आणि बेरोजगारांना प्रति महिना पाच हजार रुपये देण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे.

प्रदेश युवक काँग्रेसकडून युवकांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला

युवक काँग्रेस कॉल बॅक ऑफ महाराष्ट्र 'उद्यासाठी आज..' हा जाहीरनामा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्यभरातील युवक काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. शहरातील तब्बल तीन कोटी तरुणांना भेटलो. तरूणांकडून लाखो सुचना आल्या असून त्यातील काही महत्त्वाच्या सूचना आम्ही जाहीरनाम्यात घेतल्या आहेत. आमच्या जाहीरनाम्यामध्ये शिक्षण, शिष्यवृत्ती आणि नोकरी या विषयांवर भर देण्यात आला आहे, अशी माहिती सत्यजीत तांबे यांनी दिली.

हेही वाचा - आरे प्रकरणी पर्यावरणप्रेमींकडून खोटा प्रचार -मुंबई मेट्रो प्रमुख अश्विनी भिडे

आमच्या पक्षाचे सरकार आले तर ३१ ऑक्टोबरपर्यंतचे सर्व शैक्षणिक कर्ज आम्ही माफ करू. शैक्षणिक कर्जाची प्रक्रिया महाविद्यालयात व्हावी, यासाठी उपाययोजना करू. खासगी, सरकारी वसतिगृह ही व्यवस्था अपुरी आहे. गुणवान विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेता यावे, यासाठी आर्थिक निकषांवर शिष्यवृत्ती देण्याचा कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत, अशी आश्वासनेही तांबे यांनी दिली.

हेही वाचा - राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांमध्ये ४० जणांचा समावेश

महापोर्टल बंद करून एमपीएससीच्या माध्यमातून जागा भरणार येतील. राज्यात युवक कल्याण नावाचे खाते अस्तित्वात नाही, आमचे सरकार आल्यास पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही ते स्थापन करू. राज्यात क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचा मानसदेखील तांबे यांनी बोलून दाखवला. गड किल्ल्याच्या सुशोभीकरण करून ते आंतरराष्ट्रीय दर्जाची पर्यटन केंद्र करण्याचा संकल्प आमच्या जाहीरनाम्यात केला आहे. स्टार्टअपसाठी ५०० कोटी रुपयांचे भागभांडवल आम्ही वेगळे ठेऊ. राज्यातील युवक सरकारच्या खोटेपणाला कंटाळले आहेत, त्यामुळे तेच सरकारला खेचून खाली आणतील, असा विश्वास सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केला.

Intro:Revise युवक काँग्रेसच्या जाहीरनाम्यात बेरोजगारांना प्रति महिना पाच हजार रुपये तर शैक्षणिक कर्जाची सरकार घेणार हमी

mh-mum-01-yuvakcong-mpkholhe-byte-7201153

(फीड mojo var पाठवले आहे)

मुंबई, ता. ५ :

प्रदेश युवक काँग्रेसकडून आज युवकांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यामध्ये राज्यातील स्थानिक तरुणांना नोकऱ्यांमध्ये ८० टक्के जागा राखीव ठेवण्यापासून ते बेरोजगारांना प्रतिमहिना पाच हजार रुपये देण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे युवक काँग्रेस कॉल बॅक ऑफ महाराष्ट्र 'उद्यासाठी आज..' हा राज्यातील तरुणांचा जाहीरनामा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला.यावेळी राज्यभरातील युवक काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.म्हणाले शहरातील तब्बल तीन कोटी तरुणांना भेटलो, त्यात त्यांच्याकडून लाखो सुचना आल्या असून त्यातील काही महत्त्वाच्या सूचना आम्ही जाहीरनाम्यात आणल्या आहेत. या जाहीरनाम्यामध्ये सर्वात महत्त्वाचे शिक्षण आणि शिष्यवृत्तीसोबत नोकरी या विषयावर भर देण्यात आला असल्याचे तांबे म्हणाले.

तांबे यांनी सांगितले की,आम्ही ३१ ऑक्टोबरपर्यंत सर्व शैक्षणिक कर्ज आमचे सरकार आपल्यानंतर माफ करू सगळ्या शैक्षणिक कर्जाची प्रक्रिया महाविद्यालयात व्हावी. यासाठी उपाययोजना करू, खाजगी, सरकारी वसतिगृह ही व्यवस्था अपुरी आहे, सरकारने मराठा समाजासाठी घोषणा केली परंतु ती पूर्ण केली नाही,ती आम्ही करू. राज्यात जी प्रमुख शहराजवळ मोठे वसतिगृह निर्माण केले जातील,गुणवान विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेता यावे, यासाठी आर्थिक निकषांवर बाहेर पाठवण्यासाठी सर्वांना शिष्यवृत्ती देण्याचा कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत. शेतकऱ्यांच्या मुलांना नवीन कर्ज मिळावे यासाठी सरकार जामीनदार राहील असा निर्णय आम्ही घेणार आहोत.सुशिक्षित बेरोजगारांना महिन्याला पाच हजार रुपये देण्याचं वचन आम्ही देत आहोत, तसेच पदवीचे शिक्षण झाल्यापासून दोन वर्षांपर्यंत आम्ही ही शिष्यवृत्ती देणार आहोत.महा पोर्टल बंद करून एमपीएससीच्या माध्यमातून जागा भरणार असून रिकाम्या असलेल्या दोन लाख जागा भरताना त्या ८० टक्के जागा या स्थानिकांना राखीव ठेवल्या जाणार आहेत.राज्यात युवक कल्याण नावाचे मंत्रालय अस्तित्वात नाही, ते आम्ही आमचे सरकार आल्यास पहिल्याच कॅबिनेट मध्ये स्थापन करू स्वतंत्र यंत्रणा कार्यरत करू आणि बालेवाडी क्रीडा संकुलप्रमाणे राज्यात आम्ही राज्यात क्रीडा विद्यापीठ आम्ही स्थापन करू आरोग्य आणि जीवन शैलीवर आम्ही काम करणार आहोत..राज्यात शालेय अभ्यासक्रमात आम्ही हा विषय आणू आणि पदवीपर्यंत आम्ही प्रवास मोफत देऊ सायबर चे शिक्षण हे शालेय जीवनापासून मिळावा यासाठी आम्ही तो विषय लागू करणार आहोत, आदी अनेक आश्वासने या जाहीरनाम्यात आम्ही देत असल्याचे तांबे म्हणाले.

गड किल्ल्याच्या संदर्भात आम्ही सुशोभीकरण करून ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे केंद्र आम्ही निर्माण करण्याचा संकल्प आम्ही आमच्या जाहीरनाम्यात करत आहोत.स्टार्टअप साठी ५०० कोटी रुपयांचे भागभांडवल आम्ही वेगळे ठेऊ असेही तांबे यांनी सांगितले. राज्यातील युवक सरकारच्या खोटेपणाला कंटाळले आहेत, त्यामुळे सरकारला खेचून खाली आणतील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Body:Revise युवक काँग्रेसच्या जाहीरनाम्यात बेरोजगारांना प्रति महिना पाच हजार रुपये तर शैक्षणिक कर्जाची सरकार घेणार हमीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.