ETV Bharat / state

Breaking News : राहुल शेवाळे यांच्या विरोधात ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक - marathi online update news

महाराष्ट्र ब्रेकिं न्यूज
Maharashtra breaking news
author img

By

Published : Dec 23, 2022, 6:53 AM IST

Updated : Dec 23, 2022, 10:15 PM IST

22:14 December 23

राहुल शेवाळे यांच्या विरोधात ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिशा सालीय आत्महत्या प्रकरण संसदेत उपस्थित करून थेट आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या थेट आरोपानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळतात. राहुल शेवाळे यांच्या विरोधात शिवसेनेकडून ठिकठिकाणी निदर्शना करण्यात आली. आज सेना भवन ते दादर रेल्वे स्टेशन या भागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांकडून मोर्चा काढण्यात आला.

21:56 December 23

सीबीआयने चंदा कोचर आणि त्यांच्या पतीला केली अटक

सीबीआयने चंदा कोचर आणि त्यांच्या पत्नीला केली अटक केली आहे.

20:37 December 23

दिंडोशी पोलिसांनी धुळे जिल्ह्यातून कुख्यात ड्रग सप्लायरला केली अटक

मुंबईतील दिंडोशी पोलिसांनी धुळे जिल्ह्यातील शिरपूर परिसरातून रायसिंग खेत्या पवार या ड्रग्ज सप्लायरला अटक केली आहे. त्याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र, गोवा आणि मध्य प्रदेशचे पोलीस या ड्रग्ज पुरवठादाराच्या शोधात होते.

19:42 December 23

गोव्यात खुशाल साजरा करा ख्रिसमस, कोणतेही कोरोना निर्बंध नाहीत

पणजी - कोरोनाबाबत आम्ही सतर्क आहोत पण कोणतेही निर्बंध लादले जाणार नाहीत, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. गोव्यात 2% आंतरराष्ट्रीय प्रवाशांची जीनोम सिक्वेन्सिंगसाठी चाचणी केली जाते. 27 डिसेंबरच्या मॉक ड्रीलपूर्वी तयार राहण्यासाठी आम्ही बैठकीत अधिकाऱ्यांनाही सतर्क केले आहे. असेही मुख्यमंत्री सावंत यांनी राज्याच्या अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीनंतर स्पष्ट केले.

19:35 December 23

मुंबईत आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी विनामूल्य RT-PCR चाचणी

मंबई - कोविड 19 RT-PCR चाचणी सुविधा आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी एअरलाइन्स ठराविक प्रवाशांची निवड करेल. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

19:04 December 23

ग्रीन एनर्जीवर चालणारी वाहने खरेदी करणाऱ्यांना कमी दरात कर्ज द्या - गडकरी

ठाणे - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी बँकांना फ्लेक्स इंधन, वीज आणि हायड्रोजनसह स्वच्छ ऊर्जेवर चालणारी वाहने खरेदी करू इच्छिणाऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज देण्याचे आवाहन केले आहे. ते एका बँकेच्या कार्यक्रमात बोलत होते.

18:51 December 23

मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळावर उद्यापासून आरटीपीसीआर चाचण्या

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आरटीपीसीआर चाचण्यांना उद्यापासून सुरुवात करण्यात येणार आहे. कोरोना महामारी संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेतली जाणार आहे. 6 नोंदणी काउंटर आणि 3 सॅम्पलिंग बूथवर ही चाचणी केली जाणार आहे.

18:34 December 23

त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी गडावर भाविकांना मास्क सक्ती

नाशिक - कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही टास्क फोर्स नेमून परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. अशात नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गड आणि त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांनी मास्क वापरावे अशी सूचना करत मास्क सक्ती करण्यात आली आहे.

18:12 December 23

आफताब पुनावालाच्या आवाजाचा नमुना घेणार, तपासात येणार कामी

नवी दिल्ली - साकेत न्यायालयाने आरोपी आफताब पूनावालाच्या आवाजाचा नमुना घेण्याची परवानगी मागणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या याचिकेला परवानगी दिली आहे. आरोपीला आवाजाचा नमुना देण्यास नकार देण्याचा अधिकार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तिहार तुरुंग प्रशासनाने आरोपीला आवाजाचा नमुना देण्यासाठी CFSL मध्ये नेण्याचे निर्देश दिले आहेत.

17:31 December 23

पॅरिसमध्ये गोळीबार, दोघांचा मृत्यू

पॅरिस - मध्य पॅरिसमध्ये गोळीबार झाला आहे. यात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. एएफपीने याबाबतचे वृत्त दिले आहे. या घटनेत दोघांची प्रकृती गंभीर आहे, असे आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी म्हटले आहे.

