ETV Bharat / state

Maharashtra Monsoon Session 2023: नीलम गोऱ्हेंना सुनावणी होईपर्यंत उपसभापती पदावर बसण्याचा पूर्ण अधिकार-देवेंद्र फडणवीस - विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन दुसरा दिवस

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, विधानपरिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या कामकाजातील सहभागावरून प्रश्न उपस्थित करत घोषणाबाजी केली. विधिमंडळाचे अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान सुरू राहणार आहे.

Maharashtra Monsoon Session 2023
पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस
author img

By

Published : Jul 18, 2023, 7:51 AM IST

Updated : Jul 18, 2023, 2:21 PM IST

मुंबई: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सत्ताधारी पक्षांना जेरीस आणले. दोन्ही सभागृहात विरोधकांनी सताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विधानसभा पहिल्या अर्ध्या तासातच दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली. तर विधान परिषदेतही उपसभापती यांना खुर्चीवर बसण्याचा हक्क नसल्याचे सांगत विरोधकांनी घोषणाबाजी केली. पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी ठरल्यानंतर आज सत्ताधारी व विरोधक काय रणनीती आखतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Live Update-

नीलम गोऱ्हेंना सुनावणी होईपर्यंत उपसभापती पदावर बसण्याचा पूर्ण अधिकार आहे. गोऱ्हे अजून शिवसेनेत आहेत. त्यामुळे पक्षांतराचा मुद्दा उपस्थित होत नाही. शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.

  • आरक्षित जागेवरून निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी सहा महिन्यांनी मुदत वाढ केली आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सभागृहात माहिती दिली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या विवक्षित निवडणुकांकरिता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तात्पुरती वाढवण्याचे सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले.

किरीट सोमैय्या यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओची चौकशी होणार-देवेंद्र फडणवीस- किरीट सोमैय्या यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरलवरून अधिवेशनात मोठा गदारोळ झाला. माझ्याकडे पुरावे द्या, या प्रकरणाची सखोल चौकशी केला जाईल, असे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. प्रकरण दाबणार नसून कुणालाही पाठिशी घालणार नसल्याचे आदेश दिले. व्हिडिओ कुठे व कुणी शूट केला, हे समोर यावे, अशी मागणी अनिल परब यांनी विधान परिषदेत केली आहे.

माझ्याकडे त्यांचे किळसवाणे पेन ड्राईव्ह-अंबादास दानवे- केंद्राची सुरक्षा घेऊन महिलांना ब्लॅकमेल केले जात आहे. ८ तासाचे व्हिडिओ आहेत. मी सभापतींना देणार आहे. ही व्यक्ती महाराष्ट्रद्रोही आहे. आपले सरकार नैतिकतेबद्दल बोलते. पण किरीट सोमैय्या यांच्यासारखे दलाल महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार करत आहेत. त्याच्यावर आता सरकार काय कारवाई करणार. माझ्याकडे त्यांचे किळसवाणे पेन ड्राईव्ह आहेत. त्यातील दृश्य बघू शकत नाही. घाणेरडे शब्द आहेत, अशी माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात माहिती दिली.

