ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis Update: भ्रष्टाचार भाजपच्या रक्तात, जागा दाखविल्याशिवाय शांत बसणार नाही-नाना पटोले - Sharad Pawar News

शिंदे गटाच्या शिवसेनेतील बंडाप्रमाणे राष्ट्रवादीत बंड झाले आहे. त्याचप्रमाणे घटना घडत असताना अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्यामध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे आज दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेणार आहेत.

Maharashtra Political Crisis Update
अजित पवार शरद पवार न्यूज
author img

By

Published : Jul 6, 2023, 6:50 AM IST

Updated : Jul 6, 2023, 2:22 PM IST

मुंबई: राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पक्षावर अजित पवारांनी दावा केल्याने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेगाने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. शरद पवार यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची आज दिल्लीत बैठक बोलाविली आहे. आपणच राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचा दावा अजित पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात केला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यापूर्वी प्रफुल पटेल यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी निवड केली होती. मात्र, अजित पवारांबरोबरील बंडात सहभागी झाल्याने त्यांना पटेलांना हटविण्यात आले आहे. पक्षाचे खजिनदार सुनील तटकरे यांनाही पदावरून हटविण्यात आले आहे. अशा परिस्थितीत शरद पवार यांच्याकडून आजच्या बैठकीत नवीन नियुक्त्या होण्याची शक्यता आहे.

  • #WATCH | On Ajit Pawar's "retirement" remark for Sharad Pawar, RJD chief Lalu Prasad Yadav says, "Will he retire just because he says? Does an old man ever retire? In politics? No retirement in politics." pic.twitter.com/DRp7rMsXuD

    — ANI (@ANI) July 6, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Live Update

दुसऱ्याची घरे फोडणे एवढेच आयुध भाजपच्या जवळ-नाना पटोलेभाजप जनतेमध्ये संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न आहे. शेतकरी व गरिबांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. काँग्रेस महाविकास आघाडीला सोबत घेऊन ताकदीने लढणार आहे. भाजपला लोकांचे प्रश्न सोडवायचे नाहीत. काँग्रेसबाबत चुकीची माहिती पसरविली जात आहे. दुसऱ्याची घरे फोडणे एवढेच आयुध भाजपच्या जवळ आहे. सीबीआय, ईडीची भीती दाखन फोडाफोडी करण्यात येते. भ्रष्टाचार भाजपच्या रक्तात आहे. भाजपला जागा दाखविल्याशिवाय शांत बसणार नाही, असा निर्धार नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

  • #WATCH | Mumbai | I met Ajit Pawar today...He has made the right decision. I have been with him for many years...PM Narendra Modi is taking everyone together. Be it a Hindu, Muslim or a Dalit, PM Modi enjoys the support of everyone...Ajit Pawar told me that he had this thought in… pic.twitter.com/9dSPMN19P7

राष्ट्रवादीतील फूट खरी आहे- शरद पवार यांनी निवृत्त व्हावे, अशी अजित पवार यांनी बैठकीत जाहीरपणे इच्छा व्यक्त केली आहे. त्याबाबत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, की यावरून वर्षानुवर्षे कटुता असल्याचे दिसून येते. कदाचित पवार साहेबांच्या पक्षाच्या व्यवस्थापनात काही त्रुटी असू शकतात. आपल्या मुलीला पुढे करण्यासाठी त्यांनी काही लोकांना बाजूला केले असाव. पण या कौटुंबिक वादाचा परिणाम राज्याच्या राजकारणावर होत आहे. राष्ट्रवादीतील फूट खरी आहे. त्यामध्ये कटुता असल्याचे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या निवृत्तीबाबत आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की अजित पवार यांनी म्हटल्याने शरद पवार निवृत्त होणार आहेत का? वय झाल्याने राजकारणात निवृत्ती नसते, असे लालू प्रसाद यादव यांनी म्हटले.

  • #WATCH | On Ajit Pawar's "retirement" remark for Sharad Pawar, senior Congress leader Prithviraj Chavan says, "This shows the bitterness that was setting in for years. Maybe there were a few faults in Pawar Saheb's management of the party. Maybe he sidelined people to push… pic.twitter.com/qlxdrie0Ox

ठाकरे गटात जाण्याचा प्रश्न येणार नाही-उदय सामंतवर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आहे. काहीही न घडता गोष्टी पोहोचतात याचा खुलासा करणार आहे. मुख्यमंत्री राजीनामा देणार नाहीत. शिंदे संयमी नेतृत्व आहेत, सगळ्यांना सोबत घेऊन जाणारे आहेत. मुख्यमंत्री शिंदेंवर विश्वास असल्याचे बैठकीत ठरले. दोन पक्ष असताना तिसरा पक्ष सोबत आल्याने काहीही फरक पडणार नाही. आमदारांमध्ये बाचाबाची झाली, शिंदे मुंबईत आले, रामदास भाईंनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणार नाही असं म्हटले, हे सगळे चुकीचं आहे. चुकीच्या पद्धतीने प्रतिमा डागाळणे हे चुकीचे आहे. गद्दार आणि खोके यातून आमची मुक्ती झाली आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने पुढे जात आहोत. काही विनाकारण उद्योग करत आहेत. जनतेत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे. ठाकरे गटात जाण्याचा प्रश्न येणार नाही. सरकार आज उद्या पडेल असे सांगत होते. मात्र सरकार पडले नाही. त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री होतील, असे सांगितले जात आहे.