17:23 December 23

तेलगीवरील वेब सिरीजचे प्रदर्शन रोखण्याची याचिका फेटाळली

मुंबई - येथील दिवाणी न्यायालयाने बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील दोषी दिवंगत अब्दुल करीम तेलगीवर आधारित वेब सिरीजच्या प्रसारणाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली. तेलगीची मुलगी सना इरफान तालिकोटीने 'घोटाळा 2003.... या वेब सीरिजच्या निर्मात्यांविरोधात शहर दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्यांची याचिका कोर्टाने फेटाळली.

17:12 December 23

मोहित कंबोज विरोधात फसवणूक प्रकरणाचा सी समरी रिपोर्ट दाखल, सुटकेचा मार्ग मोकळा

मुंबई - मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) भाजप कार्यकर्ता मोहित कंबोज आणि इतरांविरुद्ध दाखल केलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात येथील न्यायालयात 'सी समरी' अहवाल सादर केला आहे, असे एका अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले. त्यामुळे या प्रकरणातून त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

17:11 December 23

29 लाखांचे कोकेन केले जप्त

मुंबई - पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्ष घाटकोपर युनिटने 29 लाखांचे कोकेन ड्रग्स केले जप्त.

16:55 December 23

कर्नाटकला जशास तसे नाही तर अधिक कडक उत्तर देणार - शंभूराज देसाई

नागपूर - आंतरराज्य सीमा विवादावर आम्ही कर्नाटकपेक्षा अधिक जोरकस आणि प्रभावी ठराव आणणार असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. आमच्या सरकारने आजच ठराव संमत करायचा होता, पण भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे तो आज पटलावर ठेवता आला नाही, असे देसाई यांनी स्पष्ट केले.

16:37 December 23

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना

पुणे - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे विमानतळावरून दिल्लीला रवाना झाले आहेत. भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने देवेंद्र फडणवीस हे आज सकाळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी नागपूरहून पुण्यात आले. अंत्यदर्शन घेऊन ते एअरपोर्टला रवाना झाले. विधीमंडळाचे अधिवेशन सुरु असल्याने फडणवीस पुन्हा नागपुरला जातील अशी शक्यता होती. मात्र ते दिल्लीला रवाना झाले.

16:09 December 23

आयपीएल लिलाव 2023: निकोलस पूरनसाठी 8 कोटींच्या पुढे गेली बोली

कोची - निकोलस पूरनसाठी 4 कोटींच्या पुढे बोली आधीच गेली आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स त्याच्यासाठी लढत आहेत. त्यानंतर ही बोली आता 6 कोटींच्या पुढे गेली आहे. RR आणि DC दोघेही पूरनसाठी ठाम आहेत आणि त्यामुळे शेवटचे वृत्त आले तेव्हा ही बोली 8 कोटींहून अधिक झाली होती.

16:01 December 23

आता तरी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाचा निषेध ठराव मांडावा - जयंत पाटील

नागपूर - मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी नेभळटपणा सोडून आपल्या विधानसभेत कर्नाटकच्या सरकार आणि मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधाचा ठराव मांडावा अशी मागणी करणारे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. मराठी भाषिकांवर अन्याय होऊनही महाराष्ट्राचे सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. दिल्लीने डोळे वटारल्यामुळे यांच्या तोंडातून शब्दही बाहेर निघत नाहीे, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.

15:58 December 23

फक्त 50 लाखात अजिंक रहाणे सीएसकेच्या पदरात

कोची - भारतीय मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणेला शुक्रवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2023 च्या लिलावादरम्यान चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने त्याच्या मूळ किमतीत 50 लाख रूपयांना विकत घेतले.

15:51 December 23

आयपीएल लिलाव 2023: बेन स्टोक्सला CSK ने मोजले तब्बल 16.25 कोटी

स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सवर चांगलीच बोली लागली. त्‍याने त्‍याची मूळ किंमत 2 कोटींपासून सुरुवात केली. LSG ने शेवटची बोली लावल्‍याने 7.50 कोटीवर त्याची बोली गेली आहे. तर LSG कडून 13.50 कोटी बोली लावण्यात आली. नंतर SRH कडून 14.75 ची बोली लावण्यात आली. LSG ने ती 15 कोटी केली. LSG आणि SRH मधील मोठ्या चुरशीनंतर CSK ने मध्येच आपली मोठी बोली लावली. त्यांनी बेन स्टोक्सला तब्बल 16.25 देऊन आपल्या संघात घेतले.

