ETV Bharat / state

...मग हे जनतेला दिलेला शब्द कसा पाळतील? - जयंत पाटील

या ट्विटसोबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी १८ फेब्रुवारी २०१९ रोजी विधानसभेतील जागा वाटपाविषयी केलेल्या विधानाची एक व्हिडिओ क्लीप जोडली आहे. या व्हिडिओद्वारे त्यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या विधानाची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

जयंत पाटील
author img

By

Published : Nov 7, 2019, 9:00 PM IST

Updated : Nov 7, 2019, 9:35 PM IST

मुंबई - आम्ही दिलेल्या शब्दाला जागतो, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपले स्वत:चे ब्रँडिंग करतात. मात्र, २५ वर्षे आपल्यासोबत असलेल्या शिवसेनेला दिलेला शब्द पाळू शकत नाहीत. यामुळे राज्यातील जनतेला दिलेला शब्द ते कसा पाळतील? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे. ट्विट करून त्यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

जयंत पाटील यांनी आज एक ट्वीट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की 'दिलेल्या शब्दाला जागतो' असे स्वतःचे ब्रँडिंग करणारे मुख्यमंत्री २५ वर्ष सहकारी असलेल्या शिवसेनेला दिलेला शब्द पाळू शकत नाहीत. स्वतःच्या इतक्या जुन्या सहकाऱ्याला दिलेला शब्द जो माणूस पाळू शकत नाही, ते महाराष्ट्राच्या जनतेला दिलेले शब्द कसा पाळणार?'.

हेही वाचा - आमदार फोडण्यासाठी भाजपकडून साम-दाम-दंड-भेद नीतीचा वापर - बाळासाहेब थोरात

या ट्विटसोबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी १८ फेब्रुवारी २०१९ रोजी विधानसभेतील जागा वाटपाविषयी केलेल्या विधानाची एक व्हिडिओ क्लीप जोडली आहे. या व्हिडिओद्वारे त्यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या विधानाची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

दुसरे ट्विट करून त्यांनी आमदार फोडफोडीच्या प्रकारावर मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, 'मी पुन्हा येईन' म्हणणाऱ्यांना निकाल लागूनही सरकार बनवणे शक्य होत नाहीये, म्हणूनच आता विरोधी पक्षातून आमदार फुटण्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. कोणत्याही पक्षातून आमदार फोडण्याचा प्रयत्न झाल्यास, सर्व पक्ष एकत्र येऊन फुटणाऱ्या आमदारास पराभूत करू. या ट्विटमधून त्यांनी फुटण्याचा विचार करणाऱ्या आमदारांनाही इशारा दिला आहे.

Intro:... मग हे जनतेला दिलेला शब्द कसे पाळतील ? - जयंत पाटील
mh-mum-01-ncp-jayantpatil-tweet-7201153
मुंबई, ता. ७ :
आम्ही दिलेल्या शब्दाला जागतो, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले स्वत:चे ब्रँडिंग करतात, मात्र २५ वर्षे आपल्यासोबत असलेल्या शिवसेनेला दिलेला शब्द पाळू शकत नाहीत, यामुळे राज्यातील जनतेला दिलेला शब्द कसे पाळतील, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
जयंत पाटील यांनी आज एक ट्वीट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, 'स्वत:च्या इतक्या जुन्या सहकाऱ्याला दिलेला शब्द जो माणूस पाळू शकला नाही, ते महाराष्ट्राच्या जनतेला दिलेला शब्द कसे पाळणार?'
पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी १८ फेब्रुवारी २०१९ रोजी केलेल्या विधानाची एक व्हिडीओ क्लीप आपल्या ट्वीटमध्ये जोडून मुख्यमंत्र्यांना आपल्या विधानाची आठवण करून दिली आहे.

https://twitter.com/Jayant_R_Patil/status/1192398745314512896Body:... मग हे जनतेला दिलेला शब्द कसे पाळतील ? - जयंत पाटील
Conclusion:... मग हे जनतेला दिलेला शब्द कसे पाळतील ? - जयंत पाटील
Last Updated : Nov 7, 2019, 9:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.