ETV Bharat / state

धक्कादायक...! एटीएम फसवणुकीच्या गुन्ह्यात महाराष्ट्र अव्वल - अव्वल

बँकेच्या एटीएम फसवणुकीच्या गुन्ह्यात २०१८-१९ या वर्षात लक्षणीय वाढ झाल्याचे आरबीआयच्या एका अहवालातून समोर आले आहे. एटीएमद्वारे एक लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांची आकडेवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वार्षिक अहवालात नमूद करण्यात येते. त्यानुसार महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून २३३ गुन्हे या वर्षात घडले आहे. यात तब्बल ४ कोटी ८१ लाख रूपये एटीएम मशीनच्या माध्यमातून परस्पर लुबाडण्यात आले आहे.

एटीएमला स्कीमर लावताना हॅकर
author img

By

Published : Jul 25, 2019, 7:20 PM IST

मुंबई - बँकेच्या एटीएम फसवणुकीच्या गुन्ह्यात २०१८-१९ या वर्षात लक्षणीय वाढ झाल्याचे आरबीआयच्या एका अहवालातून समोर आले आहे. एटीएमद्वारे एक लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांची आकडेवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वार्षिक अहवालात नमूद करण्यात येते. त्यानुसार महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून २३३ गुन्हे या वर्षात घडले आहे. यात तब्बल ४ कोटी ८१ लाख रूपये एटीएम मशीनच्या माध्यमातून परस्पर लुबाडण्यात आले आहे.

एटीएम फसवणुकीच्या गुन्ह्यात महाराष्ट्र अव्वल

दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राजधानी दिल्लीत २०१८-१९ च्या आर्थिक वर्षात तब्बल १७९ एटीएम फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद झाली असून तब्बल २ कोटी ९० लाख रुपये लुटण्यात आले आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू राज्य असून या राज्यात ३ कोटी ६३ लाख रुपये एटीएम सेंटरमधून लुटण्यात आले आहेत.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे आसाम, अरुणाचल प्रदेश व त्रिपुरा सारख्या राज्यात एटीएम फसवणुकीचा (१ लाखांवरील) कोणताही गुन्हा नोंद नसल्याचे समोर आले आहे.

अशी होते एटीएम सेंटरमधून बँक ग्राहकांची लूट

देशातील विविध राज्यातील बँकांच्या एटीएम सेंटरमधील मशीनमध्ये एटीएम कार्डाच्या स्वाईप मशीनवर स्कीमर लावून बँक ग्राहकांचा डेटा (माहिती) चोराला जातो. मिळालेला डेटा बनावट एटीम कार्डवर टाकून हातोहात एटीएम हॅकर पीडित बँक ग्राहकाच्या खात्यातून पैसे लुबाडत आहेत.

काही ठिकाणी गर्दी नसलेल्या एटीएम सेंटरवर गुन्हेगार टोळ्या पाळत ठेवून बँक ग्राहकांना हेरतात. एटीएम मशीनमधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवून एटीएम कार्डचा पिनकोड चोरी करीत असल्याचे अनेक प्रकरणात समोर आले आहे.

मोबाईल हॅकींगद्वारे चोरी

जर तुम्ही मोबाईल बँकींग करत असाल आणि तुमच्या मोबाईलमध्ये खूप अॅप्स असतील तर त्याद्वारे व्हायरस तुमच्या मोबाईलमध्ये शिरू शकतो. तो व्हायरस तुमच्या मोबाईलमधील बँकींग अॅप आणि बँकेची माहिती चोरून घेतो. त्याद्वारे ऑनलाईन चोरी हॅकर्स करतात.

अशी घ्या काळजी

एटीएममधून पैसे काढताना आपल्या आजूबाजूला कोणी नाही ना याची खात्री करा. अनोळखी व्यक्ती आपण पैसे काढताना जवळ आल्यास त्याला बाहेर जाण्यास सांगा. एटीएम कार्ड मशीनमध्ये घालताना मशीनची लाईट बंद-चालू होते का याची खात्री करा. पासवर्ड टाकताना तो लपवून टाका. एटीएम हाताळणे कळत नसल्यास केवळ घरातील व्यक्तींनाच घेऊन जा. तसेच मोबाईल हॅकींगपासून बचाव करण्यासाठी मोबाईल बँकींग ज्या मोबाईलमधून वापरता त्यामध्ये जास्त अॅप ठेवू नका. आपला पासवर्ड कोणालाही कळू देऊ नका.

Intro:बँकेच्या एटीएम फसवणुकीच्या गुन्ह्यात 2018-19 या वर्षात लक्षणीय वाढ झाल्याचे आरबीआय च्या एका अहवालातून समोर आले आहे. देशातील विविध राज्यात एटीएम सेंटर मधून 1 लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांची आकडेवारी रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या वार्षिक अहवाल नमूद करण्यात येते. यात पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र असून , महाराष्ट्रात 233 गुन्हे घडले आहेत. ज्यात तब्बल 4 कोटी 81 लाख रुपये एटीएम मशीन च्या माध्यमातून परस्पर लुबाडले आहेत. Body:दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राजधानी दिल्लीत 2018-19 च्या आर्थिक वर्षात तब्बल 179 एटीएम फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद झाली असून तब्बल 2 कोटी 90 लाख रुपये लुटण्यात आले आहेत . तर तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू राज्य असून या राज्यात 3 कोटी 63 लाख रुपये एटीएम सेंटर मधून लुटण्यात आले आहेत.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे आसाम , अरुणाचल प्रदेश , व त्रिपुरा सारख्या राज्यात एटीएम फसवणुकीची ( 1 लाखवरील) कुठलाही गुन्हा नोंद नसल्याचे समोर आले आहे.
Conclusion:कशी होते एटीएम सेंटर मधून बँक ग्राहकांची लूट

देशातील विविध राज्यातील बँकांच्या एटीएम सेंटर मधील मशीन मध्ये एटीएम कार्डाच्या स्वाईप मशीनवर स्कीमर लावून बँक ग्राहकांचा डेटा चोराला जातो. मिळालेला डेटा बनावट एटीम कार्डावर टाकून हातोहात एटीएम हॅकर पीडित बँक ग्राहकाच्या खात्यातून पैसे लुबाडत आहेत.

काही ठिकाणी गर्दी नसलेल्या एटीएम सेंटर वर गुन्हेगार टोळ्या पाळत ठेवून बँक ग्राहकांना हेरतात , एटीएम मशीन मधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवून एटीएम कार्डाचा पिनकोड चोरून चोरी करीत असल्याच अनेक प्रकरणात समोर आले आहे.

(सायबर एक्सपर्ट अंकुर पुराणिक यांचा बाईट , एटीएम पीडित युवराज साद यांचा बाईट , व एटीएम सेंटर मध्ये हॅकर स्कीमर मशीन लावतानाचा सीसीटीवी व्हिडीओ जोडला आहे.)
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.