ETV Bharat / state

Breaking News : पुण्यात नव्या विषाणूची एन्ट्री, जॅपनीज इन्सेफेलायटीसचा रुग्ण आढळला

author img

By

Published : Dec 1, 2022, 6:36 AM IST

Updated : Dec 1, 2022, 7:28 PM IST

Maharashtra Breaking news
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

19:25 December 01

पुण्यात नव्या विषाणूची एन्ट्री, जॅपनीज इन्सेफेलायटीसचा रुग्ण आढळला

पुणे : शहरात प्रथमच 'जॅपनीज इन्सेफेलायटीस' (जेई) अर्थात मेंदूज्वरचा रुग्ण आढळून आला आहे. ही बाधा झालेल्या वडगाव शेरी येथील ४ वर्षाच्या बालकावर ३ नोव्हेंबरपासून ससून रुग्णालयात बालरोग विभागात उपचार सुरू आहेत. मंगळवारी त्याचा अहवाल एनआयव्हीमधून आला. तो 'जेई' पॉझिटिव्ह आहे. त्यानुसार आरोग्य विभागाकडून रुग्णाच्या परिसरातील ताप व डासांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

18:40 December 01

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्व्हर डाऊन

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्व्हर डाऊन असल्याने गर्दी सामान्यपेक्षा थोडी जास्त आहे. गर्दीचे व्यवस्थापन व्यवस्थित केले जात आहे. मॅन्युअल पास दिले जात असल्याने गोंधळ नाही, अशी माहिती मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीआयएसएफने दिली आहे.

18:07 December 01

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 56.88% मतदान

गुजरातमध्ये सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 56.88% मतदान झाले आहे.

17:38 December 01

कर्नाटकने थेट दुष्काळी भागात पाणी सोडून जनतेच्या भावनांना घातली साद

सांगली - कर्नाटक सरकारकडून पुन्हा महाराष्ट्र सरकारला डिवचण्यात आले आहे. पाण्याच्या मुद्द्यावरून कर्नाटकमध्ये येण्याचे निमंत्रण दिल्यानंतर आता थेट कर्नाटक सरकारकडून दुष्काळी भागामध्ये कर्नाटकच्या योजनेतून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातल्या तिकोंडी येथील तलाव एका दिवसातच ओव्हरफ्लो झाला आहे. पाण्यासाठी 42 गावातल्या भावना कर्नाटकमध्ये जाण्यासाठी तीव्र झालेल्या असताना, कर्नाटक सरकारकडून दुष्काळग्रस्तांच्या भावनांना साद घालण्याचे काम करण्यात आले आहे.

17:11 December 01

एमपीएससीच्या नियुक्तीपत्र देण्याच्या आजच्या कार्यक्रमाविरोधात उच्च न्यायालयात याचिका, सुनावणी सुरू

मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नियुक्त झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याच्या आजच्या कार्यक्रमाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सेंटरमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती आज रात्री कार्यक्रम होणार आहे. तीन उमेदवारांनी याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याबाबत मुख्य न्यायमूर्तींपुढे तातडीची सुनावणी सुरू आहे.

16:44 December 01

संजय राऊत यांना 7 फेब्रुवारीला बेळगाव न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

बेळगाव - खासदार संजय राऊत यांना 7 फेब्रुवारीला बेळगाव न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बेळगावमध्ये प्रशोभक भाषण केल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना आज हजर राहण्याचे समन्स बजावले होते. व्यक्तिगत कारणामुळे उपस्थित राहू शकत नसल्याचे संजय राऊत यांनी वकिलांमार्फत न्यायालयाला कळवले होते. आज याप्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान राऊत यांच्या वकिलांनी संजय राऊत यांना हजर राहण्यासाठी पुढील तारीख देण्याची विनंती केली. त्यानुसार, न्यायालयाने 7 फेब्रुवारी ही तारीख दिली आहे.

16:21 December 01

क्रिकेट सल्लागार समिती सदस्यपदी सुलक्षणा नाईकसह तिघांची नियुक्ती

मुंबई - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अशोक मल्होत्रा, जतिन परांजपे आणि सुलक्षणा नाईक यांची क्रिकेट सल्लागार समिती (CAC) सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.

