मुंबई - राज्यात सत्तास्थापनेचा पेच सुटताना दिसत नाहीए. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आमदारांना रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. सध्या रंगशारदा हॉटेलबाहेर घडामोडींना वेग आला आहे. रंगशारदा हॉटेलमधील शिवसेना आमदारांना दुसरीकडे हलवण्यात येणार आहे. यासाठी दोन एसी बसेस मागवल्या गेल्या आहेत. मात्र, या आमदारांना कुठे नेण्यात येणार, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन १४ दिवस उलटूनही सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजप आणि शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. राज्यात सत्ता स्थापन न झाल्यामुळे आज राष्ट्रपती राजवट लागू होते का? याकडे सामान्य जनतेचे लक्ष लागले आहे.
या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आपले आमदार फुटू नये, यासाठी शिवसेनेने सर्व आमदारांना वांद्रे येथील रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यामुळे या भागाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. आमदारामागे एक शिवसेना विभागाप्रमुख, शाखाप्रमुख आणि तीन शिवसैनिक अशी तटबंदी ठेवण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.
आज २०१४ च्या सभागृहाचा कार्यकाळ संपत असल्यामूळे मुख्यमंत्री राजीनामा देण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे बाकी पक्ष आपले आमदार सुरक्षित ठिकाणी हलवताना दिसत आहेत. जर हा सत्ता पेच कायम राहिला तर राज्यपाल नेमका काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आपले आमदार फुटू नये, यासाठी शिवसेनेने सर्व आमदारांना वांद्रे येथील रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यामुळे या भागाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. आमदारामागे एक शिवसेना विभागाप्रमुख, शाखाप्रमुख आणि तीन शिवसैनिक अशी तटबंदी ठेवण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.