ETV Bharat / state

NCP Political Crisis : अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांचा अजित पवारांना पाठिंबा; दुपारी शरद पवारांच्या बैठकीला होते हजर

अपक्ष आमदार देवेंद्र महादेवराव भुयार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. तसेच अजित पवार यांना भुयार यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. सकाळी वाय. बी. चव्हाण केंद्रात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीला भुयार यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे भुयार सकाळी शरद पवारांकडे तर, दुपारी अजित पवारांकडे दिसुन आल्याने चर्चेला उधाण आले आहे.

Political Crisis In NCP
Political Crisis In NCP
author img

By

Published : Jul 5, 2023, 10:35 PM IST

मुंबई : सकाळी शरद पवारांच्या सभेला उपस्थित असलेले मोर्शी मतदारसंघाचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला आहे. शरद पवार यांच्या मेळाव्यानंतर आमदार भुयार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन त्यांना पाठिंबा दिला. वाय. बी. चव्हाण केंद्रात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीला भुयार यांनी हजेरी लावली होती. भुयार सकाळी शरद पवारांकडे तर, दुपारी अजित पवारांकडे दिसुन आल्याने चर्चेला उधान आले होते. जवळपास 40 वर्षे काका शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर आमदारांसोबत पक्षांतर करून एनडीएत प्रवेश केला.

आमदारांसह सरकारमध्ये सहभागी : अजित पवारांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी, पवार कुटुंबात तेढ निर्माण झाली आहे. अजित पवार यांनी 40 आमदारांसह सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवारांसह आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावरही दावा केला.

राष्ट्रवादीत बंडखोरी : शिवसेनेतील बंडखोरीनंतर वर्षभरानंतर राष्ट्रवादीत बंडखोरी सुरू झाली. या लढतीत नेमकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र आज शरद पवार तसेच अजित पवार दोन्ही गटाची बैठक झाली.दोन्ही गटांकडून व्हीप जारी करण्यात आला. त्यामुळे आमदारांना नेमका कुणाचा व्हिप लागु होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकणाची राज्यात चर्चा सरु आहे. अजित पवार यांना आतापर्यंत 32 आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. तर, शरद पवार यांना 18 आमदारांचा पाठिंबा आहे.

दोन्ही गटाच्या बैठकी : शरद पवार आणि अजित पवार यांनी आज मुंबईत आपल्या समर्थकांची भेट घेतली. या सभेतून दोघांनीही शक्ती दाखविण्याचा प्रयत्न केला. अजित पवार यांच्या बैठकीला प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील यांसारख्या दिग्गज नेत्यांसह राष्ट्रवादीचे 30 आमदार उपस्थित होते. शरद पवार यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आवाड, रोहित पवार यांच्यासह १० आमदार होते.

कोणाकडे किती आहे ताकद? : सध्या राष्ट्रवादीच्या या संघर्षात पुतण्या काकांवर मात करताना दिसत आहेत. आकड्यांची बेरीज केली तर अजित पवारांची संख्या जास्त आहे. अजित पवारांच्या दाव्यानुसार त्यांना राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांचा पाठिंबा आहे. मात्र आजच्या बैठकीला 30 आमदार उपस्थित होते. पक्षांतर कायद्यांतर्गत अपात्रता टाळण्यासाठी त्यांना किमान 36 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.

हेही वाचा - NCP Delhi Meeting : शरद पवारांची ताकद दिल्लीत दिसणार का? गुरुवारी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.