15:50 December 01

जितेंद्र आव्हाड लवकरच छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर काढणार चित्रपट

ठाणे - जितेंद्र आव्हाड लवकरच छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर काढणार चित्रपट. छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, शाहू महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास दाखवणार. सध्या सुरु असलेल्या इतिहासाच्या विकृतीवरून आता खरा इतिहास चित्रपटातून दाखवणार असल्याचे आव्हाडांचे वक्तव्य. पुढल्या वर्षात चित्रपट येणार नागरिकांच्या भेटीला.

15:39 December 01

गुजरातच्या पहिल्या टप्प्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 48.48% मतदान

गांधीनगर - भारतीय निवडणूक आयोगानुसार गुजरातच्या पहिल्या टप्प्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 48.48% मतदान झाले.

15:30 December 01

रेशीमबाग परिसरातील स्फोटाच्या धमकी प्रकरणी एकाला अटक

नागपूर - सक्करदरा पोलीस स्टेशनमध्ये 25 नोव्हेंबर रोजी एक निनावी पत्र आले होते. रेशीम बाग परिसरात स्फोट घडवू असे त्या धमकीचे पत्रात लिहिले होते. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी नागपूरच्या झिरो माइल येथील पोस्टात निनावी पत्र पेटीत टाकणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. त्याची सखोल चौकशी करण्यात आली आणि त्या व्यक्तीने हो हे धमकीचे निनावी पत्र मीच लिहिले आहे असे कबूल केले आहे.

15:25 December 01

नागपुरात सुपारी व्यापाऱ्याच्या आस्थापनांवर छापेमारी

नागपूर - अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी येथील सुपारी व्यापाऱ्याच्या आस्थापनांवर छापेमारी केली. या कारवाईमुळे नागपूरच्या सुपारी व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. शहरातील सुपारीकिंग छटवाल यांना आसाम पोलिसांनी अटक केल्याच्या बातमीनंतर प्रकाश गोयल, आसिफ कलीवाला, दिग्विजय ट्रान्सपोर्टचे हिमांशु भद्रा यांच्यावरही छापे मारल्याने सुपारी व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

15:16 December 01

मालेगाव स्फोट खटल्यातील आरोपींनी दोषमुक्तीची याचिका घेतली मागे

मुंबई - मालेगाव स्फोट खटल्यातील आरोपींनी दोषमुक्तीसाठीची याचिका उच्च न्यायालयातून मागे घेतली आहे. या प्रकरणातील आरोपी प्रसाद पुरोहित यांनी दोष मुक्तीचा अर्ज मागे घेतला आहे. सोमवारच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने याचिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. सत्र न्यायालयातील खटल्यात 200 हून अधिक साक्षीदार तपासून झाले आहेत. खटल्याच्या या टप्यावर दोषमुक्ती कशी देता येईल? असा सवाल उच्च न्यायालयाने विचारला आहे.

14:13 December 01

चेतक हेलिकॉप्टरचे बारामती एअरफील्डच्या जागेत आपत्कालीन लँडिंग

पुणे - IAF च्या चेतक हेलिकॉप्टरने आज एका तांत्रिक समस्येमुळे बारामती एअरफील्डच्या लहान मोकळ्या जागेत आपत्कालीन लँडिंग केले. चालक दल आणि हेलिकॉप्टर सुरक्षित आहेत. हेलिकॉप्टरची दुरुस्ती सुरू आहे. विंग कमांडर आशिष मोघे, पीआरओ, हवाई दल यांनी ही माहिती दिली.

14:07 December 01

श्रद्धा हत्याकांड : आरोपी आफताबची नार्को चाचणी पूर्ण

श्रद्धा हत्याकांड : आरोपी आफताबची नार्को चाचणी पूर्ण झाली आहे. सागर प्रीत हुडा, विशेष सीपी (कायदा व सुव्यवस्था), दिल्ली पोलिस यांनी ही माहिती दिली आहे. यानंतर या चाचणीचे विश्लेषण करण्यात येईल. तसेच त्यानुसार पुढील तपासाची दिशा ठरणार आहे. श्रद्धा खून प्रकरणात FSL टीम आणि आंबेडकर हॉस्पिटलच्या टीमने (आफताब पूनावाला यांची) नार्को टेस्ट केली. ही चाचणी 2 तासांपेक्षा जास्त चालली. टीममध्ये फॉरेन्सिक लॅब रोहिणीचे मानसशास्त्रज्ञ, फोटो तज्ज्ञ आणि आंबेडकर हॉस्पिटलचे डॉक्टर होते. एस गुप्ता सहायक संचालक, फॉरेन्सिक सायन्स लॅब, रोहिणी, यांनी ही माहिती दिली.

