ETV Bharat / state

Breaking News : भिवंडीत मांज्यामुळे दुचाकीस्वाराचा गळा कापल्याने मृत्यू - महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

Maharashtra Breaking News
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
author img

By

Published : Jan 15, 2023, 7:00 AM IST

Updated : Jan 15, 2023, 8:42 PM IST

20:41 January 15

भिवंडीत मांज्यामुळे दुचाकीस्वाराचा गळा कापल्याने मृत्यू

भिवंडीमधील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाण पुलावरून जाणाऱ्या दुचाकीस्वाराच्या गळयात उडत्या पतंगाच्या मांजा अडकून त्याचा गळा कापल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संजय हजारे (वय ४७, रा. उल्हासनगर ) असे मांज्यामुळे अचानक गळा कापल्याने मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव

18:54 January 15

काँग्रेसने सुधीर तांबे यांना पक्षातून केले निलंबित

18:43 January 15

शिर्डीतील मेडीकल चालक महिलेचा दोन लहान मुलांसह आत्महत्येचा प्रयत्न

मोबाईलवर स्टेटस ठेवून आपल्या दोन मुलांनसह घेतल्या गोळ्या

शिर्डीतील मेडीकल चालक महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह झोपेच्या गोळ्या खावून केला आत्महत्येचा प्रयत्न....

महिला अनेक दिवसापासून डिप्रेशनमधे असल्याचे मैत्रीणींकडून माहिती....

जन्म तारखेसह मृत्यूचा स्टेटस ठेवल्यानं मैत्रीणींना समजले आत्महत्येबाबत....

मैत्रिणींनी तात्काळ महिला सुवर्णा गुळसर आणि मुले आदित्य आणि ईश्वरीला केले साईबाबा रुग्णालयात दाखल....

17:43 January 15

पदवीधर निवडणुका आणि परीक्षा एकाच दिवशी असल्याने यावर तोडगा काढा - गोपीचंद पडळकर

पदवीधर मतदार संघाची निवडणूक 30 जानेवारीला होणार आहे. मात्र याच दिवशी राज्यत वेगवेगळ्या विभागातील परीक्षा देखील होणार आहेत. या परीक्षेला जवळपास दहा हजार विद्यार्थी बसणार असल्याने 30 जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीत ते विद्यार्थी मतदानापासून वंचित राहतील त्यामुळे या समस्येतून निवडणूक आयोगाने तोडगा काढावा असे पत्र गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक आयोगाला लिहिले आहे.

17:43 January 15

प्रसिद्ध पाषाणकर ऑटो शोरूमचे सागर पाषाणकर यांच्यावर लैंगिक, मानसिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पुणे: पुण्यातील प्रसिद्ध पाषाणकर ऑटो शोरूम चे मालक सागर पाषाणकर यांच्यासह तिघा जणावर कार्यालयातील महिलेचा मानसिक छळ करून लैंगिक आर्थिक आणि सामाजिक विटंबना केल्याप्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

16:00 January 15

गँगस्टर छोटा राजनचा चेंबूरमध्ये वाढदिवस साजरा करणाऱया साथीदाराला अटक

पोलिसांनी गुन्हा दाखल करून गँगस्टर छोटा राजनचा वाढदिवस साजरा करणाऱ्या चेंबूर परिसरातून त्याच्या जवळच्या साथीदाराला अटक केली. गँगस्टरचा जवळचा साथीदार नीलेश पराडकर याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

14:53 January 15

पुण्यामध्ये भीषण आग; चार कार, चार बस आणि एका टेम्पोला आग

पुणे : पुण्यातील विश्रांतवाडी, फुलेनगर आरटीओ कार्यालयाच्या आवारामधे ०४ कार, ०४ लक्झरी बस, ०१ टेम्पो व ०१ डंपर अशी एकूण १० वाहने पेटल्याची घटना घडली. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. अग्निशामक दलांकडून हे आग विझवण्याचे काम सुरू असून, आगीची एवढी मोठी भीषणता होती की या मध्ये गाड्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाला आहे.

12:55 January 15

वाळूज औद्योगिक परिसरात तुकडे असलेला आढळला तरुणाचा मृतदेह

औरंगाबादमधील वाळूज औद्योगिक परिसरातील घाणेगावात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंदाजे 25 वर्ष वयाच्या युवकाचा धड शरीरापासून वेगळा केलेला मृतदेह आढळून आला आहे. बंद पडलेल्या कंपनीच्या परिसरात ही घटना झाली असून मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

12:39 January 15

संजय राऊत यांनी आमदार धनंजय मुंडेंची रुग्णालयात घेतली भेट

शिवसेनेचे नेते तथा राज्यसभेचे खासदार, सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आज माजी मंत्री , आमदार धनंजय मुंडे यांची ब्रीच कँडी रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली.

