ETV Bharat / state

आजपासून दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन, पहिल्या दिवशी विरोधक होणार आक्रमक? - maharashtra legislative assembly

दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. हे वादळी राहण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात वेगवेगळ्या मुद्द्यांवर सरकारला घेण्यासाठी विरोधक तयार आहेत. तर दुसरीकडे विरोधकांच्या प्रत्येक मुद्द्यावर सरकारी पक्षाकडून तोडगा काढण्याचा प्रयत्न तोडगा असेल.

maharashtra legislative assembly
आजपासून दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन, पहिल्या दिवशी विरोधक होणार आक्रमक?
author img

By

Published : Jul 5, 2021, 9:33 AM IST

मुंबई - आजपासून दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. हे वादळी राहण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात वेगवेगळ्या मुद्द्यांवर सरकारला घेण्यासाठी विरोधक तयार आहेत. तर दुसरीकडे विरोधकांच्या प्रत्येक मुद्द्यावर सरकारी पक्षाकडून तोडगा काढण्याचा प्रयत्न तोडगा असेल. विधानसभा अध्यक्षांची निवडणूक याच अधिवेशनात करावी, अशी विरोधकांची मागणी होती. मात्र, या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवड होईल याची शक्यता कमी आहे. दोन दिवसाचे अधिवेशन असल्याने तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी घेण्यात येणार नाही. त्यामुळे आज विरोधक जास्त आक्रमक होण्याची शक्यता आहे. राज्यात असलेले कोरोनाचे संकट, शेतकऱ्यांची दुरावस्था, रद्द झालेले मराठा आणि ओबीसी आरक्षण या मुद्यांवरसुद्धा विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस मंत्र्यांची दहा वाजता बैठक -

विधिमंडळाचे कामकाज सुरू होण्याआधी 10 वाजता काँग्रेस मंत्र्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत महत्त्वाची चर्चा होणार आहे. विधानसभा अध्यक्ष निवडणूक याच अधिवेशनामध्ये घेण्यात यावी, असा आग्रह काँग्रेसचा होता. त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेवरकडे सगळ्यांचे लक्ष असेल.

असे असेल विधानसभेचे कामकाज -

  • 2020-21 च्या पुरवण्या मागण्या आज पटलावर ठेवल्या जातील
  • सुधीर मुनगंटीवार हे वनमंत्री असताना 33 कोटी वृक्ष लागवडी बाबत चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीला वेळ वाढवून देण्यात यावा असा प्रस्ताव ठेवला जाणार आहे.
  • शोक प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.
  • खासदार राजू सातव, माजी मंत्री संजय देवतळे, माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्यासाठी शोकप्रस्ताव मांडण्यात येईल.

हेही वाचा - विधानसभेचे पावसाळी अधिवेशन : वाचा, कोणते मुद्दे असतील केंद्रस्थानी?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.