ETV Bharat / state

Look Back 2022 : सरत्या वर्षात शिंदे- फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्राने गमावले 'हे' मोठे प्रकल्प - Year Ender 2022

Look Back 2022 : औद्योगिक प्रगती करत असलेल्या महाराष्ट्राने शिंदे-फडणवीस सरकारच्या ( Shinde Fadnavis Govt ) काळात सरत्या वर्षात काही चांगले प्रकल्प गमावले. वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प, बल्क ड्रग्ज पार्क प्रकल्प, वैद्यकीय उपकरण पार्क प्रकल्प, टाटा एअरबस प्रकल्प ( Tata Airbus Project ), SAFRAN चा MRO प्रकल्प हे प्रकल्प गमावले आहेत. याआधीही असे मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून इतर राज्यात गेले आहेत. या प्रकल्पांमुळे राज्याची सुमारे एक लाख 80 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक बुडाली असून, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे एक लाख लोकांचा रोजगार बुडाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (Year Ender 2022 )

Shinde Fadnavis government
शिंदे फडणवीस काळात गमावले प्रकल्प
author img

By

Published : Dec 18, 2022, 2:38 PM IST

Updated : Dec 22, 2022, 1:29 PM IST

मुंबई : Look Back 2022 : सरत्या वर्षात महाराष्ट्रात वेदांत फॉक्सकॉनचा प्रकल्प ( Vedanta Foxconn Project ) गुजरातमध्ये जाण्याचा वाद शांत झाला नाही, तर टाटा एअरबसचा प्रकल्पही गुजरातमध्ये (Tata Airbus project in Gujarat ) गेल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली ( lot of excitement in state politics ) आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. मात्र, त्याचवेळी महाराष्ट्रातून हे दोन महत्त्वाचे प्रकल्प गुजरातमध्ये गेले असून गेल्या काही महिन्यांत राज्यातून गेलेले किंवा काही कारणांमुळे रद्द झालेल्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकल्पांमुळे राज्याची सुमारे एक लाख 80 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक बुडाली असून, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे एक लाख लोकांचा रोजगार बुडाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्राने वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प, बल्क ड्रग्ज पार्क प्रकल्प, वैद्यकीय उपकरण पार्क प्रकल्प, टाटा एअरबस प्रकल्प, SAFRAN चा MRO प्रकल्प हे प्रकल्प गमावले (Year Ender 2022 )आहेत.

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प : भारतात सुरू असलेल्या ऑटोमोबाईल आणि स्मार्टफोन उद्योगांमध्ये अत्याधुनिक अशा सेमीकंडक्टरचा वापर केला जातो. मात्र, सध्या भारतात या सेमी कंडक्टरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे भारतातच सेमीकंडक्टर तयार व्हावेत. यासाठी हा प्रकल्प महाराष्ट्रात पुण्याजवळ उभारण्यात येणार होता ( Vedanta Foxconn ). यासंदर्भात तत्कालीन महाराष्ट्र सरकारने अनेक बैठका घेतल्या होत्या. तैवानमधील फॉक्सकॉन आणि खनिकर्म क्षेत्रातील वेदांता या कंपन्यांनी संयुक्तपणे महाराष्ट्रात सेमी कंडक्टर प्लांट उभा करण्याचा निर्णय घेतला होता. आता हा प्रकल्प गुजरातमध्ये होणार आहे. वेदांत ग्रुप आणि फॉक्सकॉन पुण्यातील सनराईज सेमीकंडक्टर चिप आणि फॅब्रिकेशन क्षेत्रात काम करतील. या वर्षाच्या सुरुवातीला, वेदांता ग्रुपने फॉक्सकॉनसोबत आणखी एक करार केला आहे. या अंतर्गत ते पुढील 10 वर्षांमध्ये भारतात सेमीकंडक्टर चिप्स आणि डिस्प्लेच्या निर्मितीमध्ये $15 अब्जची गुंतवणूक करणार आहेत.

Vedanta Foxconn Project
वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प

बल्क ड्रग पार्क : ‘बल्क ड्रग पार्क’ हा प्रकल्प आपण रायगडमध्ये येणार होता. पण आता गुजरातमधील भरुच इथे हा ‘बल्क ड्रग पार्क’ होणार आहे. या प्रकल्पाची मागणी महाराष्ट्राने पहिल्यांदा केली होती. सप्टेंबरमध्ये हा प्रकार घडला होता. सुमारे ३००० कोटी रुपयांच्या आणि सुमारे ५०००० प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण करण्याची क्षमता असलेल्या बल्क ड्रग पार्क प्रकल्पासाठी महाराष्ट्र हा मुख्य दावेदारापैकी एक होता.

bulk drugs park
बल्क ड्रग पार्क

मेडिकल डिव्हाइसेस पार्क : औरंगाबाद येथील ऑरिक सिटी येथे 424 कोटींचा वैद्यकीय उपकरणे पार्क प्रस्तावित होता. वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प आणि बल्क ड्रग पार्कनंतर महाराष्ट्रातून इतर राज्यात गेलेला हा तिसरा मोठा प्रकल्प आहे. ऑरीक बिडकिनमध्ये वैद्यकीय उपकरणे पार्क उभारण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळून लावला आहे. ‘प्रमोशन ऑफ मेडिकल डिव्हायसेस पार्क’ योजनेअंतर्गत हा प्रस्ताव 2020 मध्ये केंद्रीय रसायने आणि खते मंत्रालयाच्या अंतर्गत फार्मास्युटिकल्स विभागाकडे पाठवण्यात आला होता. रसायने आणि खते मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या योजनेकरीता एकूण 16 राज्यांनी प्रस्ताव पाठवला होता, यापैकी चार राज्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तामिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश ही निवडलेली राज्ये आहेत. दुर्दैवाने यात महाराष्ट्राचा समावेश करण्यात आला नाही.

टाटा एअरबस प्रकल्प : महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ( Eknath Shinde Devendra Fadnavis Govt ) 22 हजार कोटींचा टाटा-एअरबस सी-295 वाहतूक विमान प्रकल्प गमावला ( Tata Airbus C295 transport aircraft project ) आहे. गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यापूर्वी गुजरातला मोठी भेट मिळाली आहे. C-295 मिलिटरी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टची निर्मिती वडोदरात होणार आहे. हा प्रकल्प 'मेक इन इंडिया' देशांतर्गत विमान निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 ऑक्टोबर रोजी गुजरातमधील वडोदरा येथे भारतीय हवाई दलासाठी (IAF) वाहतूक विमान निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी करतील. या प्रकल्पाची एकूण किंमत 21,000 कोटी आहे. औद्योगिक प्रगती करत असलेल्या महाराष्ट्राने सरत्या वर्षात काही चांगले प्रकल्प गमावले.

Last Updated : Dec 22, 2022, 1:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.