मुंबई - उत्तर प्रदेशमध्ये जी घटना घडली, ती माणुसकीला काळिमा फासणारी आहे. पीडितेवर अत्याचार झाला. तिने एफआयआर देण्याचा प्रयत्न केला मात्र, तो घेतला नाही. आता पोलीस प्रशासन सांगत आहे की, अत्याचार झालाच नाही. उत्तर प्रदेशमध्ये जंगलराज असल्याचे यावरून स्पष्ट होते, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. गांधी जयंतीच्या कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
सुशांतसिंह प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत होते. तपास योग्य दिशेने सुरू असताना सीबीआयला मधे आणले गेले. आम्ही खूप उत्कटेने सीबीआयच्या निकालाची वाट पाहत आहोत. तीन केंद्रीय तपास यंत्रणा मुंबईत येऊन या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, सुशांतची आत्महत्या बाजूला गेली आणि ड्रग्जला समोर आणले गेले. त्याचा तपास होणे गरजेचेच आहे; मात्र, मूळ प्रकरण बाजूला पडल्याचे दिसत आहे, असेही देशमुख म्हणाले.