13:46 December 01

तुमच्या Twitter फॉलोअर्सच्या संख्येत घट होणार, ट्वि्टरने सुरू केली स्मॅम अकाउंटची साफसफाई

Twitter सध्या बरीच स्पॅम-स्कॅम खात्यांची साफ सफाई करत आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या फॉलोअर्सच्या संख्येत घट दिसून येईल, असे ट्विटरचे नवीन मालक एलोन मस्क यांनी म्हटले आहे. तशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

13:37 December 01

राज्यपालांना हटवले नाही तर अधिवेशन होऊ देणार नाही - कैलास गोरंट्याल

जालना - महापुरुषांच्याबद्दलच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज जालना शहरात आमदार कैलास गोरंट्याल यांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय बैठक बोलण्यात आली होती. या बैठकीत सत्ताधारी पक्ष सोडून सर्व पक्ष सामील झाले. नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन चालू न देण्याचा इशारा देखील कैलास गोरंट्याल यांनी यावेळी दिला. मुख्यमंत्र्यांनी या वाचाळ वीरांना आवर घालावा व राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना ताबडतोब परत पाठवावे यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.

13:34 December 01

इमान विकलेल्या गद्दारांची तुलना छत्रपती शिवरायांशी करणे हे हिंदुत्व नाही - आदित्य ठाकरे

मुंबई - इमान विकलेल्या गद्दारांची तुलना छत्रपती शिवरायांशी करणे हे हिंदुत्व नाही, हा महाराष्ट्र द्वेष आहे! असे ट्विट माजीमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. ‘महाराष्ट्राचं खच्चीकरण’ हेच या खोके सरकारचं ध्येय आहे! असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

13:15 December 01

तांत्रिक बिघाडाने बारामती तालुक्यात वायूदलाच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

बारामती : पुण्यावरून हैद्राबादला निघालेले भारतीय वायुदलाचे हेलिकॉप्टर अचानकपणे तांत्रिक बिघाड झाल्याने खांडज गावातील शेतात उतरवले आहे. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

12:58 December 01

दिव्यांग मंत्रालयाचा मंत्री झालो तर आवडेल - बच्चू कडू

पुणे - मंत्रीमंडळ विस्तार हा प्रश्न देवेंद्र, शिंदे यांना विचारा असे स्पष्ट मत आ. बच्चू कडू यांनी मांडले आहे. संजय राऊत यांच्या बोलण्यात काही प्रमाणात तथ्य आहे, असेही ते म्हणाले आहेत. तिन्ही शक्ती जरी एकत्र आल्या तरी जनशक्तीचे काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दिव्यांगांच्या प्रश्नासाठी दहावेळा भेटलो त्याबाबत काहीही झाले असा टोला ठाकरांना लगावला. दिव्यांग मंत्रालयाचा मंत्री झालो तर आवडेल, असे सूचक वकत्व्यही त्यांनी केले.

12:47 December 01

नवनीत राणा रवी राणा यांच्याविरुद्ध जामीन पात्र वॉरंट जारी

मुंबई - खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. हनुमान चालीसा प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयातून जामीन पात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा प्रकरणानंतर खार पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल केला होता. राणा दाम्पत्याला 11 नोव्हेंबरपर्यंत हजर राहण्याचे निर्देश दिले असताना देखील हजर न झाल्याने अखेर आज जामीन पात्र वॉरंट जारी करण्यात आले.

12:31 December 01

मंगल प्रभात लोढा यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रा सुटकेची तुलना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी केल्याने राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. शिवसेना ठाकरे गटानेही आक्रमक पवित्र घेतला आहे. आज काही ठिकाणी उग्र निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

12:20 December 01

आफताबच्या नार्को चाचणीची प्रक्रिया आज सकाळपासून सुरू

श्रद्धा हत्याकांड : आरोपी आफताबच्या नार्को चाचणीची प्रक्रिया आज सकाळपासून सुरू झाली आहे. विशेष पोलीस अधीक्षक सागर प्रीत हुडा यांनी ही माहिती दिली.

12:14 December 01

गुजरात - पहिल्या टप्प्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 18.95% मतदान

गुजरात - पहिल्या टप्प्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 18.95% मतदान झाले आहे. यामध्ये राज्यातील काही मान्यवरांनी मतदान केले.