15:46 December 23

आयपीएल लिलावात सॅम कुरनला घेतले पंजाब किंग्सने तब्बल १८.५ कोटी रुपयात

आयपीएल लिलावात सॅम कुरनला घेतले पंजाब किंग्सने तब्बल १८.५ कोटी रुपयात. तर कॅमेरॉन ग्रीनला मुंबई इंडियन्सने घेतले तब्बल १७.५ कोटी रुपयात.

15:44 December 23

गडचिरोलीत चकमक, दोन नक्षलवादी ठार

गडचिरोली - जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील दामरंच्या जंगल परिसरात पोलिस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांना कंटस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे.

15:36 December 23

झेमामध्ये लष्कराच्या ट्रकला भीषण अपघात, सोळा जवानांना वीरमरण

उत्तर सिक्कीम येथे झेमामध्ये लष्कराच्या ट्रकला झालेल्या एका भीषण अपघातात भारतीय लष्कराच्या सोळा जवानांना वीर मरण आले. हे दुर्दैवी वाहन तीन वाहनांच्या ताफ्यातील होते जे सकाळी चट्टेनहून थंगूच्या दिशेने निघाले होते. झेमा येथे जाताना, वळण घेत असताना वाहन उतारावरून घसरले.

15:31 December 23

श्रद्धा वालकरचे वडिल दिल्ली पोलीस मुख्यालयात

दिल्ली - भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यासह श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांनी दिल्ली पोलिस मुख्यालयात तपासी अधिकाऱ्यांची भेट घेतली.

15:27 December 23

राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

नागपूर - राज ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांची मुख्यमंत्री दालनात भेट झाली. या भेटीदरम्यान, दोन्ही नेत्यांनी बंद दाराआड काही वेळ चर्चाही केली. तसेच राज ठाकरे यांनी मनसेची कार्यकारिणी स्थापन केली.

15:20 December 23

महसूल पथकातील दोघांना जिवे मारण्याचा प्रयत्न

नांदेड : मुखेड तालुक्यातील जांब बुद्रूक येथे गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बॉर्डर धाबाजवळ तहसील कार्यालयाच्या महसूल पथकाने अवैध मुरूम वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले. त्यावेळी पथकातील दोघांना रस्त्यावर गाडीखाली ढकलून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याची तक्रार करण्यात आली आहे.

15:07 December 23

विधिमंडळाच्या गेटवर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

नागपूर - विधिमंडळाच्या गेटवर एका महिलेने अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षारक्षकांना वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. उठसूट कुणीही संतांचा अपमान करत सुटले आहे. यावर सरकार काहीही करत नाही याचा राग व्यक्त करण्यासाठी महिलेने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतले. कविता चव्हाण असे या महिलेचे नाव आहे. त्या सोलापूर येथील रहिवासी आहेत.

14:59 December 23

सत्ताधारी पक्षाची स्टंटबाजी आम्हाला बोलूच देत नाही - आदित्य ठाकरे

नागपूर - सत्ताधारी पक्षच हौद्यात येऊन सभागृह तहकूब करण्याचा प्रयत्न करत होता. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न मांडण्याची संधी आम्हाला हवी होती. पण ते बोलूच देत नव्हते. कर्नाटकचे मुख्यमंत्री महराष्ट्रावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. ते योग्य नाही. अनेक प्रश्न मांडायचे होते. मात्र सरकार सहकार्य करत नाही असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

14:41 December 23

माजी मंत्री नवाब मलिक यांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री नवाब मलिक यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. मलिक यांना 6 जानेवारीपर्यंत मुंबईतील कुर्ला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू ठेवण्याकरत आणखी मुदतवाढ देण्यात आली आहे. नवाब मलिक यांचे जे जे रुग्णालयातील डॉक्टरांना तपास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश रुग्णालयातील किडनी तज्ञ डॉक्टरांना देण्यात आले होते. मात्र डॉक्टर आज हजर न राहू शकल्याने अहवाल सादर करण्यात आला नाही. त्यामुळे या प्रकरणात पुढील सुनावणी 6 जानेवारी रोजी होणार आहे. तोपर्यंत मलिक यांचा मुक्काम कुर्ल्यातील खासगी रुग्णालयातच राहणार आहे.

14:17 December 23

आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट झाली पाहिजे - सुशांत सिंग राजपूतचे वडील

पाटणा - सुशांत प्रकरणी बातम्यांमध्ये पाहिल्याप्रमाणे त्यात आदित्य ठाकरे यांचे नाव दिसत होते असे सुशांतच्या वडिलांनी म्हटले आहे. एसआयटीच्या तपासात सत्य समोर येईल, असेही ते म्हणाले आहेत. त्याचवेळी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट झाली पाहिजे अशी मागणीही, सुशांत सिंग राजपूतचे वडील के. सिंग यांनी केली आहे.

