ETV Bharat / state

अखेर उद्या राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व बैठकीला मुहूर्त - agricultural department Maharashtra

राज्यातील खरीप हंगामाच्या आढाव्याबाबत कृषीमंत्री दादा भुसे यांनी जिल्ह्यांचे दौरे सुरू केले आहेत. उद्या दि. २१ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेणार आहेत. दुपारी १२ वाजता ही बैठक होईल.

खरीप
खरीप
author img

By

Published : May 20, 2020, 8:22 PM IST

मुंबई - मान्सून तोंडावर आला असताना कृषी विभागाची यंत्रणा कोरोना नियंत्रणाच्या कामात व्यग्र असल्याने उडालेला बोजवारा ताळ्यावर आणण्यासाठी, राज्यातील खरीप हंगामाच्या आढाव्याबाबत कृषीमंत्री दादा भुसे यांनी जिल्ह्यांचे दौरे सुरू केले आहेत. त्यांनी आज नाशिक आणि ठाणे येथे बैठक घेऊन खरीपाचा आढावा घेतला. उद्या दि. २१ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेणार आहेत. दुपारी १२ वाजता ही बैठक होईल.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन सुरू झाले. याकाळात कृषिमंत्री भुसे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कृषी सचिव, आयुक्त तसेच क्षेत्रिय कृषी अधिकाऱ्यांशी सातत्याने संवाद साधत आहेत. मार्च-एप्रिल महिन्यापासून खरीपाच्या तयारीचा ते आढावा घेत असताना ३० एप्रिलपूर्वी पर्यंत प्रत्येक जिल्ह्याच्या खरीपाच्या नियोजनाला पालकमंत्र्यांकडून मान्यता घेण्याचे निर्देश कृषिमंत्र्यांनी दिले होते. गेल्या आठवड्यात कृषीमंत्री भुसे, विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी मंत्रालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खरीपाच्या तयारीचा आढावा घेतला होता. उद्या, गुरुवारी होणाऱ्या राज्यस्तरीय खरीपाच्या आढावा बैठकीत राज्याच्या नियोजनाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मान्यता देतील.

कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांना बांधावर खते, बियाणे देण्याचे नियोजन कृषी विभागाने केले असून त्याचा आढावा घेण्यासाठी कृषिमंत्री भुसे यांनी आजपासून जिल्ह्यांच्या दौऱ्याला सुरूवात केली आहे. नाशिक येथे झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी २०२० हे वर्ष 'कृषी उत्पादकता वर्ष' म्हणून साजरे करण्याचा संकल्प केल्याचे सांगितले. कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत थेट बांधावर बियाणे पोहोचविण्यासाठी कृषी विभाग सज्ज असल्याचे सांगितले. त्यानंतर कृषी मंत्र्यांनी ठाणे जिल्ह्याच्या खरीपाचा आढावा घेतला. कोरोना नियंत्रणाच्या कामामुळे शासकीय यंत्रणा जुंपली आहे. विशेष म्हणजे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनाही या कामात गुंतवल्याने मोठ्या प्रमाणात स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांची नाराजी आहे. मान्सूनचे आगमन दहा ते पंधरा दिवसांवर येऊन ठेपल्याने खत बियाणे खरेदीसाठी देखील शेतकऱ्यांची धांदल उडणार आहे.

लॉकडाऊनमुळे सर्वत्र बंद असल्याने भाजीपाला शेती परवडत नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी पीक पद्धतीमध्ये बदल करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार आवश्यक बियाणांचे देखील कृषी विभागाला नियोजन करणे क्रमप्राप्त आहे. युरिया खताची मोठ्या प्रमाणात टंचाई असून रेल्वेच्या माध्यमातून वेळेत ही बियाणे आणि खते शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्याचे आव्हान कृषी विभागापुढे आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीत आढावा घेणार असल्याने सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लागून आगामी खरिपासाठी कृषी विभाग सज्ज होईल, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.