ETV Bharat / state

CM Eknath Shinde Resignation : मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याबाबत एकनाथ शिंदेंचे मोठे विधान; म्हणाले... - महाराष्ट्र सत्तासंघर्ष

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde Resignation) यांची खुर्ची धोक्यात आल्याचे अनेक विधाने विरोधकांनी केले आहेत. त्यावर आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी राजीनामा देणार आहे किंवा माझे मुख्यमंत्रीपद हे धोक्यात (NCP Crisis) आले आहे या सर्व अफवा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Jul 6, 2023, 4:21 PM IST

Updated : Jul 6, 2023, 4:52 PM IST

मुंबई - अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर (CM Eknath Shinde Resignation) अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. पण अजित पवार यांच्या प्रवेशानंतर एकनाथ शिंदे यांचे (NCP Crisis) मुख्यमंत्रीपद जाणार असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. तसे विधानेही विरोधी पक्षातील नेत्यांकडून केले जात आहे. या सर्वांना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण देत उत्तर दिले आहे.

  • #WATCH | It is all rumours...They (NCP)should introspect on what is happening in their party, says Maharashtra CM Eknath Shinde as he rubbishes his resignation rumours and also speaks on the split in NCP. pic.twitter.com/hwY1Gr9qUW

    — ANI (@ANI) July 6, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राजीनाम्याबाबतच्या सर्व अफवा आहेत. अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व स्विकारले आहे. तसेच महाराष्ट्रात विकास होत असल्याचेही त्यांनी मान्य केले - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

राजीनामाच्या अफवा - अजित पवार यांना सोबत घेऊन भाजप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पत्ता कट करणार असल्याचा गौप्यस्फोट विरोधकांकडून करण्यात येत आहे. खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी याप्रकारची विधाने केली होती. त्यामुळे आता शिंदे यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची धोक्यात असल्याची चर्चा सुरू होती. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे मी राजीनामा देणार या सर्व अफवा आहेत त्या अफवांमध्ये काहीच तथ्य नाही.

विकास होत असल्याचे पवारांनी केले मान्य - अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास व्यक्त केला आहे. राज्यात विकास होत असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. तसेच राज्यात डबल इंजिनाचे सरकार असण्याबाबत आमचे विचारही त्यांनी मांडले आहेत. त्यामुळे अजित पवार हे सोबत आल्याने त्यांच्या अनुभवाचा राज्याच्या विकासासाठी फायदा होईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यंनी दिली आहे.

शरद पवार गटावर टीका - अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यावरून भाजप आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर पक्ष फोडाफो़डीचे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत. त्यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीने त्यांच्या पक्षात काय चालले आहे याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे ते म्हणाले.

हेही वाचा -

  1. शरद पवारांनी दिल्लीत बोलावलेली बैठक बेकायदेशीर, अजित पवारांचा दावा
  2. MNS Shivsena Alliance : ठाकरे बंधू एकत्र येणार? मनसेने टाळी दिल्याची चर्चा; मनसे नेते म्हणाले....
  3. Maharashtra Political Crisis : 'एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला कुठलाही धोका नाही, तर अजित पवार...'

Last Updated : Jul 6, 2023, 4:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.