13:42 December 23

श्रद्धा वालकर खून प्रकरणी आरोपी आफताबची आज कोर्टात हजेरी

नवी दिल्ली - श्रद्धा वालकर खून प्रकरणी आरोपी आफताबला आज दुपारी 2 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साकेत कोर्टात हजर केले जाईल. तुरुंग अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

13:14 December 23

मनसेची वाढ ही काही पक्षांच्या डोळ्यात खुपते- राज ठाकरे

ज्यांना हसायचे त्यांनी हसावे. विरोधकांना त्रास होणे स्वाभाविक असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

12:55 December 23

शेली ओबेरॉय यांचे नाव दिल्लीच्या महापौरपदाच्या उमेदवार म्हणून जाहीर

नवी दिल्ली - आम आदमी पार्टीने शेली ओबेरॉय यांचे नाव महापौरपदाच्या उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. उपमहापौरपदासाठी आले मोहम्मद यांचे नाव पक्षाने निश्चित केले आहे. AAP ने या महिन्याच्या सुरुवातीला दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवला होता. नागरी संस्थेवरील भाजपचे 15 वर्षांचे वर्चस्व संपुष्टात आणले होते. AAP ने 250 पैकी 134 नागरी वॉर्ड जिंकले. तर भाजपने 104 आणि कॉंग्रेसने नऊ जागा जिंकल्या. 'आप'ला स्पष्ट बहुमत मिळाल्याने भाजपने महापौरपदाची निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. महापौर आपचा असेल आणि भाजप, सशक्त विरोधी पक्षाची भूमिका बजावेल, असे दिल्ली भाजपचे आदेश गुप्ता यांनी सांगितले.

12:38 December 23

चार्ल्स शोभराजची नेपाळमधील जेलमधून सुटका

काठमांडू - नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने वयाच्या कारणास्तव सिरीयल किलर चार्ल्स शोभराजच्या सुटकेचे आदेश दिले. तो 2003 पासून 2 अमेरिकन पर्यटकांच्या हत्येच्या आरोपाखाली नेपाळच्या तुरुंगात होता. न्यायालयाने त्याची सुटका झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत हद्दपारीचे आदेश दिले आहेत. त्याला लवकरात लवकर फ्रान्सला घेऊन जाणार असल्याचे त्याच्या पत्नीने स्पष्ट केले.

12:34 December 23

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून भक्तांना मास्क परिधान करण्याचे आवाहन

पुणे : भारतातली मागच्या वेळेसची कोरोनाची स्थिती पाहता यावेळी विशेष काळजी घेतली जात आहे. याबाबतील पुन्हा खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर प्रशासनाने देखील खबरदारी घेत भक्तांना बाप्पाच्या दर्शनासाठी येताना मास्क वापरावा असे आवाहन केले आहे.

12:31 December 23

इस्लामाबादमध्ये स्फोट, एका पोलिसाच्या मृत्यूचे वृत्त

कराची - पाकिस्तानात इस्लामाबादच्या I-10 सेक्टरमध्ये मोठा स्फोट झाल्याचे वृत्त आहे. सुरक्षा अधिकार्‍यांनी परिसराला वेढा घातला आहे. नेमके काय झाले त्याचा तपास सुरू केला आहे. या स्फोटात एका पोलिसाचा मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे.

12:15 December 23

रियाजुद्दीन काझीला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळील वाहनात स्फोटके सापडल्याप्रकरणी आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या संगनमताने पुरावे नष्ट केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रियाजुद्दीन काझीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. आरोपी रियाझुद्दीन काझी याला मुंबई उच्च न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. त्याचा पासपोर्ट जमा करण्यास सांगितले आहे. त्याला दर शनिवारी एनआयए कार्यालयात हजर राहावे लागेल.

12:07 December 23

5 वर्षीय मुलीचे अपहरण करून बलात्कार, आरोपी फरार

नवी दिल्ली - घराजवळ खेळत असताना एका 5 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. 22 डिसेंबरला सकाळी ही मुलगी जवळच्या उद्यानात आढळून आली. IPC आणि POCSO कायद्यानुसार या प्रकरणी अज्ञात गुन्हेगारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिल्ली पोलिसांनी आज सांगितले.

