ETV Bharat / state

हसतमुख, हरहुन्नरी, सदाबहार अभिनेता आपण गमावला - अजित पवार

महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली. ऋषी कपूर यांच्या निधनानं निखळ आनंद देणारं, हसतमुख, हरहुन्नरी, सदाबहार व्यक्तीमत्वं हरपलं, आशा शब्दात अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

Maharashtra Deputy Cm Ajit Pawar offered condolences to the late actor's family

author img

By

Published : Apr 30, 2020, 12:00 PM IST

मुंबई - बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे आज निधन झाले आहे. ६८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर सामाजिक, राजकीय, सिनेसृष्टीसह सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली. ऋषी कपूर यांच्या निधनानं निखळ आनंद देणारं, हसतमुख, हरहुन्नरी, सदाबहार व्यक्तीमत्वं हरपलं, आशा शब्दात अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनानं हसतमुख, हरहुन्नरी, सदाबहार अभिनेता आपण गमावला आहे. सतत आनंदी, उत्साही राहणारं असं त्यांचं चिरतरुण व्यक्तिमत्वं होतं. त्यांच्या अभिनयानं रसिकांना निखळ आनंद दिला. ‘कपूर’ कुटुंबाचा कलेचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं. काल इरफान खान यांचं निधन झाल्यानंतर आज ऋषी कपूर यांच्या निधनाची आलेली बातमी, हे खरोखरंच धक्कादायक, वेदना देणारं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली.

ऋषी कपूर हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते, परंतु त्या वेदना त्यांनी रसिकांना जाणवू दिल्या नाहीत. जीवनाच्या अखेरपर्यंत चित्रपटसृष्टीशी आणि रसिकांशी नातं कायम राखलेले ते कलावंत होते. भारतीय चित्रपट जगताच्या इतिहासात त्याचं नाव, त्यांचा अभिनय अजरामर राहील, मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. त्यांच्या निधनाचं दु:ख सहन करण्याचं बळ कपूर कुटुंबियांना मिळो, अशी प्रार्थनाही उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे.

ऋषी कपूर यांच्या निधनाची माहिती अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर दिली. बुधवारीच अभिनेते इरफान यांच्या निधनाने सिनेजगतात शोककळा पसरली होती. त्यांच्यापाठोपाठ आता ऋषी कपूर यांचेही निधन झाल्याने सिनेसृष्टीला धक्का बसला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.