ETV Bharat / state

Maharashtra Ministry Expansion : देवेंद्र फडणवीस, अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला; रात्री उशीरा बैठक, उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्र्यांचा निशाणा - मंत्रिमंडळाच्या विस्तारावर या बैठकीत चर्चा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी मंगळवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राज्यात रखडलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यासह मंत्र्यांच्या खातेवाटपावरही या बैठकीत बराच खल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Maharashtra Ministry Expansion
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jul 12, 2023, 7:33 AM IST

मुंबई : अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राज्यात सत्तेचे नवे समीकरणे जुळून आले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीत उभी फूट पडली. मात्र तीन पक्षाच्या सरकारमध्ये अद्यापही खातेवाटपाचा तिढा सुटला नाही. खाते वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात रात्री उशीरा वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

  • #WATCH | Mumbai: Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis and Deputy CM Ajit Pawar leave the residence of Maharashtra Chief Minister Eknath Shinde after holding a meeting. pic.twitter.com/pIBjUoQwZj

    — ANI (@ANI) July 11, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सलग तिसऱ्या दिवशी रात्रीची बैठक : राज्यात तीन पक्षांचे सरकार असले, तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सलग तिसऱ्या दिवशी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर बैठक पार पडली आहे. या बैठकीत मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यासह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र अद्यापही त्यांना खातेवाटप करण्यात आले नाही. त्यामुळे मंत्र्यांच्या खातेवाटपावरुन हा विस्तार रखडल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात करण्यात येत आहे.

  • Mumbai: Maharashtra: "...The cabinet will be expanded soon... Uddhav Thackeray's comment on Devendra Fadnavis is condemnable. He (Uddhav Thackeray) in the year--2019 abandoned the ideas of Balasaheb Thackeray, forgot everything in the greed of the chair, what right does he have… pic.twitter.com/t19mbXeXHf

उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसावर बोलण्याचा काय अधिकार आहे : उद्धव ठाकरे यांनी 2019 ला बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वांना पायदळी तुडवून हरताळ फासल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेले वक्तव्या दुर्दैवी आहे. उद्धव ठाकरे सत्तेसाठी सगळेकाही विसरले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांवर बोलण्याचा काय अधिकार आहे, असा सवालही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच करण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

मंत्र्यांना दालन आणि बंगल्याचे वाटप : मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप रखडल्यामुळे शिवसेना आणि भाजपच्या आमदारांमध्ये प्रचंड रोष असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अद्यापही खातेवाटप करण्यात आले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदारही बिथरले आहेत. त्यामुळे हा राग कमी करण्यासाठी मंत्र्यांना दालन आणि कक्षाचे वाटप करण्यात आल्याची चर्चा राजकीय विश्लेषक करत आहेत.

हेही वाचा -

  1. Devendra Fadnavis Kalank Remark : 'उद्धव ठाकरे यांचे मानसिक संतुलन बिघडले, त्यांना....'
  2. Bungalows Allotment Ministers : अजित पवार गटातील मंत्र्यांना बंगले वाटप; अदिती तटकरेंचे लिस्टमध्ये नावच नाही

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.