  • महाराष्ट्र काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत सुरू आहे. विरोधी पक्षनेते, राज्यातील सद्य राजकीय परिस्थिती आणि लोकसभा निवडणुकीवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

रामदास आठवले यांनी अजित पवारांची घेतली भेट- रामदास आठवले म्हणाले, की अजित पवारांनी योग्य निर्णय घेतला आहे. मी त्यांच्यासोबत अनेक वर्षांपासून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांना सोबत घेऊन चालले आहेत. हिंदू, मुस्लीम, दलित अशा सर्वांचा पंतप्रधान मोदींना सर्वांचा पाठिंबा आहे. अजित पवार यांनी मला सांगितले की, त्यांच्या मनात हा विचार बराच काळापासून होता.

  • अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्याने मनसेमध्येही नाराजीचे चित्र आहे. मनसे नेते अभिजीत पानसे यांनी ठाकरे गटाचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांची सामना कार्यालयात भेट घेतली आहे. ही भेट ठाकरे गट व मनसेच्या युतीबाबत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. याबाबत पुष्टी होऊ शकली नाही. पानसे यांनी राऊत यांची सदिच्छा भेट घेतली आहे. असे असले तरी राज्यात पुणे, मुंबई, बीड अशा विविध जिल्ह्यांमध्ये ठाकरे बंधुंनी पुन्हा एकत्र यावे, अशी मागणी जोर धरत आहे. याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेच अधिकृत भूमिका आगामी सभेत स्पष्ट करणार आहेत.
  • राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाल्यानंतर शरद पवार हे माध्यमांशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते बैठकीतील निर्णयाची माहिती देणार आहेत. तसेच पक्षावर पकड टिकविण्यासाठी काय करणार याविषयी बोलण्याची शक्यता आहे.
  • अजित पवारांची काही विधाने गंभीर आहेत. निवडणुका लागेपर्यंत जागा वाटपावर चर्चा नाही. अजित पवारांवर विश्वास ठेवला पाहिजे. त्यांनी सत्य स्थिती मांडली. शरद पवारांचा राजकीय आलेख बाहेर काढला आहे. अजित पवारांची भूमिका महाराष्ट्र हिताची आहे.
  • रामदास आठवले यांनी अजित पवारांची घेतली भेट- केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन अभिनंदन केले. रामदास आठवले हे आजवर सातत्याने राष्ट्रवादीवर टीका करत असल्याचे दिसून आले आहेत. मात्र, अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्याने राजकीय चित्र बदलले आहे.

सरकारमध्ये जाण्याआधी अभ्यास केला. कायदेतज्ज्ञांतचा सल्ला घेऊन पूर्ण विचाराने निर्णय घेतला आहे. आम्हाला अपात्र होण्याची भीती नाही. विश्वास बसल्यावरच पाऊले उचलली आहेत. कागदपत्रे सह्या करून निवडणूक आयोगाकडे दाखल केली आहेत. त्यावर अजित पवारांचे पक्षाचे अध्यक्ष म्हणून नाव आहे. आमच्या आमदारांना गोवा, सुरत व गुवाहाटी नाही. वर्षभरापूर्वीची स्थिती वेगळी होती. अजित पवारच पक्षाचे अध्यक्ष असणार आहेत, असा दावा छगन भुजबळ यांनी केला.

दिल्ली महापालिकेचा झटका-राष्ट्रवादीचे काढले बॅनर नवी दिल्ली नगरपरिषदेने (NDMC) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पोस्टर्स आणि होर्डिंग्स आज सकाळी काढले आहेत. राष्ट्रीय कार्यकारिणीनिमित्त शरद पवार हे दिल्लीत येत असताना त्यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर असलेले राष्ट्रवादीचे जुने पोस्टर्स आणि होर्डिंग्ज पक्षाच्या दिल्लीतील कार्यालयाबाहेरून हटवण्यात येत आहेत. त्यावर 'गद्दार' (देशद्रोही) लिहिलेले एक नवीन पोस्टर तेथे लावण्यात येत आहे.

शरद पवार यांच्या बैठकीला हजर राहणारे आमदार देवेंद्र भुयार हे रात्री अजित पवार यांच्या गटात सहभागी झाले. आज सकाळी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी अजित पवार यांची भेट घेतली. त्यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. माजी आमदारांसह आमदारांचा अजित पवार गटाला अधिक पाठिंबा मिळाला आहे. हे पाहता शरद पवार गटामुळे मोठे आव्हान उभे निर्माण होत आहे.