12:12 December 01

दिल्ली उच्च न्यायालयाची शशी थरूर यांना नोटीस

नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांनी फेरतपासणी याचिका दाखल करण्यात दिरंगाईबद्दल माफी मागितलेल्या अर्जावर, दिल्ली उच्च न्यायालयाने शशी थरूर यांना नोटीस बजावली. न्यायालयाने हे प्रकरण 7 फेब्रुवारी 2023 रोजी सुनावणीसाठी निश्चित केले आहे.

11:46 December 01

गंगापूर रस्त्यावर चक्का जाम आंदोलन, शेतकरी आक्रमक

औरंगाबाद - पीकविमा कंपनी धोरण आणि शेतकऱ्यांना मदत मिळावी याकरिता शिवसेना उध्दव ठाकरे गट आक्रमक. गंगापूर रस्त्यावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. रस्त्यावर चारा जाळून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलनाचे नेतृत्व विरोधपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केले. रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी कारवाई करत अंबादास दानवे यांना कार्यकर्त्यांसह ताब्यात घेतले आहे.

11:43 December 01

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची पत्रकार संघात हुल्लडबाजी

पुणे - कार्यक्रमाला आलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची पत्रकार संघात हुल्लडबाजी. पोलिसांकडून शिस्त पाळण्याची सूचना देऊनही हुल्लडबाजी सुरूच.

11:26 December 01

बेईमान व्यक्तीशी तुलना करून छत्रपती शिवरायांचा अपमान-संजय राऊत

उद्या नाशिक दौऱ्यावर जाणार आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर पहिला दौरा आहे. बेईमान व्यक्तीशी तुलना करून छत्रपती शिवरायांचा अपमान केला जात आहे. राज्यपालांच्या विरोधात निंदा करणारा ठराव केला जाऊ शकतो, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

10:58 December 01

हॉक फोर्स सोबत झालेल्या चकमकीत दोन नक्षलीला मारण्यात यश

गडचिरोली: मध्यप्रदेशातील बालाघाट- मंडला जिल्ह्याच्या सीमेवर जंगलात आज हॉक फोर्स सोबत झालेल्या चकमकीत दोन नक्षलीला मारण्यात यश आले आहे. भोरमदेव कमेटी पीएल-2 चा एसीएम कमांडर राजेश होता तर दुसरा गणेश मडावी वर्ष 27 हा गडचिरोली च्या एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलिस मदत नैनगुढा गावचा रहिवासी होता. तो विस्तार प्लाटून न. 3 चा सेक्शन कमांडर पदावर कार्यरत होता. त्याच्यावर मध्यप्रदेश 3 लाख, महाराष्ट्र 4 लाख, छत्तीसगड 5 लाख असे एकूण 12 लाखाचा बक्षीस जाहीर केले होते. तर एक महिला नक्षली घटनास्थळावरून फसार झाल्याची माहिती आ.हे राजेश हा छत्तीसगडच्या झीरम घाटीच्या घटनेच मास्टर माईंड होता.

10:48 December 01

क्रिकेटर रवींद्र जडेजाने जामनगरमध्ये केले मतदान

क्रिकेटर रवींद्र जडेजाने जामनगर येथील मतदान केंद्रावर मतदान केले. त्यांची पत्नी आणि भाजप उमेदवार रिवाबा जडेजाने आज राजकोटमध्ये मतदान केले. रवींद्र जडेजा म्हणाला की, मी जनतेला मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन करतो.

10:47 December 01

क्रिकेटर रवींद्र जडेजाचे वडील आणि बहिणीने केले मतदान

क्रिकेटर रवींद्र जडेजाचे वडील अनिरुद्धसिंह आणि बहीण नयना यांनी जामनगरमधील मतदान केंद्रावर मतदान केले आहे. रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा जामनगर उत्तरमधून भाजपच्या उमेदवार आहेत तर अनिरुद्धसिंह आणि नैना यांनी काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला आहे.

10:11 December 01

लाइव्ह स्ट्रिमिंगदरम्यान कोरियन युट्यूबरचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांना अटक

मोबीन चंद मोहम्मद शेख आणि मोहम्मद नकीब सदरेलम अन्सारी या दोन तरुणांना लाइव्ह स्ट्रिमिंगदरम्यान एका कोरियन युट्यूबरचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. खार पोलिसांनी आयपीसी 354 अंतर्गत एफआयआर नोंदवला आणि दोघांनाही अटक केल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.

