ETV Bharat / state

Maharashtra Political crisis: राहुल नार्वेकर-फडणवीस यांच्यात बैठक, जितेंद्र आव्हाड यांनी घेतला आक्षेप - जितेंद्र आव्हाड

अजित पवार यांच्यासह मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या 8 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यातच आता विधानसभा अध्यक्षांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक घेतल्याने नवा वाद निर्माण झाल आहे.

Maharashtra Political crisis
Maharashtra Political crisis
author img

By

Published : Jul 3, 2023, 2:33 PM IST

Updated : Jul 3, 2023, 3:08 PM IST

मुंबई: अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने 9 आमदारांच्या अपात्रतेची शिफारस करणारे पत्र विधानसभा अध्यक्षांना लिहिले आहे. त्यावर योग्य कार्यवाही करू असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले. अशातच आता राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची फडणवीस यांच्या घरी बैठक झाली आहे. मात्र अपात्रतेची टांगती तलवार असताना नवनियुक्त विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनी या बैठकीबाबत आक्षेप घेतला आहे.

  • #WATCH | Maharashtra Assembly Speaker Rahul Narwekar reaches the residence of Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis where Deputy CM Ajit Pawar and other NCP leaders are present. pic.twitter.com/9bDUrAncLb

    — ANI (@ANI) July 3, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

खाते वाटपाबाबत मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील : या बैठकीबाबत मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, 'विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आले. काल शपथ घेतलेल्या 9 आमदारांच्या खाते वाटपाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतिम निर्णय घेतील. संजय राऊत यांच्या म्हणण्यावर लोकांचा विश्वास नाही. राष्ट्रवादीची अवस्था आता शिवसेनेसारखीच आहे'.

आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी राष्ट्रवादीची याचिका : सोमवारी पत्रकारांशी बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांना अपात्र ठरवण्यासाठीची याचिका मला दिली आहे. मी तिचे काळजीपूर्वक वाचन करेन. त्यांनी नमूद केलेल्या मुद्यांचा अभ्यास करून याचिकेवर योग्य ती कारवाई करेन'. राष्ट्रवादीच्या किती आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा आहे?, असे विचारले असता राहुल नार्वेकरांनी याबाबत काही माहिती नाही, असे म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, 'राष्ट्रवादीने अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या इतर आठ आमदारांविरुद्ध अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. निवडणूक आयोगाला देखील एक ई-मेल पाठवण्यात आला आहे'.

हे ही वाचा :

  1. Sanjay raut on maharashtra politics crisis : मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांना हटविण्यात येणार, 16 आमदार ठरणार अपात्र : संजय राऊत
  2. Raj Thackeray on NCP Split : 'पटेल, भुजबळ, वळसे पाटील हे पाठवल्या शिवाय जाणारे नेते नाहीत' सत्ता नाट्यावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया
  3. Maharashtra Political Crisis: अजित पवार आणि इतर 8 आमदारांना अपात्र ठरवण्याच्या राष्ट्रवादीच्या याचिकेवर योग्य ती कारवाई करू- राहुल नार्वेकर

Last Updated : Jul 3, 2023, 3:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.