11:06 December 23

विरोधकांचा कामकाजावर बहिष्कार-अजित पवारांची माहिती

महाविकास आघाडीची बैठक झाली, सभागृहात जे घडले जयंत पाटील यांच्यावर कारवाई झाली, म्हणून काल सभात्याग केला. आज आमची भूमिका तीच आहे. जयंत पाटील यांच्यावरील कारवाई मागे झाली पाहिजे. त्यासाठी आजच्या कामकाजात सहभागी होणार नाही. कर्नाटक सरकार नवीन ठराव घेत आहे, सीमावर्ती भागातील लोक नाराज झाले आहे. सोमवारी ठराव घ्या,आमचे समर्थन राहील. लोकशाही पध्दतीने कामकाज करताना शेम शेम शब्द प्रयोग होतो.. ऱ्यांचा अर्थ तोच होतो. जयंत पाटील यांनी निर्लज्ज हा शब्द प्रयोग सरकार साठी होता, मात्र, त्यांना अडकवण्यासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली.

10:34 December 23

काही पक्ष व नेत्यांकडून कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम करण्याचा प्रयत्न-अजित पवार

महाराष्ट्र कर्नाटक सीमेचा प्रश्न अनेक वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे. भाजप सत्ताधारी पक्ष असल्याने त्यात हस्तक्षेप करून सोडवता आला असता. यापूर्वी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली नाही. काही राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते आता कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.

10:04 December 23

मोहित कंबोज यांना गुन्हे आर्थिक शाखेकडून क्लीन चीट

भाजप नेते मोहित कंबोज यांना गुन्हे आर्थिक शाखेकडून क्लीन चीट देण्यात आली आहे.

09:52 December 23

बोम्मई यांच्याविरोधात चिथावणी भाषण केल्याने गुन्हा दाखल करा- संजय राऊत

बोम्मई अमित शाहांचा आदेश मानत नाहीत. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादत बोम्मई तेल ओतत आहेत. सीमावादावर शिंदे फडणीस गप्प आहेत. बोम्मई यांच्याविरोधात चिथावणी भाषण केल्याने गुन्हा दाखल करा, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली.

09:09 December 23

विरोधी पक्षाची १० वाजता बैठक, पुढील रणनीती ठरविणार

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे निलंबन अयोग्य आहे. सत्ताधाऱ्यांचे वर्तन चुकीचे आहे. आज कामकाजात भाग घ्याचा की नाही की ठरिवण्यात येणार आहे. विरोधी पक्षाची १० वाजता बैठक, पुढील रणनीती ठरविण्यात येणार असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.

09:03 December 23

सीमावादावर शिंदे भाजप सरकारने एकमताने ठराव मांडावा-अजित पवार

सीमावादावर शिंदे भाजप सरकारने एकमताने ठराव मांडावा. कर्नाटकात ठराव, आपल्याकडे का नाही? असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.

08:08 December 23

काँग्रेसची भारत जोडो यात्रा पुन्हा सुरू

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी कोरोनाच्या काळातील नियम पाळण्याचे यापूर्वीच आवाहन केले आहे. अशातच हरियाणातील सोहना येथील खेरली लाला येथून काँग्रेसची भारत जोडो यात्रा पुन्हा सुरू झाली.

07:31 December 23

केंद्रीय आरोग्य मंत्री राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची आज घेणार बैठक

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया आज दुपारी 3 वाजता राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत कोविड-19 परिस्थिती आणि तयारीबाबत बैठक घेणार आहेत.

07:01 December 23

रशियाला युक्रेनमधील युद्ध संपवायचे आहे, पण..

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले की, रशियाला युक्रेनमधील युद्ध संपवायचे आहे आणि यात अपरिहार्यपणे राजनैतिक तोडगा काढावा लागणार आहे.

06:59 December 23

अमेरिकेत 2000 हून अधिक विमान उड्डाणे रद्द

प्रचंड बर्फ आणि अतिशीत तापमानामुळे अमेरिकेत 2000 हून अधिक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

06:38 December 23

Breaking News : उघडी मॅनहोल प्रकरणात मुंबई महापालिका आणि एमएमआरमधील महापालिकांना उच्च न्यायालयाने फटकारले

मुंबई : मुंबई शहरासह एमएमआर परिसरात उघडे मॅनहोल पावसाळ्यात मृत्यूचा सापळा ठरत असतो. या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकावर गुरुवारी सुनावणी पार पडली आहे. मागील सुनावणी दरम्यान मुंबई महानगरपालिका आणि एमएमआर परिसरातील महापालिका यांना यावर उपाययोजना संदर्भात उत्तर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र उत्तर दाखल न करण्यात आल्याने उच्च न्यायालयाने संबंधित यंत्रणेला फटकारले आहे. तसेच या याचिकेवर पुढील सुनावणीपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी 5 जानेवारी रोजी होणार आहे.

Last Updated : Dec 23, 2022, 10:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.