10:05 December 01

गुजरात निवडणूक पहिल्या टप्प्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ४.९२ टक्के मतदान

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात आज मतदान होत आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत ४.९२ टक्के मतदान झाले आहे.

09:32 December 01

आज भारत अधिकृतपणे जी २० चे स्वीकारणार अध्यक्षपद, फ्रान्ससह सिंगापूरने केले स्वागत

आज भारत अधिकृतपणे G20 चे अध्यक्षपद स्वीकारत आहे. सिंगापूरच्या वतीने, आम्ही भारताचे हार्दिक अभिनंदन करू इच्छितो. पुढील वर्ष आव्हानात्मक असेल. आम्ही G20 प्रक्रियेत भारताच्या नेतृत्वाची वाट पाहत आहोत, सिंगापूरचे उच्चायुक्त सायमन वोंग यांनी म्हटले आहे.

08:58 December 01

मोदींची जादू प्रत्येक वेळी, सर्वत्र काम करते- सी आर पाटील

मोदींची जादू प्रत्येक वेळी, सर्वत्र काम करते. ते लोकांच्या हृदयात आहेत. त्यांचा त्याच्यावर विश्वास आहे आणि ते त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास सक्षम आहेत, असे गुजरात भाजपचे प्रमुख सीआर पाटील यांनी म्हटले आहे.

08:45 December 01

गुजरात निवडणूक : सायकलवर गॅस सिलिंडर घेऊन काँग्रेस आमदार परेश धनानी पडले घराबाहेर

इंधन दरवाढीचा मुद्दा अधोरेखित करत सायकलवर गॅस सिलिंडर घेऊन मतदान करण्यासाठी काँग्रेस आमदार परेश धनानी त्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडले.

08:03 December 01

2 कोटींहून अधिक मतदार राजकीय पक्षांचे भवितव्य ठरवणार, गुजरातमध्ये मतदान सुरू

गुजरातच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान सुरु झाले आहे. कच्छ, सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधील 19 जिल्ह्यांतील 89 मतदारसंघांमधील 2 कोटींहून अधिक मतदार राजकीय पक्षांचे भवितव्य ठरवणार आहेत.

07:29 December 01

भारतीयांपेक्षा आम्ही स्मार्टफोन वापरण्यात मागे आहोत-जर्मन राजदूत फिलिप अकरमन

डिजिटायझेशनच्या बाबतीत आपण भारताकडून बरेच काही शिकू शकतो. मी येथे 3.5 महिन्यांपासून आहे आणि डिजिटायझेशन ज्या प्रकारे देशभर पसरले आहे ते पाहून मी आश्चर्यचकित झालो आहे. लोक ज्या प्रकारे स्मार्टफोन वापरतात ते पाहता आम्ही खूप मागे आहोत, असे जर्मन राजदूत फिलिप अकरमन यांनी म्हटले आहे.

06:53 December 01

जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे- रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा

आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. भाजपच्या सर्व उमेदवारांच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे. मी लोकांना जास्तीत जास्त मतदान करण्याची विनंती करते, असे रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजाने म्हटले आहे. त्या भाजपच्या जामनगर उत्तरमधून विधानसभेची निवडणूक लढवित आहेत.

06:45 December 01

उत्तर अफगाणिस्तानमधील धार्मिक शाळेत झालेल्या बॉम्बस्फोटात 10 विद्यार्थी ठार

तालिबानी राजवट आल्यानंतर अफगाणिस्तानमधील शांततेलाच सुरुंग लागला आहे. उत्तर अफगाणिस्तानमधील एका धार्मिक शाळेत झालेल्या बॉम्बस्फोटात किमान 10 विद्यार्थी ठार झाले, असे तालिबानच्या अधिकाऱ्याने सांगितले.

06:21 December 01

Breaking News :

मुंबई : राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रतापगडावर शासकीय कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केली. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या ताब्यातून आग्र्यावरून सटकले त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उद्धव ठाकरे यांच्या तावडीतून सटकली अशी तुलना केल्यानंतर राज्यभर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेची तुलना एकनाथ शिंदे यांच्या गद्दारीशी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा आक्रमक झालेली आहे.

Last Updated : Dec 1, 2022, 7:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.