ETV Bharat / state

Aaditya Thackeray : चैत्यभूमी परिसरात 'माता रमाबाई आंबेडकर व्हिविंग गॅलरी'चे पर्यटन मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन - माता रमाबाई आंबेडकर व्हिविंग डेक

महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Maharashtra Environment Minister Aditya Thackeray ) यांनी आज दादरमध्ये व्ह्यूइंग डेकचे उद्घाटन केले आहे. यावेळी त्यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्याला साठ वर्षे पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन उघडण्याचा मानस आहे. लवकरच हे दालन सुरू केले जाईल असेही सांगितले.

Aaditya Thackeray
आदित्य ठाकरे
author img

By

Published : Feb 9, 2022, 1:45 PM IST

Updated : Feb 9, 2022, 6:17 PM IST

मुंबई : महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांनी आज दादरमध्ये व्ह्यूइंग डेकचे उद्घाटन केले ( Inauguration of viewing deck at Dadar ) आहे. त्यानंतर बोलताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, "चैत्यभूमीजवळ स्थित, आम्ही त्याला 'माता रमाबाई आंबेडकर व्हिविंग डेक' असे नाव देत आहोत. हे पूर्वी वादळाचे पाणी होते, आता पर्यटक आणि स्थानिक या दृश्याचा आनंद घेण्यासाठी येथे येऊ शकतात," आता संयुक्त महाराष्ट्राला ६० वर्ष पूर्ण होणार आहेत. यापार्श्वभूमीवर स्मृती महाराष्ट्र दालन उभारणार असल्याची ग्वाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली. तसेच कोविड निर्बंधावर त्यांनी भाष्य केले.

म्हणून उभारला माता रमाबाई आंबेडकर व्हिविंग डेक -

दादर येथील चैत्यभूमीवर येणार्‍या नागरिकांना मोकळे आणि निवांत बसण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी, अशी सातत्याने मागणी केली जात होती. ही बाब विचारात घेत, व्हिविंग गॅलरी उभारण्यात आली आहे. या गॅलरीला माता रमाबाई आंबेडकर व्हिविंग डेक असे नाव दिल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबई तसेच आणखी डेक उभारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मुंबईत 40 ते 44 स्टोम वॉटर ड्रेनेज आहेत. त्यांचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. येथे ही पर्यटकांना फिरण्यासाठी, बसण्यासाठी उत्तम व्यवस्था असेल, असे नियोजन केले जाईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी स्थानिक आमदार सदा सरवणकर, सभागृह नेता विशाखा राऊत आणि शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

  • Maharashtra Minister Aaditya Thackeray inaugurated a viewing deck in Dadar, earlier today

    "Located near Chaityabhoomi, we're naming it 'Mata Ramabai Ambedkar Smruti viewing deck'. It was earlier a stormwater outfall, now tourists & local can come here to enjoy the view," he said pic.twitter.com/japz8ADNTq

    — ANI (@ANI) February 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन उघडण्याचा मानस -

संयुक्त महाराष्ट्र लढ्याला साठ वर्षे पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन उघडण्याचा मानस आहे. लवकरच हे दालन सुरू केले जाईल. यामध्ये टेक्नॉलॉजीचे अँगल आणले जातील. लढ्यावेळी काय झाले होते. त्यावेळच्या दृश्य, इतिहास आणि पार्श्वभूमीवर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

तो पर्यंत निर्बंध हटवणार नाहीत -

कोरोना संपलेला नाही जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत काहीही भाष्य केलेले नाही. मात्र राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे. त्यामुळे हळूहळू निर्बंध शिथिल केले जातील. परंतु, जोपर्यंत कोरोना जाणार नाही, तोपर्यंत शंभर टक्के निर्बंध हटवले जाणार नाहीत, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. कर्नाटकमधील हिजाबवर बोलताना शिक्षणात कोणीही राजकारण आणू देऊ नका, असे सांगत जास्त काही बोलण्याचे टाळले.

हेही वाचा - Aaditya Thackeray About Sanjay Raut : 'राऊतांचं पत्र बोलकं'; आदित्य ठाकरेंकडून 'त्या' पत्राचे समर्थन

Last Updated : Feb 9, 2022, 6:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.