ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis : सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

author img

By

Published : Jul 3, 2023, 4:32 PM IST

Updated : Jul 3, 2023, 6:03 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. या दोघांनी पक्षविरोधी कारवाई केली असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Maharashtra Political Crisis
सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पक्षविरोधी कारवायांसाठी खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा केली. शरद पवार यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. शरद पवार म्हणाले की, 'मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने पक्षविरोधी कारवायांसाठी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचे पक्षाचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश देत आहे'.

  • I, as the National President, Nationalist Congress Party hereby order removal of the names of Shri Sunil Tatkare and Shri Praful Patel from the Register of Members of NCP Party for anti-party activities.@praful_patel @SunilTatkare

    — Sharad Pawar (@PawarSpeaks) July 3, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील

'बंडखोरांना पाच तारखेपर्यंत वेळ' : राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयामध्ये खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्ष नेते जितेंद्र आव्हाड यांच्यात बैठक झाली. या बैठकीत बंडखोरांना पाच तारखेपर्यंत वेळ दिला जाईल आणि त्यानंतरच पुढील कारवाईला सुरुवात केली जाणार असल्याचं ठरलं आहे. शरद पवार यांना मिळणारा लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता त्यांनी आपल्या मतदारसंघात येऊन आपल्या विरुद्ध सभा घेतली तर आपलं काय होईल अशी भीती आमदारांना आहे, असे जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.

'शरद पवार राज्यभर दौरा करतील' : जितेंद्र आव्हाड म्हणाले की, 'आमदार कुठेही गेले तरी ते सर्व परिस्थिती बघत आहेत. ते सोशल मीडियावर देखील ऍक्टिव्ह आहे. आजची परिस्थिती पाहता सोशल मीडियावर त्यांना कशाप्रकारे ट्रोल केलं जात आहे आणि शरद पवार यांना कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो आहे हे त्यांना कळतंच असेल. शरद पवार येणाऱ्या काळा राज्यातील दौरा सुरू करतील. त्यामुळे आता सोडून जाणारे आमदार आपलं काय होईल याचा विचार करत आहेत'.

'परवानगी शिवाय शरद पवारांचा फोटो वापरू नका' : जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, आम्ही नऊ आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवली आहे. गेलेले अनेक आमदार आमच्या सोबत प्रेमाने वागत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह माझे असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शरद पवारांचा फोटो वापरण्याची तुमच्याकडे परवानगी असेल तरच फोटो वापरा, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. तसेच महाविकास आघाडीच्या एकतेसाठी आम्ही उभे राहू, असेही ते म्हणले.

'नऊ आमदार वगळता इतरांसाठी दरवाजे खुले' : अजित पवार यांच्यासोबत गेलेले काही आमदार शरद पवार आणि माझ्या संपर्कात आहे. नऊ आमदार वगळता इतर आमदारांसाठी आमचे दरवाजे खुले आहेत. आम्ही पाच तारखेपर्यंत थांबणार आहोत. त्यानंतर आम्ही कारवाई करायला सुरुवात करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. तसेच आम्हाला काँग्रेसशी कोणताही संघर्ष करायचा नाही. विधानसभा अध्यक्ष संख्याबळानुसार निर्णय घेतील. यासाठी काही दिवस थांबावे लागेल, असे जयंत पाटील म्हणाले.

हेही वाचा :

  1. Maharshtra Political Crisis Live : अजित पवारांसोबत गेलेले आमदार लवकरच वेगळा निर्णय घेतील - शरद पवार
  2. Maharashtra Political Crisis : मंत्री पदासाठी इच्छुकांची कोंडी, दोन्ही पक्षातील 'हे' इच्छुक नाराज
  3. Maharashtra Political crisis: राहुल नार्वेकर-फडणवीस यांच्यात बैठक, जितेंद्र आव्हाड यांनी घेतला आक्षेप

Last Updated : Jul 3, 2023, 6:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.