ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis: अजित पवारांच्या बंडानंतर काँग्रेस आणि ठाकरे गटाने बोलवली पदाधिकाऱ्यांची बैठक, ठाकरे पवारांची साथ देणार का? - ajit pawar join bjp

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. विधानभवनात काँग्रेस नेत्यांची तर शिवसेना भवन येथे ठाकरे गटाची बैठक होणार आहे. राज्यातील राजकीय घडामोडींवर यावेळी खलबते होणार आहे. पक्षाची भूमिका ठरवली जाणार आहे.

Maharashtra Political Crisis
काँग्रेस आणि ठाकरे गटाची बैठक
author img

By

Published : Jul 4, 2023, 11:34 AM IST

मुंबई : शरद पवार यांना धक्का देत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांना जवळपास 20 ते 25 आमदारांनी पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संख्याबळ कमी झाले आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस देखील फुटल्याने मोठी खळबळ माजली आहे. शरद पवार यांनी या राजकीय घडामोडींना विरोध दर्शवत पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांची हकालपट्टी करत आहेत.

पदाधिकाऱ्यांची बैठक : आगामी निवडणुका तोंडावर आल्या असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. काँग्रेसची विधानभवनात तर शिवसेना ठाकरे गटाची शिवसेना भवन येथे बैठक होणार आहे. काँग्रेसच्या बैठकीला राष्ट्रीय नेते एच के पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आदी वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. शिवसेना भवनातील बैठकीत उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन करणार आहेत.

ठाकरेंच्या बैठकीत होण्याची शक्यता : शिंदे गटाने भाजपला पाठिंबा देत राज्यात सत्ता स्थापन केले. शनिवारी या सत्तांतराला वर्ष पूर्ण होत असतानाच, भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांना सत्तेत सामावून घेतले. एकंदरीत राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसेने उद्धव ठाकरे यांना पाठिंबा द्यायला हवा, अशी मागणी मनसेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी केली. दादर येथे शिवसेना भवन समोर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं असे बॅनर ही झळकले. त्यामुळे आगामी काळात दोन्ही बंधू एकत्र यावेत, अशी चर्चा ठाकरेंच्या बैठकीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजकीय उलथापालथ : दुसरीकडे खासदार विनायक राऊत यांनी या राजकीय उलथापालथीनंतर उद्धव ठाकरे यांनी एकला चलोची भूमिका घ्यावी, अशी महाराष्ट्रातील जनता आणि शिवसेनेची भावना असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीला पाठिंबा देणार की वेगळी भूमिका घेणार, हे आजच्या बैठकीत ठरणार आहे. शिवसेना फुटली त्यावेळी शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला होता. ठाकरे देखील पवारांची साथ देणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा :

  1. Amol Kolhe Resign: खासदार डॉ. अमोल कोल्हे आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार, शरद पवारांसोबत पक्षात कार्यकर्ता म्हणून काम करणार
  2. Maharashtra Politics Crisis Update : पक्ष व चिन्हावर दावा करा, अजित पवारांना दिल्लीतून आदेश-संजय राऊत यांचा दावा
  3. Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादीतील बंडखोरीवर लालू प्रसाद यादव यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.