मुंबई - माझ्या वक्तव्यावर आजही मी ठाम आहे मी करेक्ट कार्यक्रम करणार योग्य वेळ आल्यावर, असे राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निकालानंतर माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे. आज देशभरातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झालेले आहेत. त्यात पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी आपली सत्ता राखत भाजपाचा बंगालमध्ये पराभव केल्याची स्थिती आहे, त्यावर काँग्रेस आणि शिवसेना हे भाजपावर टीका करत आहेत. या सगळ्या परिस्थितीवर राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि शिवसेनेवर मिश्किल प्रतिक्रिया देताना बोलले की 'बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना' अशी काहीशी परिस्थिती शिवसेना आणि काँग्रेसची झालेली आहे.
आम्हाला इतर राज्यातही योग्य यश मिळाले आहे. बंगालमध्ये आम्हाला अपेक्षित जागा मिळाल्या नसल्या तरी चांगल्या जागा मिळाल्या आहेत. बंगाल कम्युनिस्ट आणि काँग्रेस मुक्त झाला आहे आणि आत्ता बंगालमध्ये भगव्याच राज्य येण्याची सुरुवात या निवडणुकीपासून होत आहे. काँग्रेस आणि शिवसेना म्हणजे "बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना" अशी यांची स्थिती झालेली आहे. या बंगालच्या निवडणुकीत शिवसेनेचा काही संबंध नाही आणि पंढरपुरात आज राष्ट्रवादी हरली आहे. काँग्रेसला या बंगालच्या निवडणुकीत फटका बसलेला आहे आणि तिथे नंदीग्राममधून ममता बॅनर्जी यांना निवडून यायला दमछाक झाली आहे हे दिसून आले आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
हेही वाचा- 'जखमी शेरनी मैदानात एकटी उतरून लढली, ऐतिहासिक विजय मिळवला'