12:15 January 15

पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवासादरम्यान हरवलेले 13 मोबाईल रेल्वेकडून प्रवाशांना परत

मुंबईच्या तुफान गर्दी असलेल्या रेल्वेच्या डब्यामध्ये चढणे उतरणे हे एक दिव्यच असते. कारण चढताना उतरताना अनेकदा बॅग किंवा मोबाईल पडतो. अशा अनेक लोकांचे हरवलेले मोबाईल रेल्वे पोलीस जवानांनी कतेच परत केले.

12:00 January 15

मिरज एमआयडीसीतील प्लॅस्टिक कारखान्याला भीषण आग, ५ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात

सांगली - मिरज औद्योगिक वसाहतीमध्ये आज पहाटेच्या सुमारास एका कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीत प्लॅस्टिकचा कारखाना जळून खाक झाला आहे. सुदैवाने आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र कोट्यवधींचे साहित्य जळून नुकसान झाले आहे.

11:45 January 15

इंदापुरातील शेतकरी दाम्पपत्याला शेजाऱ्यांकडून स्वतःच्याच शेतात बेदम मारहाण

इंदापूर तालुक्यातील अवसरी येथील एका दांपत्याला स्वतःच्याच शेतात शेजाऱ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. याप्रकरणी संध्या शिवाजी पेंडवळे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

11:44 January 15

संत वामन भाऊ यांच्या पुण्यतिथीला पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांची गैरहजेरी!

आज संत वामन भाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गहिनीनाथ गडावर पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा येणार असल्याची काल दिवसभर चर्चा होती. मात्र अचानक त्यांचा दौरा रद्द झाला आहे. खासदार प्रीतम मुंडे आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत.

11:43 January 15

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आठवणी सांगताना देवेंद्र फडणवीसांचे डोळे भरून आले

चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या श्रद्धांजलीसाठी आयोजित शोकसभेत त्यांच्याविषयीच्या भावना आणि पक्षनिष्ठेबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी भावूक झाले. पिंपरी-चिंचवडच्या विकासात अग्रस्थानी म्हणून लोकनेते लक्ष्मण जगताप यांचे नाव घेतले जाते. साधी राहणी, उच्च विचार व महान कार्य असणारे शहरातील अष्टपैलू व्यक्तिमत्व त्यांच्या रुपाने हरपले आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

11:43 January 15

डिव्हायडरला दुचाकी धडकून एका जवानासह युवकाचा मृत्यू

हिंगोली- जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. सेनगाव तालुक्यातील सवना येथे डिव्हायडरला दुचाकी धडकून एका जवानासह युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली यातील. मयत जवान हा चंद्रपूर येथे कार्यरत होता. तो सवना येथे मामाच्या भेटीसाठी आला होता.

11:28 January 15

72 आसनी प्रवासी विमान धावपट्टीवर कोसळले, बचावकार्य सुरू

नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर 72 आसनी प्रवासी विमान धावपट्टीवर कोसळले. बचावकार्य सुरू असून विमानतळ सध्या बंद आहे.

11:00 January 15

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी औरंगाबाद एसीपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

औरंगाबाद पोलीस दलातील एसीपीने महिलेचा विनयभंग केला आहे. मध्यरात्री अडीच वाजता घरात घुसून विनयभंग केल्याचा आरोप आहे. विशाल ढुमे असे विनयभंग करणाऱ्या एसीपीचे नाव आहे. कलम 354 अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

10:54 January 15

जागे व्हावे, खाशाबा जाधवांना उचित सन्मान द्या - संभाजीराजे

कोल्हापूर १९५२ साली भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे पैलवान खाशाबा जाधव यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंती निमित्त गुगलने खास डूडल तयार करून त्यांना अभिवादन केले आहे. मात्र त्यांच्या कार्याला उचित सन्मान देऊन अभिवादन करण्यासाठी सरकार केव्हा जागे होणार, हाच प्रश्न आहे ! असे म्हणत संभाजीराजे यांनी उद्विग्न भावनेतून फेसबुक पोस्ट केली आहे.

09:47 January 15

मदुराईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानातील प्रवाशाचा अचानक मृत्यू

इंदूर विमानतळ संचालकांच्या म्हणण्यानुसार, मदुराईहून दिल्लीला जाणारे इंडिगो फ्लाइट 6E-2088 हे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे इंदूर विमानतळाकडे वळवण्यात आले होते. इंदूर विमानतळावर उतरण्यापूर्वी अतुल गुप्ता नावाच्या प्रवाशाची प्रकृती गंभीर होती. त्याच्या तोंडातून रक्त येत होते. या प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.

