मुंबई: अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. सत्तेमधील शिंदे गट अस्वस्थ असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावला आहे. दुसरीकडे शिंदे गटातील नेत्यांना मंत्रीपद देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यांत उशिरा रात्री चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त 22 जुलै रोजी ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. त्या दिवशी रॅलीही काढण्यात येणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी दिली. पवार यांच्यासह आठ आमदार एकनाथ शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. अशातच अजित पवार यांचे ठाण्यात दुसरे कार्यालय सुरू होणार आहे. ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. अजित पवार यांच्याबरोबर शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ मानले जाणारे छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या आठ सहकाऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
Live Update-
- मंत्री हसन मुश्रीफ यांचे कोल्हापुरात जंगी स्वागत. मात्र मुश्रीफांच्या बॅनरवरील समरजीत गाटगे यांच्या बॅनरने लक्ष वेधले. पुढील आमदार आपणच असा घाटगे यांचा नारा.
- पंकजा मुंडे पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या आहेत. त्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. त्यांच्याशी संवाद करणार आहोत. राष्ट्रवादी सत्तेत आल्यामुळे काही जण नाराज आहेत. संवादाने मार्ग निघेल. पंकजा यांच्याशी राष्ट्रीय स्तरावली नेते संपर्क करणार आहेत.
- उद्धव ठाकरे गटाचा अत्यंत एकनिष्ठ मानल्या जाणाऱ्या नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहिले आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावरच ठाकरे गटाला हा मोठा धक्का आहे.
- राष्ट्रवादी पक्षाचाच विरोधी पक्ष नेता असणार आहे. आमच्याकडे 45 आमदार आहेत. आम्ही ओरिजनल राष्ट्रवादी आहोत. निवडणूक आयोगाकडे गेले, ते खरे राष्ट्रवादी नाहीत, असे विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
- भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहेत. अशातच त्यांनी भाऊ धनंजय मुंडे यांची घरी भेट घेऊन त्यांना ओवाळले. पंकजा मुंडे यांचे काँग्रेसमध्ये स्वागत असल्याचे काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे पत्रकार परिषदेत काय भूमिका जाहीर करतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.
- दिवंगत माजी आमदार रमेश वांजळे यांच्या पत्नी हर्षदा वांजळे, कन्या नगरसेविका पुणे महापालिका सायली वांजळे व मुलगा मयुरेश वांजळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करून आपला पाठिंबा व्यक्त केला. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष सुनील जी तटकरे यांची उपस्थिती होती.
महाविकास आघाडीतून फुटून राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सरकारमध्ये सामील झाल्याने राजकीय भूकंप झाला असताना आज रोजी ठाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित केली आहे. ही कार्यशाळा डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात होणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे हे मार्गदर्शन करणार आहेत. ठाणे काँग्रेसला बळ मिळावे याकरिता राज्यतील सर्व विभाग सेलची एकदिवसीय कार्यशाळा होणार आहे. त्याकरता राज्यातील अनेक नेत्यांची हजेरी लागणार आहे.
अजित पवार यांच्याकडून नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या- अजित पवार यांनी दीपक मानकर यांची पुणे शहराच्या राष्ट्रवादी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. प्रशांत जगताप हे राष्ट्रवादीचे विद्यमान शहराध्यक्ष आहेत. त्यांनी शरद पवार यांना पाठिंबा दिल्यानंतर अजित पवार यांनी हे पाऊल उचलले अजित पवार गटाने अनेक नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. अजित पवार गटाने गुरुवारी नरेंद्र राणे यांची पक्षाच्या मुंबई विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. राणे यांच्या नियुक्तीबद्दल अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले.
शिंदे गटाचे काही आमदार ठाकरे गटात येणार? राष्ट्रवादीचे नेते अजित पवार राज्य सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिंदे गटाचे काही आमदार संपर्कात असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी गुरुवारी केला. राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांना मंत्री करण्यात आल्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांनी ‘बंडखोरी’ सुरू केल्याचा त्यांनी दावा केला आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सेनेचे काही आमदार उद्धव ठाकरे यांची क्षमा मागू इच्छितात असे राऊत यांनी सांगितले.
हेही वाचा-