मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करुन सरकारमध्ये सहभाग घेतला आहे. अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे शरद पवार चांगलेच अडचणीत सापडले आहेत. अजित पवार आपल्या साथिदारांसोबत मंत्रिमंडळात सहभागी झाल्यानंतर आज मंत्रिमंडळांची पहिलीच बैठक होणार आहे. ही बैठक सकाळी 11 वाजता मंत्रिमंडलात होणार आहे. त्यामुळे सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकत्र विचारमंथन करताना पाहायला मिळणार आहेत.
एकमेकांचे कट्टर विरोधक बैठकीत एकत्र : राष्ट्रवादी पक्षातील अनेक नेत्यांवर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी हल्लाबोल केला होता. मात्र आज होणाऱ्या पहिल्याच मंत्रिमंडलाच्या बैठकीत या नेत्यांच्या मांडीला मांडी लाऊन बसण्याची वेळ या मंत्र्यांवर आली आहे. तोच प्रकार राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बाबतीत झाल्याचे दिसून येते. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्र्यांवर विविध आरोप केले होते. मात्र आज त्यांच्यासोबत बैठकीला हे नेते एकत्र बसणार आहेत.
शरद पवारांची बंडखोरांवर कारवाई : अजित पवार यांनी बंडखोरी करुन सरकारमध्ये सहभाग घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे आक्रमक झाले आहेत. शरद पवार यांनी बंडखोरी करणाऱ्या सुनिल तटकरे आणि राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सोमवारी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांची हकालपट्टी केल्याचे स्पष्ट केले होते. मात्र त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना पत्र लिहिल्यानंतर शरद पवार चांगलेच आक्रमक झाले.
हेही वाचा -