09:46 January 15

भाविकांच्या चेंगराचेंगरीनंतर कटकच्या बारंबामध्ये जमावबंदी लागू

कटकच्या बारंबा येथील सिंहनाथ मंदिरात काल चेंगराचेंगरी झाली. मंदिर परिसरात कलम 144 CrPC अंतर्गत बंदी घालण्यात आली आहे. मकरमेळ्याच्या गर्दीत येथे झालेल्या चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू झाला तर नऊ जण जखमी झाले आहे.

09:45 January 15

वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिरवा झेंडा दाखवणार

सिकंदराबाद आणि विशाखापट्टणमला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिरवा झेंडा दाखवणार आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे सिकंदराबाद येथील कार्यक्रमस्थळी आगमन झाले आहे.

08:16 January 15

ईडीला मी पूर्ण सहकार्य करणार आहे-इक्बाल सिंह

ईडीने बीएमसीचे आयुक्त इक्बाल सिंह यांना समन्स पाठविले आहे. त्यावर त्यांनी टाटा मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की मी पूर्ण सहकार्य करीन. काम सुरूच ठेवले पाहिजे.

08:13 January 15

नागपुरातील १२ उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी बंद

पतंगाच्या मांजामुळे अपघात होऊ नये, यासाठी नागपूर पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. नागपुरातील १२ उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

07:52 January 15

मॅरेथॉन स्पर्धेला उपमुख्यमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांची हजेरी, ड्रीम रनमध्ये तब्बल २३ हजार स्पर्धक सामील

वरिष्ठ नागरिक मॅरेथॉन रनला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखविला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघे ड्रीम रन या स्पर्धेला ८:०५ वाजता झेंडा दाखविणार आहेत. ड्रीम रनमध्ये तब्बल २३ हजार स्पर्धक सामील झाले आहेत.

07:51 January 15

महिला डॉक्टरला शिवीगाळ केल्याप्रकरणी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल

मुंबईतील कुरार पोलीस स्टेशनमध्ये डॉक्टर सुशांत कदम विरोधात IPC च्या 509, 323, 504 आणि 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला डॉक्टरसोबत बाचाबाची, शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

07:30 January 15

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ४२.१९७ किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेला दाखविला हिरवा झेंडा

एलिट पूर्ण ४२.१९७ किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे. दोन वर्षानंतर मॅरेथॉनचे आयोजन होत असल्याने मुंबईकर मोठ्या उत्साहाने स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

07:26 January 15

रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, १२ लोक ठार

रशियाने युक्रेनवर मोठे हल्ले केले आहेत. ऊर्जेच्या पायाभूत सुविधांवर हल्ले केले आहेत. डनिप्रोमधील नऊ मजली अपार्टमेंट इमारतीवर क्षेपणास्त्र हल्ल्यात किमान 12 लोक ठार झाले आहेत.

07:25 January 15

पश्चिम बंगालच्या माध्यान्ह भोजन योजनेची केंद्र करणार तपासणी

पश्चिम बंगालच्या विविध भागांमध्ये माध्यान्ह भोजन योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी केंद्र लवकरच एक टीम पाठविणार आहे, असे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जाहीर केले.

07:24 January 15

ब्रिटनकडून युक्रेनला मदतीची घोषणा

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी युक्रेनला चॅलेंजर 2 टाक्या आणि तोफखाना यंत्रणा देण्याची घोषणा केली. मॉस्कोने जवळपास दोन आठवड्यांत प्रथमच अनेक युक्रेनियन शहरांना लक्ष्य केले आहे.

07:23 January 15

नितीन गडकरींच्या कार्यालयात फोन करणाऱ्या आरोपीची पटली ओळख

कर्नाटकातील तुरुंगात असलेल्या गुंडाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कार्यालयात धमकीचे फोन केले. नागपूर पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आहे.

07:17 January 15

टाटा मुंबई मॅरेथॉनचे विजेते जाहीर

टाटा मुंबई अर्ध मॅरेथॉन पुरुष गट विजेते १) मुरली गावित, ०१:०१:२० २) अंकित देशवाल, ०१:०५:४८ ३)दीपिक कुंभार, ०१:०५:५१ आहेत. टाटा मुंबई अर्ध मॅरेथॉन महिला गट विजेतेपदावर १) पारुल चौधरी ०१:१५:०७ २) नंदिनी गुप्ता ०१:२४:१२ ३) पूनम सोनुने ०१:२४:५९ यांनी बाजी मारली आहे.

06:37 January 15

Breaking News : नागपुरातील १२ उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी बंद

मुंबई : मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून टाटा मुंबई मॅरेथॉनला आज पहाटे ५:१५ वाजता सुरुवात झाली. या मॅरेथॉनला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हिरवा झेंडा दाखविला. संपूर्ण मॅरेथॉन कॅटेगिरी मध्ये ५५ हजार धावपटू धावणार असून हौशी मॅरेथॉनमध्ये ९ हजार स्पर्धक धावत आहेत.

Last Updated : Jan 15, 2023, 8:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.