  • अपात्रतेचा मुद्दा आजही निकाली लागलेला नाही. नीलम गोऱ्हे यांनी नैतिकदृष्ट्या खुर्चीवर बसणे योग्य नाही. उपसभापतींच्याच अपात्रतेचा तिढा, मग ऐकणार कोण? त्यासाठी समिती नेमून खुर्चीवर कुणाला बसवायचे, यावर निर्णय घ्या, अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केली.
  • अठरा हजार लोकांची भरती पोलीस दलात होत आहे. 1971 नंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रात लोकसंख्येच्या अनुसार पोलिसांची भरती होणार आहे. त्यानुसारच भरती करण्याचा आपला प्रयत्न राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माहिती दिली आहे.
  • तीन महिन्यांपासून मुंबई पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ विरोधी कारवाई केल्या आहेत. शाळा कॉलेज जवळच्या पान टपऱ्यांवर कारवाई केली आहे. अमली पदार्थाच्या प्रकरणात जर कोणी शासकीय यंत्रणेतील आढळल्यास त्याला बडतर्फ केले जाईल, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात सांगितले.
  • बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे अर्थात बार्टीच्या महाराष्ट्रातील तीन प्रशिक्षण संस्थांमार्फत विविध स्पर्धा परीक्षांच्या सरावासाठी अनेक अडचणी येत असल्याबाबतचा प्रश्न आमदार आशिष शेलार आणि अन्य आमदारांनी सभागृहात मांडला. मात्र या प्रश्नाला देण्यात आलेल्या उत्तरावरून आक्षेप घेत सभागृहांमध्ये विरोधकांनी गदारोळ केला.
  • किरीट सोमैय्या यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओवरून ठाकरे गटाचे आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत किरीट सोमैय्या यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
  • विधानपरिषदेत सलग दुसऱ्या दिवशी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या पदावरून विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे सभागृहात गदारोळ झाला आहे.
  • शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. भरतीच्या प्रक्रियेनुसार आरक्षणाचा रोस्टर तपासावा लागतो, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. शिष्यवृत्तीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी विधानसभेत सभात्याग केला.
  • किरीट सोमैय्या यांच्यावर सूमोटो अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली आहे. तक्रार केल्यानंतर महिलांना सुरक्षा मिळणार का, असा प्रश्न काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.
  • विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी दुसऱ्या दिवशीही आंदोलन केले आहे. शेतकरी उपाशी, मंत्री तुपाशी अशी घोषणाबाजी विरोधकांकडून करण्यात आली. आंदोलनात ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांच्यासह शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख सहभागी झाले आहेत.

विधिमंडळाच्या पहिल्या दिवशी काय घडले?

  • विरोधकांनी अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी ५० खोकेच्या घोषणा देत ठाकरे गटाच्या आमदारांनी देत शिंदे गटाला डिवचले. काँग्रेसच्या आमदारांनी कलंकित सरकारचे बॅनर हाती घेत शिंदे फडणवीस सरकारच्या घटनात्मक वैधतेवरून प्रश्न उपस्थित केले. राष्ट्रवादीतील शरद पवार गटाचा एकही आमदार आंदोलनात सहभागी झाला नाही. त्यावरून उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले, की शिल्लक राहिलेल्या विरोधक आमदारांच्या आंदोलनात दम नव्हता.
  • जनतेचे प्रश्न सरकारसमोर मांडण्यासाठी विरोधी पक्षनेत्याची गरज असताना विरोधकांचे याबाबत गुऱ्हाळ सुरू आहे. विरोधी पक्षनेत्याची निवड आजच होईल, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. प्रत्यक्षात त्याबाबत काँग्रेसकडून अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. कॉंग्रेस पक्षातील बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या ज्येष्ठ नेत्यांची नावे विरोधी पक्षनेता पदासाठी चर्चेत असताना नवीन नेत्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.
  • विधान परिषदेते कामकाज सुरू होताच शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या पदाबाबत आक्षेप उपस्थित केला. त्यावरून सभागृहात मोठा गदारोळ झाल्यानंतर विरोधकांना सभागृह त्याग केला. नीलम गोऱ्हे शिंदे गटात सामील झाल्यान ठाकरे गटाकडून त्यांना लक्ष्य करण्यात आले. आमदार सचिन अहिर म्हणाले, की उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केल्याने त्यांचे निलंबन महत्त्वाचे आहे. पक्षांतर केल्यानंतर निर्णय होईपर्यंत त्यांना त्या पदावर बसता येत नाही. राज्यपालांना भेटू व गरज पडल्यास न्यायालयातही जाऊ, असा इशारा आमदार अहिर यांनी दिला आहे.

हेही वाचा-

  1. Uday Samant On Opposition MLA Agitation : शिल्लक राहिलेल्या विरोधक आमदारांच्या आंदोलनात दम नाही - मंत्री उदय सामंत
  2. Sachin Ahir On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हे यांच्या मुद्द्यावर न्याय मिळेपर्यंत लढणार - सचिन अहिर
  3. Maharashtra Monsoon Session : पायऱ्यांवरील आंदोलनाला एसपी गटाची दांडी; महाविकास आघाडीत नाराजीनाट्य

Last Updated : Jul 18, 2023, 2:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.