ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षात पुतण्या पडतोय काकांवर भारी! जाणून घ्या कोणाकडे आहेत किती आमदार? - Ajit Pawar meeting

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवारांनी पक्षावर दावा केला असून त्यासाठी ते निवडणूक आयोगाकडे गेले आहेत. नंबर्सचा गेम पाहिला तर सध्या अजित पवारांचे पारडे जड आहे. तर दुसरीकडे शरद पवारांनीही हार मानलेली नाही. राष्ट्रवादीच्या या सत्तासंघर्षात जाणून घ्या कोणाकडे किती आमदार आहेत.

Maharashtra Political Crisis
महाराष्ट्राचे राजकीय संकट
author img

By

Published : Jul 5, 2023, 8:57 PM IST

मुंबई : मुंबईमध्ये आज शरद पवार आणि अजित पवार यांची समर्थकांसह बैठक झाली. या बैठकीद्वारे दोघांनीही शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. अजित पवार यांच्या बैठकीला प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील या बड्या नेत्यांसह राष्ट्रवादीचे 30 आमदार उपस्थित होते. तर शरद पवार यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांच्यासह 10 आमदारांची उपस्थिती होती.

Maharashtra Political Crisis
अजित पवार

कोणाकडे किती संख्याबळ? : सध्याच्या घडीला राष्ट्रवादीच्या या संघर्षामध्ये पुतण्या काकांवर भारी पडताना दिसत आहे. आकड्यांची बेरीज केली तर अजित पवारांकडे संख्याबळ जास्त आहे. अजित पवारांच्या दाव्यानुसार त्यांना राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांचा पाठिंबा आहे. मात्र आज झालेल्या बैठकीत 30 आमदारांची उपस्थिती होती. पक्षांतरबंदी कायदा अंतर्गत अपात्रता टाळण्यासाठी त्यांना किमान 36 आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे.

Maharashtra Political Crisis
शरद पवार

अजित पवारांसोबतचे आमदार : अजित पवार यांच्या गटात राष्ट्रवादीचे 30 आमदार आहेत. ते आमदार आहेत - अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, दिलीप मोहिते, अनिल पाटील, माणिकराव कोकाटे, दिलीप वळसे पाटील, आदिती तटकरे, राजेश पाटील, धनंजय मुंडे, धर्मराव आत्राम, अण्णा बनसोड, निलेश लंके, इंद्रनील नाईक, प्रकाश साळुंके, दत्तात्रय भरणे, संजय बनसोड, संग्राम जगताप, दिलीप बनकर, सुनील टिंगरे, सुनील शेळके, बाळासाहेब आजबे, दीपक चव्हाण, यशवंत माने, नितीन पवार, शेखर निकम, संजय शिंदे, राजू कोरमारे, बबन दादा शिंदे.

Maharashtra Political Crisis
छगन भुजबळ

शरद पवारांसोबतचे आमदार : शरद पवारांसोबत सध्या 10 आमदार आहेत. ते आमदार आहेत - जयंत पाटील, राजेश टोपे, अनिल देशमुख, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, राजेंद्र शिंगणे, बाळासाहेब पाटील, सुनील भुसारा, प्राजक्त तनपुरे, एकनाथ खडसे.

Maharashtra Political Crisis
सुप्रिया सुळे

अजित पवारांनी मनातली खदखद बोलून दाखवली : यावेळी बोलताना अजित पवार यांनी पहिल्यांदाच आपल्या मनातील खदखद प्रत्यक्ष बोलून दाखवली. ते म्हणाले की, आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो ही आमची चूक आहे का? हा प्रश्न विचारत त्यांनी अप्रत्यक्षरित्या शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवारांनी यावेळी शरद पवारांवरही निशाणा साधला. अध्यक्षपद सोडायचे नव्हते तर राजीनामाच कशाला दिला? असा सवाल त्यांनी यावेळी विचारला.

अजित पवारांनी केले मोदींचे कौतुक : यावेळी बोलताना अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही कौतूक केले. मोदींसारखे दुसरे नेतृत्व देशात नाही. देशाने कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत पंतप्रधान मोदींचे नेतृत्व मान्य केल्याचे ते म्हणाले. तसेच केंद्र सरकार राज्य सरकारला मदत करत असून राज्याला कोट्यावधीचा निधी मिळणार आहे, असा दावाही त्यांनी केला.

शरद पवारांचे भावनिक आवाहन : मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळावा झाला. या मेळव्यात बोलताना शरद पवारांनी भावनिक आवाहन केले. ते म्हणाले की, 'राष्ट्रवादीला 24 वर्षे पूर्ण झाली आहेत. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. मी माझ्या राजकीय जीवनात अनेक निवडणुका लढल्या. सातत्याने चिन्हेही बदलली. मात्र जोपर्यंत सामान्य माणूस आणि कार्यकर्ता माझ्यासोबत आहे तोपर्यंत मला चिंता करण्याचं कारण नाही'.

हेही वाचा :

  1. NCP Crisis : अजित पवारच राष्ट्रवादीचे अध्यक्ष; एकमताने ठराव मंजूर, पत्र निवडणूक आयोगाला पाठवले
  2. Sharad Pawar NCP Meeting : चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही; शरद पवारांचा कार्यकर्त्यांना विश्वास
  3. NCP Delhi Meeting : शरद पवारांची ताकद दिल्लीत दिसणार का? गुरुवारी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.