शरद पवारांच्या निवासस्थानी होणार बैठक- शरद पवार दिल्लीतील बैठकीसाठी रवाना झाले आहेत. ही बैठक शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी होणार आहेत. या बैठकीला सुप्रिया सुळे, जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत. शरद पवार यांच्यासोबत १६ आमदार आहेत. तर अजित पवार यांच्याकडे ३२ आमदार असल्याचे बैठकांमधून दिसून आले आहे. या बैठकीला इतर राज्यातील राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रवादीत आणखी उलथापालथ होण्याचा अंदाज- वांद्रे येथील बैठकीनंतर अजित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. रात्री उशिरा अजित पवार पटेल यांच्या निवासस्थावरून बाहेर पडले आहेत. शरद पवार यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची बोलाविली बैठक, आगामी रणनीती यावर चर्चा झाल्याची शक्यता होत आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवार यांनी थेट शरद पवारांवर टीका केल्याने राष्ट्रवादीत आणखी उलथापालथ होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

अजित पवार विरुद्ध शरद पवार- बुधवारी अजित पवार आणि शरद पवार यांनी स्वतंत्र बैठका घेतल्या आहेत. अजित पवार यांनी बैठकीत शरद पवारांवर टीका केली आहे. वय झाले आहे, तुम्ही थांबणार का, असा सवाल केला आहे. आपल्यालाही मोठ्या पदाची अपेक्षा आहे, असे सांगत अजित पवार यांनी मुख्यमंत्री पद हुकल्याची निराशा व्यक्त केली. दुसरीकडे शरद पवार यांनी अजित पवार यांच्या गटातील नेत्यांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर दिले आहे. भाजपचे हिंदुत्व हे विभाजनवादी, विद्वेषाचे आहे, तर शिवसेनेचे हिंदुत्व हे सर्वसमावेशक, सर्व जाती-धर्मांना घेऊन जाणारे असल्याचे शरद पवार यांनी म्हटले. भाजपबरोबर युती न करण्याचे कारण म्हणजे, भाजपसोबत गेल्याने पक्ष संपत असल्याचे सांगत त्यांनी अकाली दलाचे उदाहरण दिले. नागालँड ही चीन सीमेनजीक भाग असल्याने देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने तिथे भाजपबरोबर युती करावी लागल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे यांचा इशारा- छगन भुजबळ यांच्यासह अजित पवारांनी शरद पवारांवर टीका केल्यानंतर खासदास सुप्रिया सुळे संतापल्या आहेत. त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमधील बैठकीत शरद पवारांच्या टीकेला उत्तर दिले, त्या म्हणाल्या, की माझ्यावर किंवा इतर कोणत्याही व्यक्तीवर टीका सहन करू शकते. मात्र वडिलांच्या विरोधात टीका सहन करणार नाही. शरद पवार हे कार्यकर्त्यांसाठी वडिलांसारखे आहेत. आमची खरी लढाई भाजपच्या कार्यपद्धतीविरुद्ध आहे, कोणा एका व्यक्तीविरुद्ध नाही, असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

कार्यकारिणीत महत्त्वाचे ठराव होण्याची शक्यता- अजित पवार गटाकडून नवीन नियुक्त्या करण्यात येत आहेत. तर शरद पवार गटाकडून अजित पवारांच्या बैठकीला उपस्थित राहणारे व त्यांना पाठिंबा देणाऱ्या नेत्यांसह कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीत काय महत्त्वाचे निर्णय होणार आहेत, हे पाहणे औत्सुक्य ठरणार आहे. राष्ट्रवादीचे चिन्हाचा मुद्दा हा निवडणूक आयोगामध्ये पोहोचल्याने कार्यकारिणीत त्या संदर्भात ठराव होण्याची शक्यता आहे.

अजित पवारांच्या बंडानंतर अजित पवार राजीनामा देणार का? राष्ट्रवादीचे नेते आणि अजित पवार यांनी मंंत्रीपदाची शपथ घेतल्याने एकनाथ शिंदे गटातील अस्वस्थता जाहीर प्रकट होत आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांनी शिंदे गटाच्या नेत्यांची वर्षा बंगल्यावर बैठक घेतली. बैठकीनंतर मंत्री उदय सामंत म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खासदार, आमदारांनी भविष्यात काय करावे, विकासकामे कशी करायची, संघटना कशी वाढवायची यावर चर्चा झाली आहे. आमच्या आमदारांमध्ये कुठेही नाराजी नव्हती. आमचा एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास आहे. वर्षा बंगल्यावरील बैठकीनंतर मंत्री शंभूराज देसाई यांनीदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्ट केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदेच राहणार असे नागपुरात माध्यमांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा-

  1. Maharashtra Political Crisis : मंत्रीपद हुकले, तिकिटाचीही गॅरंटी नाही...राष्ट्रवादीच्या सत्तेतील प्रवेशाने शिंदे गटात अस्वस्थता!
  2. NCP Political Crisis : अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांचा अजित पवारांना पाठिंबा; दुपारी शरद पवारांच्या बैठकीला होते हजर
  3. Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षात पुतण्या पडतोय काकांवर भारी! जाणून घ्या कोणाकडे आहेत किती आमदार?

Last Updated : Jul 6, 2023, 2:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.