मुंबई : गेल्या नऊ महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या अशा सत्ता संघर्षावर उद्या निर्णय येणार आहे. यामुळे 16 आमदारांच्या अपात्रतेवर हा निर्णय अवलंबून असल्याने या निर्णयानंतर तीन विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. काय आहेत त्या शक्यता ?
काय आहे पहिली शक्यता? : शिंदे गटातील 16 आमदारांनी अपात्रतेला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यावर निर्णय येताना या आमदारांनी पक्षाचा व्हीप झुगारून दिला आणि पक्षशिस्त मोडली. या कारणास्तव या 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालय कायम करू शकते. तसे झाल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पायउतार व्हावे लागेल. अशा स्थितीत राज्य सरकार कोसळू शकते.
दुसरी शक्यता काय? राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भूमिका या सर्व प्रकरणांमध्ये अत्यंत संशयास्पद राहिली. राज्यपालांनी एकनाथ शिंदे गट शिवसेनेतून फुटला आहे की नाही हे स्पष्ट नसताना एकनाथ शिंदे गटाला सरकार स्थापन करण्यासाठी आणि बहुमत सिद्ध करण्यासाठी संधी दिली. एकनाथ शिंदे गटाने सत्ता स्थापनेसाठी कुठलाही दावा केला नसताना आणि पत्र दिले नसताना राज्यपालांनी अशा पद्धतीने सरकार स्थापन करण्याची संधी देणे हे घटनाबाह्य असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले आहे या संदर्भातला निकाल येऊन जर राज्यपालांची कृती बेकायदेशीर ठरवली तर शिंदे सरकारही बेकायदेशीर ठरते त्यामुळे शिंदे सरकारला पायउतार व्हावे लागेल.
काय आहे तिसरी शक्यता? : सर्वोच्च न्यायालयाने जर 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांच्या कक्षेत आहे त्यांनी तो निर्णय घ्यावा असे म्हटले आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी जेव्हा यांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही असे मान्य केल्यास विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निर्णय घेण्यास पात्र ठरतील त्यामुळे आपसूकच सोळा आमदारांवरील अपात्रतेची कारवाई रद्द होऊ शकते. तसे झाल्यास सरकारला कुठलाही धोका राहणार नाही.
- Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या निकालावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया
- Maharashtra political Crisis: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या निकाल, सुप्रीम कोर्टाची माहिती
- Maharashtra Political Crisis: न्यायमूर्ती शाह यांच्या निवृत्तीपूर्वीच महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल - उज्वल निकम